टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!
ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात.
शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.
संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.
स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड"पाशी येऊन थांबलाय
तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत
कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू- कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत, कुठल्याच द्रौपदीपर्यंत
टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला
डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.
तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे दिवसेदिवस
प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत
इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप
सारंच परकं होईल त्यांना
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
-अविनाश ओगले
याद्या
20548
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
ह्म्म
सहमत
In reply to ह्म्म by केशवसुमार
मस्त
अविनाश राव.
नेहमीचेच
+१
In reply to नेहमीचेच by क्रेमर
+२
In reply to +१ by धनंजय
पुराव्याने शाबीत झाले !
In reply to +१ by धनंजय
यात टिळकांचा कुठला अपमान दिसला?
In reply to पुराव्याने शाबीत झाले ! by अर्धवटराव
जन?????? (किंचित असहमती)
In reply to यात टिळकांचा कुठला अपमान दिसला? by धनंजय
कुठले जन?
In reply to जन?????? (किंचित असहमती) by पंगा
नाही
In reply to कुठले जन? by क्रेमर
ठीक
In reply to नाही by पंगा
तुलनेच्या निकषांबद्दल साशंक
In reply to ठीक by क्रेमर
माहिती संचाप्रमाणे तुलनेसाठी निकष
In reply to तुलनेच्या निकषांबद्दल साशंक by पंगा
आणखी एक (शेवटचा) प्रयत्न
In reply to माहिती संचाप्रमाणे तुलनेसाठी निकष by क्रेमर
प्रयत्नांती पूर्णविराम
In reply to आणखी एक (शेवटचा) प्रयत्न by पंगा
ह्म्म्म !!
In reply to यात टिळकांचा कुठला अपमान दिसला? by धनंजय
+१०
In reply to +१ by धनंजय
प्रतिक्रिया
In reply to +१ by धनंजय
धन्यवाद - असहमती ठीक
In reply to प्रतिक्रिया by तर्री
सहमत
लेख आणि प्रतिसाद
काही उत्तरे
In reply to लेख आणि प्रतिसाद by विकास
आशावाद वगैरे...
In reply to काही उत्तरे by धनंजय
टिळकांना त्रास
In reply to आशावाद वगैरे... by विकास
माझ्या आठवणीप्रमाणे
In reply to टिळकांना त्रास by धनंजय
रोचक
In reply to माझ्या आठवणीप्रमाणे by विकास
धन्यवाद
In reply to रोचक by सुनील
अवांतर...
In reply to धन्यवाद by विकास
संबंध काय?
In reply to अवांतर... by सुनील
बाय द वे, अमेरिकन नागरिकत्व
In reply to संबंध काय? by पंगा
सरदार नातू
In reply to माझ्या आठवणीप्रमाणे by विकास
मला असं वाटतंय की विकास यांनी
पूर्वदूषितग्रह?
In reply to मला असं वाटतंय की विकास यांनी by अप्पा जोगळेकर
अविनाशशेठ, कविता खरोखरच छान.
वंदन
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण
ख्रिस्ताच्या देवदूतांची तुतारी
लेख व त्यावरील चर्चा उच्च
लोकमान्य बाळ गंगाधर
हा लेख जयंत राव..दिपक राव व
मला वाटतं या लेखात सामान्य
धनंजय यांचा मुद्दा कोणाच्या
In reply to मला वाटतं या लेखात सामान्य by जयंत कुलकर्णी
म्हणून तर टक्केवारी !
In reply to धनंजय यांचा मुद्दा कोणाच्या by नितिन थत्ते
हे धऩंजय, पंगा वगेरे लोक काय
थोर होते असेच म्हणतो
In reply to हे धऩंजय, पंगा वगेरे लोक काय by हिंदुराव धोंडेपाटील
+१
In reply to थोर होते असेच म्हणतो by धनंजय
मजेशीर चर्चा.
QED
In reply to मजेशीर चर्चा. by आमोद शिंदे
परत 'तो' विषय नको.
In reply to QED by पंगा
चान चान ! अशा उदबोधक चर्चा
हे ची फळ काय मम तपाला...?