Skip to main content

वाचनखुणा

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 13/08/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
आधी प्रत्येक लेखाला वाचनखुण साठवायची सोय होती ती आता नाही...त्यामुळे वेगवेगळे लेख आणि मुख्य म्हणजे पाकृ साठवायला जमत नाहीत...कृपया वाचनखुणा हि सोय परत उपलब्ध करून द्यावी. आधीच्या एका धाग्यात बरेचदा विनंती करूनही सोय अजूनही उपलब्ध नसल्याने परत एकदा आठवण करून देण्यासाठी हा धागा काढला आहे. काही technical कारण आहे का कि हि सोय उपलब्ध करून देता येत नाही?

कलमाडी आणि राष्ट्रकुल भ्रष्टाचार

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 13/08/2010 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेश कलमाडी हा पुण्यातून कायम निवडून येत असलेला खासदार. कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. मागे कुठल्याशा स्पर्धांच्या वेळी चकाचक केलेले बाळेवाडीचे क्रीडासंकुल आज दयनीय स्थितीत आहे. पण त्याचे कुणाला फार सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कलमाडींनी तिथेही अमाप पैसा कमवला असे ऐकिवात आहे. मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही.

उकडी शेवया

लेखक कुक यांनी शुक्रवार, 13/08/2010 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य----२ वाडगे तादुळाचे पिठ, १ खोवलेला नारळ, पाव किलो गुळ, १ मोठा चमच तुप, वेलची पुड, मिठ.. क्रुति---- टोपात २ ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यात थोडे मिठ टाका. तादुळाचे पिठ त्यात घालुन मोदका प्रमाणे उकड काढुन घ्या परातित घेउन गरम असताना म़ळुन घ्या. मुठि एवढे गोळे करुन ठेवा. १ मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात हे गोळे घाला. गोळे प्रथम पाण्यत बुडतिल. गोळे पाण्यावर तरनगु लागतिल म्हणजे ते शिजले शेव पात्राला मोठि शेव जाळी लाउन गोळ्यानची शेव पाडुन घ्या. शेवेवर तुप घाला म्हणजे शेव एकमेकाना चिकटणार नाहि.

शिरा

लेखक कुक यांनी शुक्रवार, 13/08/2010 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- पाव किलो रवा, १२५ ग्र्याम तुप, २ कप दुध, २ कप पाणी, २ वाटी साखर ( आपल्या डायबिटीस नुसार प्रमान ठरवा )१ केळे , वेलचिपुड १ टे. स्पुन, चिमुठभर खाण्याचा कलर, काजु - मनुका आपल्या एईपतिनुसार क्रुती- ग्यास वर १ टोपात दुध व पाणी उकळ्त ठेवा. रवा चाळुण साफ करुन घ्या. नाहितर रवा नोन्-वेज होईल अळ्या असतिल तर. कढई रवा चान्गला लाल होईपर्यत भाजा. त्यातच तुप टाकुन चागले भाजा. उकळ्लेले दुध्-पाणी घाला. पाणी-दुध आटु द्या. म्हणजे रवा शिजेल. त्यात साखर घाला.ढवळा. केळे कुसकरुन घाला. काजु - मनुका-वेलची पुड-खाण्याचा रन्ग घाला चागले एकजिव कर. गरमा-गरम शिरा मिटक्या मारत खा.

आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 12/08/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुझाव??????? असो...नमस्कार्,नमस्कार....... आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला. मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल. तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ह

प्रेमपत्र

लेखक दिलीपकुमार यांनी गुरुवार, 12/08/2010 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमपत्र पहिले तिचे , सर्व काहीं सांगत होते. आतुरलेल्या भावनांना , शब्द्फुलांनी सजवले होते. सजवलेला प्रत्येक शब्द , फुलाप्रमाणे भासत होता . अवखळ तिच्या नखरयापरी, मनामध्ये ठसत होता . पत्र जेंव्हा वाचुन झाले , आनंदाला उधाण आले .

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 12/08/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे. - मी सर्वपित्री अमावस्येला करतो. ... चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे. - मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो. ... संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात. - मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो. ... बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे.

लव फळ

लेखक जागु यांनी गुरुवार, 12/08/2010 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्‍या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे. हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे.

(नाचत नाचत येई परा)

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 12/08/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाचत नाचत येई परा आला फुफाटा निराशा विसरा ||धृ|| सँडल वाजता टकटक टकटक झोत ब्याटरीचे पहाती सरसून स्टुल देई दाखवत कोपरा नाचत नाचत येई परा ||१|| क्याफे अवघा स्वर्ग होईल स्वप्न कालचे सत्य होईल आनंदूनी घेई हलकेच वारा नाचत नाचत येई परा ||२|| लयीत पावले तिची पाहुनी हळुच बघे मान वाकउनी सुर हलका धरुनी हाकारा नाचत नाचत येई परा ||३||
काव्यरस