Skip to main content

नाचत नाचत येई मयुरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/08/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नाचत नाचत येई मयुरा नाचत नाचत येई मयुरा वर्षा आली फुलव पिसारा ||धृ|| मेघ वाजती धडधडधड धुम थेंब जलाचे पडती सरसून साथ देई घोंगावत वारा नाचत नाचत येई मयुरा ||१|| रान अवघे हिरवे होईल पिसार्‍यापरी सारे फुलवील आनंदूनी नाचवी डोई तुरा नाचत नाचत येई मयुरा ||२|| लयीत पावले तूझी टाकूनी डौलाने बघ मान उंचाउनी सुर केकाउनी कर पुकारा नाचत नाचत येई मयुरा ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०८/२०१०
काव्यरस

दुर्मुख

लेखक तिमा यांनी गुरुवार, 12/08/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ झाली होती. नेहेमीप्रमाणेच दुर्मुख स्वयंपाकघरात चहा घेत बसला होता. बेल वाजली. त्याने तत्परतेने दरवाजा उघडला. बायकोच्या हातातल्या जड पिशव्या आत आणून ठेवल्या. वॉश घेऊन आल्यावर तिने म्हटले," खायला आणले आहे, सामोसे आणि बंटीचा आज वाढदिवस आहे ना , म्हणून आइसक्रीमही आणले आहे." बिचारी दिवसभर नोकरी करुन स्टेशनवर उतरल्यावर, बाजारहाटही करत होती. दुर्मुखला नैराश्याचा झटका आल्यापसून तो घरातले काहीच काम करत नसे. ऑफिसला जाऊ लागला होता हेच नशीब! बायको त्याला चांगलीच संभाळून घेत होती. आईची चाहूल लागताच रुमचा दरवाजा उघडून बंटी बाहेर आला.

आणि मी सिगरेट सोडली...

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/08/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आणि मी सिगरेट सोडली... सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा!

लग्नानन्तर

लेखक अविनाश पालकर यांनी गुरुवार, 12/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला आवडत नाही तिने तिच्या लग्नानन्तर रस्त्यात त्याच्याशी बोलनं अणि त्याहुन खटकतं ते बोलताना खाली पाहुन मंगळ्सुत्राशी खेळणं
काव्यरस

मुंबई मीटर जाम.

लेखक हैयो हैयैयो यांनी गुरुवार, 12/08/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मीटर जाम. जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष: आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार. बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना! बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!! हैयो! हैयैयो!!

औदार्य...? ? ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 12/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर
काव्यरस

जातीनिहाय जनगणना

लेखक येडबंबू यांनी गुरुवार, 12/08/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार आता जातीनिहाय जनगणना करणार आहे म्हणे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6296105.cms हा सगळा ओबीसी ना आरक्षण देण्यासाठी चा फार्स आहे काय? तुम्हाला काय वाटते ? टीपः माझ्या मनात ओबीसी बद्दल कोणताही आकस नाही, क्रुपया व्यक्तीगत घेउ नये

जगन्याचि कला

लेखक अशक्त यांनी गुरुवार, 12/08/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.

वरंधा घाट

लेखक येडाखुळा यांनी गुरुवार, 12/08/2010 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता. पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं?