Skip to main content

गिफ्ट ऑफ मॅगी .

लेखक तर्री यांनी बुधवार, 13/10/2010 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी साहित्याच्या रसिकांना ह्या शीर्षकाने वाटेल , तर्री "तर्र" झाला की काय ? "गिफ्ट ऑफ मॅगी " पाककृती मधे कशी ? गल्ली चुकली बहुतेक ! मी पाककृती लिहीणार म्हणजे गल्ली चुकली बहुतेक हे खरेच आहे पण मंडळी शीर्षक ही बरोबर आहे. मी देत असलेल्या दोन पाककृती नेसले च्या " मॅगी " वर " बेतलेल्या " आहेत , म्हणून शीर्षक " गिफ्ट ऑफ मॅगी ". ह्या पाककृतीचे "झुणका" तथा " पिठले " ह्या दोनही पदार्थां बरोबर आणि "गरज ही शोधाची जननी " आहे ह्या म्हणी बरोबर घनिष्ठ संबंध आहे . पाककृती १. पिठले अथवा झुणका आवडी प्रमाणे करावा .

मी परत असं वागावं का ?

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 12/10/2010 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज कधी नाही ते पी.एम.टी. नं प्रवास करायचा योग आला,नेहमी प्रमाणं गर्दी होतीच. नियमाप्रमाणं काही सीट महीलांसाठी राखीव असतात. गर्दीमुळं बरेच लोक उभेच होते,त्यात बायकाचं जास्त होत्या.एका राखीव सीटवर ३ पुरुष बसून होते.मी बसमधल्या एका बाईंना म्हणालो की त्यांना उठायला का नाही सांगत नाही? त्यावर उत्तर मिळालं की,अहो हे रोजचंच आहे. मग मी त्यां तिघांना उठायची विनंती (खरचं !) यावर त्यांनी माझ्याबरोबर बरच भांडून घेतलं,अगदी 'बा'चा'बा'ची झाली.तू उतर तुला बघून घेतो इथवर झालं. कंडक्टरसाहेब 'नरो वा कुंजरो वा' होते.पण आमच्या भांडणात बसमधली एकसुद्धा बाई मधे पडली नाही, ज्यांच्यासाठी भांडत होतो.

तळलेल्या मिरच्या

लेखक जागु यांनी मंगळवार, 12/10/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिरच्या म्हटल म्हणजे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत. ह्या मिरच्यांचे बरेच प्रकार आहेत. तळण्यासाठी जाड्या मिरच्या घ्यायच्या. जाड्या मिरच्या बारीक मिरच्यांच्या मानाने कमी तिखट असतात. लागणारे साहित्य: ५-६ जाड्या मिरच्या बेसन गरजे नुसार हिंग हळद मिठ अर्धा चमचा मिरचीपुड तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका. एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे.

शापीत मेघ

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 12/10/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी ------ गणेशा
काव्यरस

अघटीत!!

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 12/10/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी चांगली मैत्रीण, कॉलेजमधे एकदम बब्ली गर्ल, एकदम एंथु, अस्खलीत ईंग्रजी बोलणरी, जगाची माहिती असणारी, सुंदर, चुलबुली, सर्वांना ती खुप आवडयची, मनमोकळा स्वभाव, हसत खेळत रहाणारी एक गोड मुलगी. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस टच मधे नव्हती.. गेले बरेच दिवस अचानक अचानक खुपच सोशल झाली.. मला शंका आली.. पण म्हंटल की असेल बुवा. कधी कधी ऑनलाईन यायची.. खुप विनोद करायची. आणि विनोदाची अपेक्षा ठेवायची. मला वाटलं काहीतरी चुकतय. मध्यंतरी एका मिपा सदस्याच्या कार्यक्रमाला तिला बोलावलं होतं, काही कारण काढुन तिने टाळलं. पुन्हा बरेच दिवस गेले, मग अचानक फिलॉसॉफिकल कोट्स, वेगवेगळे स्टेटसेस.

२ दिवस अक्षरभारती सोबत.

लेखक sandeepn यांनी मंगळवार, 12/10/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
        २ ऑक्टोबर ला अक्षरभारतीच्या टीम सोबत ग्रंथालय उभारण्यासाठी जाण्याची संधी आली. अक्षरभारतीच्या कामाची मला तशी सगळी माहीती होती पण प्रत्यक्षात काम करण्याचा योग आला नव्हता. म्हणुन यावेळेस आलेली संधी मि सोडली नाही.         अक्षरभारती ही एक NGO आहे जी गरजु शाळांमधे जावुन त्यांना ग्रंथालय स्थापुन देते. बरयाचशा शाळांमधे अशी ग्रंथालये नसतात,तेथील मुलांमधे वाचनाची आवड निर्मान व्हावी या द्रुष्टीने अक्षरभारती प्रयत्न करते. अवांतर वाचनाची पुस्तके या ग्रंथालयात असतात.