Skip to main content

कट्टा ईन कॅलीफोर्निया

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 11/08/2010 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुढच्या आठवड्यात मी सॅन फ्रॅन्सिस्को मधे महिन्या-दोन महिन्यासाठी काही कामानिमित्त येणार आहे, अनायासे ओळखी पाळखीचा धागा निघाला होताच म्हणुन हा प्रपंच. तर आमच्या कंपनीने मला दोन महिन्यासाठी उसा मधे पाट्या टाकण्यासाठी बोलावले आहे, नंतर कदाचित मी एखाद्या वर्षासाठी ऑस्ट्रेलिया ला जाईन. मग मनात विचार आला की आपल्या बे एरिआमधल्या लोकांना भेटावं, आठवणी सोबत राहतील. :) . एक वीकांत माझ्या काकाच्या घरी (फ्रिमोंट मधे) करण्याचे ठरवुन एखादा वीकांत मिपाकरांसोबत कट्टा करण्याची ईच्छा आहे. श्रावण पाळत नसल्याने कट्टा सामिष+पेयपान असा माझ वैयक्तीक आग्रह.

जीणं

लेखक अमोल मेंढे यांनी मंगळवार, 10/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीही येतं आणी ... भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं... कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन... त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ... पळुन आले त्याच्या बरोबर... राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत... पण शेवटी राजानेच राणीचा घात केला... आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला... सुरुवातीला वाटायचं ... असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी... पण आता सवय झालीय... अन् कालची सीता.. आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय... तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन... गिर्‍हाईकांची वाट पाहणं... आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन... त्यांचं समाधान करणं... हेच आमचं जीणं.... हेच आमचं जीणं...
काव्यरस

आजचा शहाणपणा..........

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
***"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही." *** --------------------------------------------------------------------- "ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा." --------------------------------------------------------------------- *लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात... --------------------------------------------------------------------- आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले.......

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडे येताना मला काल पावसाने गाठले, जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....! भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी, वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची xyz...! जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव, तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...! तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली, लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...! "भिजत कशाला जातोस...?

प्रेम कस असाव ?

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस असाव ? क्षमाशील धरती सारख, विशाल आकाशासारख, लांबवर पसरलेल्या सागरासारख... ! प्रेम असाव आईच्या हृदयासारख, सगली दुःख सहन करूनही दुसर्यासाठी आणखी सुखाची अपेक्षा करणार...! वास्तवतेच्या आगीत होरपळून निघालेल्या तुमच्या मनाला सुखाचा, आनंदाचा ओलावा देणार... ! दिसत तस नसत, प्रेम ही असच असत, न कळत हृदयात घुसत, न जाण्यासाठी घर करून बसत.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

मार खाण्याची तयारी ठेऊन (शब्दांचा) व सर्वांची माफी मागुन (आधीच)

लेखक आप्पा यांनी मंगळवार, 10/08/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझे लिखाण नाही, संग्रह पण नाही, एका मित्राने काही वर्षापुर्वी एक ढकलपत्र पाठवले होते त्याचा अनुवाद आहे. आपण हे वाचलेही असेल.

काश्मिर आणि लेह

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 10/08/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे. यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर.

चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट

लेखक शरद यांनी मंगळवार, 10/08/2010 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच.