Skip to main content

स्वतंत्र

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.

गोकुळ आहे!!!

लेखक कळस.. यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! विचार करावासा वाटतो कि आपल्यापेक्षा दिग्गज जेव्हा लेखन करीत असतील तर त्यांना प्रतिसाद द्यावा कि नाही. खर तर नवोदितांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. पण कधी कधी एकमेकावर उगवलेले टीकेचे सूड पाहता त्यांचा बद्दल असलेला पगडा थोडा का होईना ढासळतो. याचे कारण म्हणजे एकमेकांवरील केलेले [विनोदात्मक] शब्दांचे वार. हे सगळे वाचून बरा टाईमपास होतो पण हे होणे थोडे चुकीचे वाटते. कधी कधी दुर्भाग्यपूर्ण वाटते.

फ्लॉवर मुगडाळ आमटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लॉवर मुगडाळ आमटी हा प्रकार अगदी सोप्पा त्यातुन वेगळी भाजी नको करायला आणि घरात सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे आठवड्यातुन एकदा तरि मी करतेच.

झाड आणि माकड

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/08/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगल्या झाडावर माकड बसते" संदीपचे ते शब्द मला आजही बर्‍याचदा आठवतात. संदीप माझा समवयस्क माझ्याच कंपनीत सारखेच काम करणारा सहयोगी. "चांगल्या झाडावर माकड बसते" हे त्याचे निश्कर्ष. तो म्हणायचा की एखाद्या जोडप्यापैकी एकजण अगदी रुबाबदार असेल तर दुसरा/दुसरी एकदम फडतूस असतो/असते. तरतरीत चालणारी देखणी बायको आणि तिच्या सोबत पाय घसतत चालणारा मेंगळट नवरा. स्मार्ट रुबाबदार नवरा आणि त्याच्या सोबत वेंधळी बायको. मिठ्ठास बोलण्यात साखर पेरणी , हजरजबाबी असणारा नवरा आणि बहुतेक वेळा अबोल किंवा बोललीच तर कुजकट बोलणारी त्याची सहधर्मचारणी. समजूतदार नवरा आणि सतत तोंड चालवणारी त्याची पत्नी. आग्यावेताळ नवरा आणि स्वभाव

कणसूर

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 13/08/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे? कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे? लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की! हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे? दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे? बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते (शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे) पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे

शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 13/08/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
बीजिंग ओलम्पिक (८/८/८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर, शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०, १ मे ला जगासाठी खुले झाले, जगातील १७५ पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला आहे. हंग्पू नदीच्या काठी, ५ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर मध्ये बसलेले हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. चांगले (कि सुंदर ?) शहर, चांगले जीवन (BETTER CITY, BETTER LIFE) ह्या तत्वावर असलेल्या ह्या प्रदर्शनाच्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीत जगभरातून अंदाजे ७ करोड लोक भेट देतील अशी चीन ची अपेक्षा आहे. ह्या प्रदर्शनाची तारीफ करावी तेवढी कमीच.

मिसळपाव व्यवस्थापन

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 13/08/2010 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाववर नवीन काही सोय देताना किंवा काही बदल करतांना किंवा केल्या नंतर सर्व सदस्यांचे मत घेतले जाते. त्यावर एक धागा व्यवस्थापनाकडून काढला जातो त्यात्या विषयावर सदस्यांची जी मते आहेत ती मागवली जातात. सदस्यांनी आपले मत तेथे देणे अपेक्षीत असते. तसेच मिसळपाववर व्यवस्थापनाचा असा प्रयत्न आहे की ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांना मिसळपावच्या कामात सहभागी करून घ्यावे. या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा. मात्र एवढ्यात असे लक्षात आले आहे की काही धागे आणि काही निवडक प्रतिसाद हे मिसळपाव कसे असावे आणि कसे नसावे आदींवर केंद्रित आहेत.