Skip to main content

मावळतीला रंग शोधणारा ढग मी...

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 05/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी
लेखनविषय:

वाचने 1711
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रंगरंगीली कविता. प्रत्येक ओळीत शब्दरंग (म्हणजे रंग हा शब्द ) भरलाय. जबर्‍या रे, रंगराव.

फ्रॅक्चर बंड्या नावाचा मनुष्य अत्यन्त कविमनाचा आहे. डेंजर काम्बिणेशण ! पण मस्त कविता.

कलरफूल कविता !! आपला , ब्लॅक ओन्ली !! ;)