श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
वाचने
4029
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे बघा बरं...
https://www.google.com/search?hl=en&source=hp&q=shree+font&cts=12656323…
बिपिन कार्यकर्ते
नुसती लिपी हवी, प्रणाली नको
In reply to हे बघा बरं... by बिपिन कार्यकर्ते
श्री लिपीसारखा 'ट्रु-टाईप फाँट' जर निव्वळ वाचायचा असेल, तर आपल्या संगणकावर निव्वळ फाँट्ची (टी.टी.एफ) गरज असते, अशी आमची समजूत आहे. गूगलवर येणारे दुवे संगणकावर काहीतरी प्रणाली (सॉफ्टवेअर) टाकावी लागेल, असे सुचवतात. ते टाळायचा मार्ग शोधत आहोत. धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
मंग नाय जमनार वाटत
In reply to नुसती लिपी हवी, प्रणाली नको by चिंतातुर जंतू
श्री लिपीशी साधर्म्य दिसणारा दुसरा फॉन्ट दिसला नाही.परिवर्तन वापरले तर आपला श्रीलिपीतील मजकुर युनिकोडात करता येईल. श्री लिपीतील मजकुर उघडायचा प्रथमदर्शनी तो कचरा दिसेल. त्या कचर्याला च्या फाईल रुपांतरीत करायचे. मग मजकुर दिसु लागेल. माझ्याकडे चकटफु असलेला कृष्णा टीटीएफ होता. त्याला समांतर असा दुसरा कृति फॉन्ट मला रुपांतर मधे दिसला. मग मी त्याचे युनिकोड केले. त्यामुळेच मला ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी हे पुस्तक जालावर टाकता आले. फारसे तांत्रिकज्ञान नसतानाही केवळ काड्या करण्याच्या वृत्तीतुन हे जमले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
छान. उपयोगी
In reply to मंग नाय जमनार वाटत by प्रकाश घाटपांडे
छान.
उपयोगी माहिती.
युनिकोड कन्वर्टर
या दुव्यावर जा. तुमची फाईल ब्राउझ करुन ड्रॉप-डाऊन मधून Shree-Dev-0714 हा पर्याय निवडून Convert म्हणा.
मी नॉन-युनिकोड पेजेस यातून बघतो. मात्र कधी फाईल Convert केलेली नाहीये. त्यामुळे हमी देत नाहीये.
धन्यवाद!
In reply to युनिकोड कन्वर्टर by अभिरत भिरभि-या
धन्यवाद! भिरभिर्या यांनी सुचवलेला हा उपाय चालला!
- चिंतातुर जंतू
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?
डोळ्यांनी पहावा असे माझे स्पष्ट मत आहे!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
च्या मारी
In reply to श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा? by ब्रिटिश टिंग्या
च्या मारी ..... आपने तो भांडाही फोड दिया =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)