Skip to main content

गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 30/12/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही - कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी 'Cooking from peasants and their wives' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे.

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

लेखक मितान यांनी गुरुवार, 30/12/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
"खजिना" चा अनुवाद करताना माझ्याजवळच्या खजिन्याचे विचार मनात येत होते. खरोखर प्रत्येकाजवळ फक्त त्याच्यासाठीचा अमूल्य खजिना असतोच असतो. खरंय हे. विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !" खूप अवघड होतंय हे सगळं. काही अनुभव सांगते.

क्रेपे (युरोपीयन डोसा)

लेखक गणपा यांनी बुधवार, 29/12/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले.

नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/12/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा--------------------------- महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा गरजले सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आहे आवाज मराठीचा तेजोमय तलवार तळपते येथे ललकार मराठीचा विवेधतेतला नाद साज मराठीचा एक चिंगार मराठीचा गणेशा
काव्यरस

विकी/गुगल : मदत हवी आहे

लेखक अवलिया यांनी बुधवार, 29/12/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! सध्या मी मिपा संकेतस्थळाचा सदस्य असुन आता मी गुगल आणि विकीचा वापर करुन प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंतर किमान दररोज २ तरी कोठेही, कोणत्याही प्रकारचे विकी आणि गुगल वापरुन प्रतिसाद देणार आहे. या पार्श्वभुमीवर मला काही प्रश्न पडले आहेतः (पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.) १. विकी अथवा गुगलवरुन माहितीचे मराठीकरण कसे करावे? २. मी असेही ऐकले आहे की गुगल ट्रान्सलेटचा वापर करुन हिंदीमधे भाषांतर करता येते, त्यावरुन मराठीकरण सोपे जाते. असे खरेच आहे का? ३.

मृत्यूपत्राविषयक माहिती

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 29/12/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मला मृत्यूपत्राविषयक माहिती हवी आहे. सद्ध्याच काही वेब साईटस वर वा काही जणांशी बोलून मी जी माहिती गोळा केली ती परस्पर विरोधी वाटली. कोणाला खालील पैकी माहिती असल्यास इथे लिहाल का? १. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का? २. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का? ३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते? अजून काही ह्या विषयासंबंधी काही माहिती कोणाला असल्यास ती इथे लिहिण्याची विनंती. धन्यवाद.

वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 29/12/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अ‍ॅटॅक करायचा...!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!) सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा.

लझिझ बिर्यानि विथ चिकन बटर ग्रेवि...............

लेखक पियुशा यांनी बुधवार, 29/12/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी बिर्याणी साठी : - अर्धा किलो तांदूळ ,अर्धा किलो चिकन , ३ चमचे दही ,तमालपत्र ,शहाजिरे ,दालचिनी , लवंग ,काळेमिरे,मोठा वेलदोडा , आल लसून पेस्ट २ चमचे , २ मोठे कांदे उभे चिरलेले ,२ मोठे टोमाटो चिरलेले ,.कोथिंबीर ,हिरवी मिरची ५-६ ,हळद ,मीठ .१-२ चमचे बिर्याणी मसाला ,१ चमचा लाल तिखट कृती :- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा , चिकन मध्ये थोडेस दही ,हळद,आणि आल लसून पेस्ट घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या ,पाणी थोड जास्त अस