अमानुषता आणि माणुसकी
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
आपल्यापैकी बरेचसे जण खूप प्रोटेक्टेड जगात राहतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. किंबहुना अनेकदा जाणूनबुजून आपण ह्या गोष्टी नजरेआड करत असतो. परंतु हे पुस्तक वाचताना ख-या आणि बीभत्स जगाचं दर्शन घडतं.
मिसळपाव