Skip to main content

धनदांडग्यांना अन्न, वस्त्र, अमर्याद निवारा. मग बाकीच्यांनी कुठे जायचे ?

लेखक गांधीवादी यांनी सोमवार, 11/10/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन १९९५, आयटी काळ भरभराटीला येण्यास सुरुवात झाली होती. घरांच्या किमती साधारणपणे ९००,१२०० प्रती चौरस फूट इतक्याच सीमित होत्या. पुढे ह्या क्षेत्राने भारी मारली आणि ४ अंकी दिसणारे पगाराचे आकडे ५/६ अंकांपर्यंत नेऊन ठेवले. तिथून सुरु झाली एक स्पर्धा, जास्तीत जास्त घरे घेण्याची. एक दोन करता करता काही जणांनी आपली पूर्ण संपत्ती पणाला लाऊन जास्तीत जास्त घरे आपल्या पदरात पडून घेतली आणि ती घरे आता भाड्याने देऊन आपली भविष्याची निश्चिंती केली. इथपर्यंत तरी सगळे ठीक होते, पण हळूहळू हे वेड वाढतच गेले आणि ज्याला त्याला जमेल तितकी घरे घेण्याची एक नशाच चढली.

मिपाकरांसाठी खुषखबर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो.

कुत्र्याचे शेपूट ...

लेखक मनीषा यांनी सोमवार, 11/10/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीला बाक, पोटाचा घेर बायको यायच्या आधी, काढून घेतो केर | पगाराचे पाकीट, जन्माची ठेव सत्यधर्म हाच आहे माझा देव || पण काय करू, लक्ष सारखे जाते शेजारणीकडे| आहो, माहीत आहे हो म्हणतात कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे|| लाडका पोर, माझ्या जीवाला घोर उद्योग पाहून वाटे, बरा फाशीचा दोर | परीक्षा, नोकरी - नस्से याच्या गावी, बाय डॅड, हाय मॉम फिरवीत म्हणतो चावी || सरळ सरळ रस्ते दिसती याला वाकडे | आहो, तरी बरं म्हणे कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे || ओढणी मॅचिंग, मॅचिंग चप्पल आधी जाते मंडळात, मग देवळात चक्कर | बाराचा मॅटीनी, सहाची भिशी गाठताना जीव मेटाकुटी येई || कधी वाटे, पुरे आता सोड

धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे!

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 11/10/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा - धोका पुढे दीर्घ आणि काही लोकांच्या मते वैचारिक प्रश्न मांडणारे लेखन आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे. डोक्याला त्रास झाल्यास गुंडोपंत जबाबदार नाहीत! सध्या मिसळपाव वरील सिद्धहस्त लेखक आणि अभ्यासक धनंजय यांचे लेखन येत का नाही, असा प्रश्न पडला. थत्ते यांच्या कृपेने धनंजयच्या खरडवहीत त्याचे उत्तरही मिळाले. ते पुढील प्रमाणे - सध्या संपादनाबद्दल आचारसंहिता फारच धूसर आहे.

गंधवार्ता

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ...................................
काव्यरस

मैत्रि (एक खोडकर ओलावा)

लेखक कल्पेश इसई यांनी सोमवार, 11/10/2010 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पेश इसई.(एप्रिल २०००) शाळेच्या काळातली..... शाळेतल्या एकाच बेन्च्वर बसण्यासाठी भान्डण करणारे... तर.. मधल्या सुटिमध्ये आम्बट लोणच्यालाही गोड चव आणणारेही ..तेच हे मित्र सरान्ना मुद्दामुन नाव सान्गणारे ... तर..मार बसु नये म्हणुन त्यान्च्याच समोर खोटे बोलणारेही ....तेच हे मित्र सरान्नी प्रश्न विचारल्यावर घाबरवणारे.. तर्..परिक्षेच्यावेळी येत नसलेले उत्तर सान्ग्ण्यासाठी इशारे करणारेही ....तेच हे मित्र कधिच विश्वास नाहि ठेवावा असे वाटणारे.. पण..
काव्यरस

कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी

लेखक रन्गराव यांनी रविवार, 10/10/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेले तीन महिने मी आर्किटेक्ट बरोबर काम करत होतो. बाकिच्या टिमचा काम आणि माझ काम आता रेल्वेच्या रूळासारखे समांतर चालले होते. सरांनी मला सांगितल होता -"Your code might not be part of the release now, but i'm sure it will be needed at some point of time." मी-" The convergence is going to be a nightmare. If they were to include my code at later point of time, they cant do it without affecting the design. " सर -" None the less continue your work." बनिया म्हणाला- " लगता है अपना प्रोडक्ट जल्दीही कोड कंप्लीट हो जायेगा.