Skip to main content

वय वर्षे १४

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 23/05/2010 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदाच एकटी अशी राहत होती आणि स्वातंत्र्याचा अनुभव येत होता....आपल्याला बोलायला, ओरडायला, उत्तर द्यायला कोणी नाही याचा आनंद वाटत होता...पण इथला गायकवाड का एवढा खार खाउन असतो काही कळत नव्हते...मरू दे...काय कोणाला भाव द्यायचाय...."तो" आहे ना आपल्याला protect करायला...इतके वर्ष तणावाखाली आणि मार खात घालवल्यावर आभाळ मोकळं मिळालं तर त्याचा आनंद घ्यायचा एवढेच मनात होते... ३१ डिसेंबरच्या रात्री बियर खूप झाल्यावर झोप अशी आलीच नाही...मध्यरात्री कधीतरी एकदम उलटी येईल असे वाटल्याने ती रूमच्या बाहेर आली आणि चौकातील पाण्याच्या नळाजवळ जाऊन बसली...तोंड धुतले...परत रूमवर येताना रात्रीच्या अंधारात एक मुल

चित्रपट परिक्षण- काईट्स (अविनाशकुलकर्णी स्टाईल)

लेखक टारझन यांनी शनिवार, 22/05/2010 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृतिकचा बहुप्रतिक्षित "काईट्स" हा सिनेमा अत्यंत भिकारचोट आहे, आज्जिबात बघु नका, कोणत्या "अगाध प्रतिभेच्या" डायरेक्टरने बनवलाय कुणास ठाऊक !! -संजानाशगंजाकर्णी

ताम्रोत्सव...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 22/05/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाख वणवा पेटला की गुलमोहर देखील पेटतोच. तो असा तसा पेटत नाही, दुरून नखशिखांत अग्निज्वालांनी वेढलेला भासतो. मृगजळामागगील गुलमोहराची फुले म्हणजे सक्षात ज्वालांचे ज्वलंत उदाहरणच! उन्हाळ्यामुळे त्याची हिरवी पाने झडली तरी लाल कळ्या उमलून येतात, त्यातून फुले फुलतात. अन् आख्खं झाड ताम्रोत्सव साजरा करतांना दिसतं. इतरांची पानझड झालेली असतांना हे झाड मात्र ओकंबोकं न वाटता काहीतरी भरगच्च वाटू लागतं आणि ऐन उन्हाळ्यात शीतलता, शांतता शोधणारी आपली नजर त्या भगभगीत फुलांमुळे आणखीनच गरम होण्याची शक्यता असते गुलमोहराच्या फुलांचा एक वेगळाच साचा असतो. एकूण पाकळ्या पाच.

दु:खद घटना... मेंगलोर रनवेवर विमानाला अपघात १६० प्रवासी ठार...

लेखक दिपक यांनी शनिवार, 22/05/2010 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत दु:खद घटना.. एअर इंडियाच्या दुबई-मेंगलोर विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. विमानाचं लँडिंग होत असताना , टायर फुटल्यानं हा अपघात झाला.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5960924.cms मृतांना श्रद्धांजली...

सोनिया गांधी : एक चरित्र

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 22/05/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल. अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि.

विचारू नका..! (नवीन)

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 22/05/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचा प्रथमच प्रयत्न. प्रेरणा श्री. विशाल कुलकर्णी यांची अतिशय सुंदर "विचारू नका " ही कविता.श्री. कुलकर्णी साहेबांची मनापासून माफी मागून विचारू नका..!
काव्यरस

कवी ग्रेस यांना प्रतिष्ठेचा नागभूषण पुरस्कार

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 22/05/2010 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल. कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो.

(अगाध प्रतिभा???)

लेखक मनिष यांनी शनिवार, 22/05/2010 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राष्ट्रपतींचे (महिला असल्या तरी राष्ट्रपतीच म्हणतात ना रे? तसे "पती" चा स्त्रीलिंगी शब्द माहित आहे, पण....असो) नाव "प्रतिभा पाटील" किंवा "पाटील प्रतिभा" (शासकिय फॉर्म प्रमाणे आडनाव आधी) आहे ना? आता कुठेतरी "अगाध प्रतिभा" असे काहितरी वाचले. कोण बरं ह्या? काही माहिती असल्यास कृपया इथेच कळवावे. मला नीटसे आठवत नाही (मी खूप लहान होतो तेंव्हा, कदाचित १२वीत असेन), पण मला वाटते की "अगाध प्रतिभा" ह्या माझ्या जवळच्या नातलग आहेत. त्या गेल्यापासून मला फार मानसिक धक्का बसलाय...काही धड लिहिता येत नाही.