Skip to main content

(बघ त्याची आठवण येते का?)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 05/08/2010 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
चिरमुरे अन खोबरं ट्रॉलीत उभारून खा बघ त्याची आठवण येते का? हात लांबव , फळीखालून काढ उरलेली वर्गणी, इवलासा पेग पिऊन टाक. बघ त्याची आठवण येते का? वार्‍यावर झुलणारे धुराचे ढग नाकात घे, धूर पी , तल्लीन हो. नाहीच आवडलं काही तर खाली उतर , राऊंडात ये, ते चेकाळलेले असतीलच , पायात पाय तुडवत नाचत रहा. मोरया ओरडेल कोणीतरी , बघ त्याची आठवण येते का? मग चालू लाग , उरलेल्या नोटा मोजून घे, पीत रहा नोटा संपेपर्यंत , त्या संपणार नाहीतच , शेवटी परत ये , वाटेत घसरु नकोस, ट्रॉली विसरु नकोस , पुन्हा त्याच ट्रॉलीत ये. आता वरचा बोर्ड बघ , बघ त्याची आठवण येते का? कानाखाली वाजेल , तोल सावर , पोलीस असेल, ओशाळून कान

अनुस्वारांचे मिलन

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 05/08/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
एके काळी शुद्धलेखन फाट्यावर मारले जायचे. आता काळ बदलला असल्यामुळे, अनुस्वारांच्या उपयोगा विषयी माहिती देत आहे. ज्यांना शुद्धलेखनात स्वारस्य आहे आणि अनुस्वाराच्या वापरासाठी प्रश्न पडत असेल, अशांसाठीच हा लेख आहे. अनुस्वाराचा उच्चार न आणि म युक्त होत असतो. अनुस्वाराच्या पुढचे व्यंजन त्या त्या गोत्रातले असेल, तेव्हाच अनुस्वार न देता, त्या पुढच्या सगोत्र व्यंजनाशी अनुस्वाराचे मिलन होऊ शकते. अन्यथा असा विजोड गोत्र विवाह मराठीत मान्य नाही. परंतू माझ्या माहितीनुसार, न आणि म ने सगोत्र विवाह केलाच पाहिजे असे बंधन नाही!

आता पुढची लढाई...

लेखक निनाद यांनी गुरुवार, 05/08/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत, तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्यावर येथेही काही विधायक चर्चा होऊ शकेल असे वाटून देत आहे. लेख वर्तमानपत्रासाठी लिहिला गेल्याने स्वरुप आंतरजालिय लिखाणासारखे नाही याची कल्पना आहे. पण सांभाळून घ्यावे! तसेच अश्विनी कुलकर्णी यांना मिपावरही येण्यासाठी विनंती केली आहेच. आता पुढची लढाई... माहितीच्या अधिकारातून संवेदनशील माहिती हाती आली, गैरकारभार झाल्याचंही दिसतं आहे; पण पुढे काय? या माहितीचं काय करायचं? कोणाकडे दाद मागायची?

चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 05/08/2010 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा गेले १-२ दिवसातले सैपाकाचे धागे आणि संदिप खरे यांची अप्रतिम कविता चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! जरा चुकीचे, जरा बरोबर खर्डू काही ! चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! नव्या-नव्यां ह्या किती आयडी बघ धाग्यातुन - आजच आहे आला म्हणतो खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! हवेहवेसे 'शतक' तुला जर हवेच आहे नकोनकोते हलके चावट खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू उडले नाहीत धागे तोवर खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! तुफान पाहुन धाग

बाब्या आणि कार्टे

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 05/08/2010 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
असे का होत असावे? कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी म्हणून कौतुकाने वापरले जातात. कुणा कार्ल्यान्चे चे टंकीत धागे (अशुद्ध मराठी म्हणून?) एकामागून एक प्रतिबंधीत होतात. कुणी प्रविनभप्कर आक्रोश करतात "तुमच्या प्रतिसादावर आनि लेखनावर का हो नाही कोणी बोट ठेवत ?????? तुम्ही तर खुप जिव्हारी लागनारे लिहीता .. तरी त्यावर लोक हसतात ,, आम्ही समजुन सांगन्याच्या भाषेत लिहील तरी ते वाद घालतात .. " कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात. असे का होत असावे? कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?

माझा खाद्यप्रवास

लेखक दिनेश यांनी गुरुवार, 05/08/2010 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम (जुने आणि नविन) मिपाकरहो, आम्ही बिल्ला नंबर १६. मिपा सुरू झाल्यापासून आम्ही तसे वाचनमात्रच, कधीतरी प्रतिसादांच्या एखाददोन पिंका टा़कणारे, अन्यथा झाडावर बसून पॉपकॉर्नची पोती आणि कोकची पिंपे रिचवण्यात, खरडवह्या चघळण्यात आणि कधीमधी व्यनिमनीच्या गोष्टी करण्यात आम्हाला रस! पण गेल्या काही दिवसातले धागे वाचताना मचाणच बांधून बसायची वेळ आली आणि त्यामुळेच आमची कैफियत आपणासमोर आणण्यास आम्ही उद्युक्त झालो. (हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने चु भू द्या घ्या) आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या.

दुरावा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 04/08/2010 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा लाटेस भेटणारा किनारा शहारा चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा भ्रमरासाठी नटून बसलेले फूल मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा एकाच खिडकीस न्याहळीत बसता दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा

फिट्टंफाट

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 04/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला तो खूप वेळा भेटलाय, आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण अस म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं. लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं.

निस्सिम प्रेम

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी बुधवार, 04/08/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ती' इतकी सुंदर की, अप्सराही तिच्याकडुन beauty tips घेते. 'तिला' पाहून नदी ही स्वतःभोवती गिरकी घेते. 'तिच्या ' गालावरची खळी पाहून फुलपाखरेही हळूच लाजतात. 'तिचा' स्पर्श झाल्यावर गुलाब अधिकचं लाल होतात. 'ती' इतकी कोमल की, मोरपीसं 'तिला' काट्यासारखे रुततात. 'तिचे नयनरुपी तारे बघितल्यावर आकाशातले झगमगाटही फिके पडतात. 'तिच्या' चेहर्‍यावरची बट पाहतांना वाराही वाहता-वाहता स्तब्ध होऊन जातो. 'तिचे' प्रतिबिंब बघितल्यावर चंद्रही हलकेचं '
काव्यरस

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/08/2010 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे???