Skip to main content

अथ धूमकेतुपुराणं!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 06/08/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो. धूमकेतू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर 'हॅले'चा धूमकेतू येतो.

आलु पराठा

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 06/08/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
काय बॅचलर मंडळी शिकलात की नाही सैपाक बिंपाक? अहो नसाल तर लागा तयारीला. चुकुन माकुन एखाद्या IT वालीने गळ्यात माळ घातली तर मग कस व्हायच तुमचं? ;) आज एका सोप्या डिश पासुन सुरवात करा. गृहिणींचा आणि बॅचलर मंडळींचा अगदी अडी-नडीला धावुन येणारा किचन मधला दोस्त म्हणजे बटाटा. घरात दुसरी कसलीच भाजी नसली तरी कांदे /बटाटे असतातच. अश्या वेळी नुसत्या बटाट्याच्या काचर्‍या करुन वेळ मारुन नेता येते.

फिश केक

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 06/08/2010 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
फिश-केक: परवा लक्षात आले की घरी दोन दिवसांपूर्वी आणलेले मासे (haddock) पडलेले आहेत. आमच्याकडे जास्त पसंती कालवणाला आहे, पण आज त्यासाठी मला हवे होते ते नारळ, कोथिंबीर असे काहीच घरात नव्हते. होते असे माझे कधीकधी. ;) आणि तेवढ्यासाठी संध्याकाळी इंडियन स्टोरला जायचा कंटाळा आला होता. आमच्याकडे बाबा लहानपणी म्हणत असत की घरात काय आहे त्यात बरेच काही करता येते, दरवेळी एखाद्या पदार्थासाठी अडून बसण्याची गरज नाही. आणि ते खरोखरच घरात जे आहे त्यात चविष्ट जेवण तयार करतात (मूड असला तर). हा उपदेश आठवला, म्हणून घरात काय होते ते पाहिले. एक म्हणजे घरी बनवलेला गव्हाचा उरलेला ब्रेड होता.

अधुरा चंद्र

लेखक रुपेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/08/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र म्हणतो चांदणीला येशील का मला भेटायला । अरे, येऊ कशी भेटायला काहितरी प्रेम नको का मला वाटायला । आगं तुझ्यासाठी दिवसभर होरपळतो रात्रभर शोध घेत हिँडतो एवढं पुरे नाहि का माझ्या प्रेमात पडायला । आरे, एवढं तर सर्वजन करतात, काहितरी हावं न विषेश तुझ्यात जे पाहिजे मला पटायला । यापेक्षा विषेश काहिच नाहि मजकडे , माझे सर्वस्वच तुला अर्पिले हे तुला कधी पटेल कि नाहि कुणास ठावुक माझ्याबद्दल तुला प्रेम वाटेल की नाहि कुणास ठावुक ।

टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

लेखक अविनाश ओगले यांनी गुरुवार, 05/08/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली! परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड"पाशी येऊन

माझे मन सुखाच्या मागे धावत असता..

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी गुरुवार, 05/08/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मन सुखाच्या मागे धावत असता , त्याला सगळे काही मिळाले, पण......? मी मागे वळुन आयुष्याच्या वाटे वर पाहिले असता आज ... पण .......? माझे मन सुखाच्या मागे धावून , आयुष्‍यालाच विटले, आणि तेव्‍हां कुठे त्‍याला, मृगजळच भेटले.........!!! मनापासून जे हवं होतं, ते नाही मिळालं.. अजुन सुद्धा !!
काव्यरस

महागाई

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी गुरुवार, 05/08/2010 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
महागाई...... महागाई केवढी वाढलेय न, २०० रुपये कधी खर्च झाले माहीत नाही. सकाळी कामाला निघाले. ऑटोत बसले १५ रु, परत मालाडहून ऑटो २५ रु दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु. इवनिंग टी १५ रु, परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४० येताना एक ब्रेड २०/- दुध २७/- लिटर. ७ वर्षांपूर्वी ब्रेड - १०/- दुध - १५/- लिटर घर ते स्टेशन ऑटो - ४/- बस - ३/- विजेचे बिल, केबलचे बिल, कडधान्य, फळे सर्व आताच्या तुलनेत स्वस्त होत लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल. अर्थात आपण लिहिण्याशिवाय व त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय बाकी काही करू शकत नाही.

दारी उभा गे साजण

लेखक मितान यांनी गुरुवार, 05/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो: एक विचारु ? ती: ह्म्म.. विचार की.. तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय.. ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच ! तो: एकदा भेटूनच येतो. ती: परवा सकाळी येशील नं घरी? तो: हो. तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्‍या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............ रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या.

मावळतीला रंग शोधणारा ढग मी...

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 05/08/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी