Skip to main content

जीव तुझा कासावीस ...

लेखक वैभव देशमुख यांनी गुरुवार, 05/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तू गं उभी अंगणात माफी मागताना मला एका हातामधी झाडू एक कानापाशी गेला आधी पुंजा गोळा केला पुन्हा पांगून टाकला तुझं अंगण झाडणं असं उन्हाच्या वेळेला हसू फुटलं तरीही हसू दाबलं ओठात गेलो उठून घरात खोट्या रागाच्या भरात दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला... - वैभव देशमुख
लेखनविषय:

वाचने 1571
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला... .. वा, काय कल्पना आहे. आवडली.

सुंदर लय असते राजे तुमच्या कवितांना.

मस्तं कविता आहे आवडली. बाकी पुंजा म्हणजे काय? बाकी फटीशी डोळा लावल्यावर कासवीस होताना पाहणं स्वाभाविक आहे. कविता छान.

दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला मनात चलबिचल झाली ! भन्नाट ! ! लय भारी ! ! !

सर्वांचे मनपासून धन्यवाद...