पाकिस्तानी नागरिका बरोबर लग्न करुन तीने भारतासाठी पदक कमवावे हे पाकिस्तानी नागरिकाना अपमानास्पद आहे असे मला वाटते.
सानियाचे हार्दिक अभिनंदन... तिला भारत प्रिय आहे हे ह्या वरुन सिध्द होत नाही का?
सानियाचा एखादातरी फोटो टाकायला हवा होतात
हॅ हॅ हॅ!!
फोटो टाकण्यात आम्ही माहीर आहोत. पण सध्या मिपावरील कौलात फोटो काय पण कौल टाकण्यामागची पार्श्वभूमी विशद करायलादेखिल जागा नसते!
बरं, पार्श्वभूमी ही पहिला प्रतिसाद म्हणून टाकावी तर, तो ही (इंचा-इंचाने) खाली जातो!
मिपा तंत्रज्ञ, वाचताहात ना?
माझ्या मते, अशा स्पर्धांत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे, त्या देशाने नागरीकत्व असणे ही पूर्वअट असावी.
अर्थातच! मी अजाण असून देखील असेच असेल असे म्हणतो... माझ्या वरच्या उत्तरात काहीसा गर्भितार्थ होता, पण तो फारच अस्पष्ट झाला (विशेष करून त्यातील नागरीकत्वाच्या प्रश्नामुळे).
मला कौलातील प्रश्नातील "पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करूनही" ह्या वाक्याचा काही संबंधच नाही असे वाटत होते. तीने कुणाशी/कुठल्या देशाच्या नागरीकाशी लग्न केले हा तिचा प्रश्न झाला. नाहीतर उद्या कोणी ब्रिटीश/अमेरिकन नागरीकाशी माधुरी दिक्षितने लग्न करून नंतर "आजा नचले" मधे भुमिका केली म्हणून आपण (तुम्ही-मी) स्वतःला भारतीय आहोत असे म्हणायला लाज वाटते असे म्हणण्यातलाच प्रकार आहे... ;)
मुळात सानियाने पाकिस्तानी माणसाशी लग्न केलं तर तिने आपलं भारतीय नागरिकत्त्व सोडावं असा हट्ट का? तिचा नवरा भारतीय झाला तर, किंवा दोघांनी आपापलं नागरिकत्त्व राखलं तर काय अडतं?
सानियाचं रौप्य पदकासाठी अभिनंदन. पुढच्या वेळेस तिला सुवर्ण पदकासाठी शुभेच्छा.
(तशाही आमच्या शंका नेहमीच वेडगळ असाव्यात. :) )
लग्नानंतरचं सानिया मिर्झाचं नागरिकत्व कोणतं आहे?
(आम्हाला ऐकिव माहितीवर 'ग्रीनकार्डासाठी की असंच कायसं असतं त्यासाठी लग्न करणारे लोक असतात' असं कळलं होतं. )
कायदा काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय विवाह केल्यानंतर नागरिकत्व कोणतं मिळतं?
की पती-पत्नी दोघांनाही आपापले मूळ नागरिकत्व अबाधित ठेवण्याचा हक्क असतो?
अबाधित ठेवले असेल तर (इथे पत्नीचा विषय आहे म्हणुन हा प्रश्न) त्या स्त्रीला पतीच्या देशामध्ये किती काळ रहाण्याचा हक्क असतो?
अशा व्यक्तीला तिच्या जोडीदाराचा देश इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपला व्हिसा देऊ शकतो का?
उत्तर हो असल्यास, जर नागरिकत्व नाही, तर तो देश त्या व्यक्तीस व्हिसा कसा देऊ शकतो? काही विशेष तरतूद असते का?
पाकिस्तान टेनिस फेडरेशन किंवा आणखी कोणती अशी संघटना ह्यामध्ये 'महिला टेनिस'चा संघ आहे का?
संघ नसल्यास, महिला टेनिसबद्दल पाकिस्तानी क्रिडाखात्यातर्फे एखाद्या खेळाडूस काही मदत असते का?
-----
ह्यापैकी कोणत्याही प्रश्नाचं माझ्याकडं उत्तर नाही. त्यामुळं ह्या कौलावर मतप्रदर्शन करण्याची माझी पात्रता नाही असे मी समजतो. :)
* आंतरराष्ट्रीय विवाह केल्यानंतर नागरिकत्व कोणतं मिळतं?
अशा परिस्थितीत नागरिकत्त्वासाठी अर्ज करावा लागत असावा; ऑपॉप मिळत नसणार. सोनिया गांधींचं उदाहरण आहे.
* की पती-पत्नी दोघांनाही आपापले मूळ नागरिकत्व अबाधित ठेवण्याचा हक्क असतो?
काहीच केलं नाही तर पारपत्र (पासपोर्ट) इनव्हॅलिड होत नसावं. सोनिया गांधींचा इटलीचा पासपोर्ट त्यांच्या लग्नानंतर बरीच वर्ष व्हॅलिड होता.
* अबाधित ठेवले असेल तर (इथे पत्नीचा विषय आहे म्हणुन हा प्रश्न) त्या स्त्रीला पतीच्या देशामध्ये किती काळ रहाण्याचा हक्क असतो?
ते व्हीजावर अवलंबून असावं.
* अशा व्यक्तीला तिच्या जोडीदाराचा देश इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपला व्हिसा देऊ शकतो का?
प्रश्नच चुकीचा वाटतो (किंवा मला प्रश्न समजला नाही आहे). या केसमधे या दोघांना समजा ऑस्ट्रेलियात जायचं आहे तर पाकिस्तान किंवा भारत यांना व्हीजा कसा देणार?
* उत्तर हो असल्यास, जर नागरिकत्व नाही, तर तो देश त्या व्यक्तीस व्हिसा कसा देऊ शकतो? काही विशेष तरतूद असते का?
>>अशा परिस्थितीत नागरिकत्त्वासाठी अर्ज करावा लागत असावा; ऑपॉप मिळत नसणार.
असेल नसेल च्या शक्यता नाही वापरता येणार ना?
>> सोनिया गांधींचं उदाहरण आहे.
हॅ हॅ हॅ!!! सोनिया आणी सानिया मध्ये फक्त एका मात्र्याचा फरक असला तरी पुढचं नाव बरंच वेगळं होतं नै का? ;)
>>काहीच केलं नाही तर पारपत्र (पासपोर्ट) इनव्हॅलिड होत नसावं.
पण मग त्या देशात कसं राहता येईल? (मी एक व्यक्ती म्हणुन विचारतोय. गांधीघराण्याची 'पावर' वायली.)
>>सोनिया गांधींचा इटलीचा पासपोर्ट त्यांच्या लग्नानंतर बरीच वर्ष व्हॅलिड होता.
सोनिया राजीव गांधी ह्यांच्याबाबत नियमांवर बोट ठेवता येतं का किंवा येत होतं का?
>>ते व्हीजावर अवलंबून असावं.
म्हणजे? टुरिस्ट व्हिसा सलग कितीवेळा मिळु शकतो? की त्यामध्ये काही तरतूदी आहेत?
टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा असा कोणत्या प्रकारचा व्हिसा असतो की ज्यायोगे अशा लोकांना रहाता येऊ शकतं?
प्रश्नच चुकीचा वाटतो (किंवा मला प्रश्न समजला नाही आहे). या केसमधे या दोघांना समजा ऑस्ट्रेलियात जायचं आहे तर पाकिस्तान किंवा भारत यांना व्हीजा कसा देणार?
आय माय स्वारी!
विचारांच्या गडबडीत मीच चुकलो. तो प्रश्न रद्दबादल.
>नॉट अॅप्लिकेबल.
पुन्यांदा आय माय स्वारी.
प्रिय धमाल,
अमेरिकेतील ग्रीन कार्ड किंवा आम्हाला इंडोनेशियात मिळते तसले Permanent Residence Permit सोनियाताईंना मिळाले असेल. (मला अर्थातच नक्की माहीत नाहीं). गांधी घरण्याशी संबंध असल्याने फायदा जरूर होईल, पण त्याची आवश्यकता नसावी. एकाद्या भारतीय व्यक्तीशी केलेला विवाहसुद्धा अशी status मिळवून देऊ शकतो.
अशा व्यक्तीला आपले मूळ नागरिकत्व अबाधित ठेऊन Alien म्हणून Permanent Residence Permit दिलेल्या राष्ट्रात हवे तितके दिवस रहाता येते. असे अमेरिकेत ग्रीनकार्डवाले माझे अनेक मित्र खूप वर्षे राहिले होते. (अलीकडे कायदा बदलला असल्यास माहिती नाहीं)
इंडोनेशियात बरीच वर्षे Permanent Residence Permit घेऊन रहाणारे कांहीं लोक मला माहीत आहेत. प्रत्येक देशाचे कायदे एकसारखे नक्कीच नसणार!
अर्थात सोनियाताईंची केस काय आहे याची मला माहिती नाहीं.
सानियाचं लग्न झाल्यानंतर तिला आणि तिच्या वडिलाना पत्रकारानी हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यानी असं उत्तर दिलं होतं की
१. सानिया भारतीय नागरिकत्व ठेवणार आणि भारतीय पासपोर्ट च वापरणार.
२. ती नजीकच्या काळातील सगळ्या स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व करणार (तिचं सिलेक्शन होत राहील तोपर्यंत).
३. सुरक्षिततेच्या कारणासाठी सानिया व शोएब दुबईत रहातील.
लग्नानंतरच्या पाकिस्तानातील स्वागतसमारंभासाठी तिला अगदी थोड्या कालावधीचा आणि फक्त १/२ ठिकाणी जाण्यासाठी व्हिसा मिळाला होता.
अर्थात, हे सगळं मी पेपेरमधे वाचलेलं एवढंच आठवतं. त्यात किती तथ्य आहे आणि इतर कायदेशीर बाबींचा गुंतवळा काय आहे, मला माहिती नाही.
>>३. सुरक्षिततेच्या कारणासाठी सानिया व शोएब दुबईत रहातील.
जर खरंच सुरक्षा पहिजे असेल तर दुबईला जाण्याची गरज नाही असे वाटाते, भारतात सुद्धा Z+ सिक्युरिटी मिळु शकते. फक्त एक करायचं 'माय नेम ईज खान' कुठे लागला आहे ते बघुन तिथेच संसार मांडायचा.
एवढं कसं साध कळत नाहि देव जाणे. आमच्या सरकारने इतकि चांगली उपाययोजना केली असुन सुद्धा तिचा लाभ घेत नाहीत.
टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा असा कोणत्या प्रकारचा व्हिसा असतो की ज्यायोगे अशा लोकांना रहाता येऊ शकतं?
द्मु, भारतीय लोकांशी लग्न केलेल्यांना PIO (persons of Indian Origin) कार्ड मिळवता येतं. हे कार्ड १५ (+१०) वर्ष व्हॅलीड असतं. हे कार्ड आणि योग्य पासपोर्ट असेल तर भारतात येण्यासाठी वेगळा व्हीसा लागत नाही. बांग्लादेश आणि पाकिस्तानी पासपोर्ट धारकांसाठी मात्र काही वेगळे नियम असावेत.
संदर्भः www.mha.nic.in/pdfs/oci-chart.pdf
आता 'गांधी' आडनावामुळे सोनियांना असं कार्ड कदाचित काहीच त्रास न होता मिळालं असेल, इतर कोणाला थोड्या खेपा माराव्या लागतील.
नाही, मूळ भारतीय वंशाच्या पण सध्या इतरत्र वास्तव्यास ( दुसर्या देशांच नागरिकत्व स्वीकारलेल्या )असणार्यांना PIO (persons of Indian Origin) कार्ड मिळतं. त्याचीच सुधारित आवॄती OCI (Overseas citizens of India).
लाइफलाँग मल्टिपल एंट्री व्हिसा मिळतो. पण हे (मूळ) भारतीयाशी लग्न झालेल्या व्यक्तिला नाही मिळतं. ( अर्थातच पाकिस्तान, बांग्लादेश इ. ठिकाणी नागरिकत्व घेतलेलं असल्यास वेगळे नियम आहेत ).
सोनिया गांधींना हे कार्ड कधीच मिळणार नाही. पण राहुलगांधीनी उद्या इटलीचे नागरिकत्व घेतलं तर त्यांना हे कार्ड मिळू शकतं, पण हे कार्ड घेउन भारताचं प्रतिनिधीत्व करता येणार नाही.
मी त्या पीडीएफ फाईलमधे वाचल्याप्रमाणे भारतीय पासपोर्टधारकाशी लग्न केल्यासही हे कार्ड मिळू शकतं. PIO हे नाव त्यांच्यासाठी चुकीचं ठरतं, पण त्यांनाही हे कार्ड मिळू शकतं असं त्याच फाईलमधे (आणि इतर काही संस्थळांवरही) वाचलं.
हे एक रौप्य पदक सोडलं तर आत्ता पर्यंत ३० सुवर्ण २२ रौप्य आणि २७ कांस्य पदक मिळाली आहेत.
पण त्या बद्दल एक चकार शब्द नाही कुठे.
या एकटीचेच का लाड चालवले आहेत मिपावर?
सुनील यांनी का धागा काढला याचा संदर्भ थोडासा वेगळा आहे/असावा याची मला कल्पना आहे. त्यामुळे त्यांना हे व्यक्तीगत नाही. मात्र गणपाचा प्रश्न वाचून खालील सुचले...
जर तुम्ही धार्मिक असाल तर "स्वधर्मीय" जिंकला तर अभिमान वाटतो
जर तुम्ही जातीय असलात तर "स्वजातीय" जिंकला तर अभिमान वाटतो
जर तुम्ही मनसे/शिसे इष्टाईल असाल तर तुम्हाला "मराठी" जिंकला तर अभिमान वाटतो
जर तुम्ही मुंबईतील "कॉस्मोपॉलीटन" असाल तर तुम्हाला "अमराठी" जिंकला तर अभिमान वाटतो
जर तुम्ही स्वतःला "सेक्यूलर" समजत असाल तर "अहिंदू" जिंकला तर अभिमान वाटतो (किमान जाहीर कौतूक करावेसे वाटते)
जर तुम्ही "वैश्विक" असाल तर तुम्हाला अभिमान न बाळगण्याचाच अभिमान वाटतो
;)
विकासराव आमच्या चष्म्याला काचाच नाहीत हो. :)
सानियाने पदक मिळवल त्याच कौतुक आहेच पण मग बाकीच्या खेळाडुंबद्दल कसलाच उल्लेख आजवर झाला नाही.
जर का माझ्या नजर चुकीने काही वाचायच रहुन गेल असेल तर कृपया दुवा द्या. (हा हट्ट नाही.)
मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला.
जर का माझ्या नजर चुकीने काही वाचायच रहुन गेल असेल तर कृपया दुवा द्या.
चष्म्याचा नंबर तपासा बर. ;)
मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला.
मला नाही वाटत ताकाला जाऊन भांडे लपवले गेले असे. ;) पण त्याबद्दल कौलप्रस्तावक श्री. सुनीलच अधिक सांगू शकतील.
मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला
कौल किंचित खोडसाळ (मिश्किल) जरूर आहे पण धार्मिक्/जातीयवादाला खतपाणी घालणारा निश्चितच नाही. निदान माझा हेतू तरी तसा नव्हता!
बाकी निकाल रोचक आहेत!
सोनियाताईंनी राजीवजींच्याबरोबर विवाह केल्यावरही कित्येक वर्षें आपले मूळ इटलियन नागरिकत्व त्यागले नव्हते. आणीबाणीनंतर कै. इंदिराजी राजकीय वनवासात गेलेल्या असतांना राजीवजी आणि दोन्ही मुले यांना घेऊन सोनियाताई इटलीतच होत्या असेही विकीपीडियात वाचले. राजीवजींनी राजकारणात प्रवेश केल्यावर जेंव्हां पंतप्रधानकीची खुर्ची खुणावू लागली तेंव्हांच (१९८३ साली) त्यांनी आपला इटालियन पासपोर्ट परत केला व त्याच वेळी (बहुदा) त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले असावे. त्यांचा विवाह १९६८ साली झाला होता म्हणजे तब्बल १५ वर्षांनी त्या भारतीय झाल्या!
आपण सर्व भारतीय नागरीक मूळच्या परदेशी असलेल्या (व 'सोयी'साठी भारतीय झालेल्या) सोनियाताईना राष्ट्रपती व पंतप्रधान अशा श्रेष्ठींच्या नेमणुका करायलासुद्धा मुभा देतो. मूळ इतालियन असलेल्या बाईला इतके स्वातंत्र्य असताना जन्माने भारतीय असलेल्या व अद्याप भारतीयच असलेल्या सानियाने भारताचे प्रतिनिधित्व केले त्यात कुणालाही कां आपत्ती यावी?
सानियाने पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे त्यात नाक खुपसायचे कुणालाच कारण नाहीं.
मला हा विवाह आवडला नाहीं तो केवळ नवर्याच्या धाकात व नवर्याच्या सांगण्यावरून तिच्या हातून देशद्रोही कृत्य होऊ नये एवढ्या एकाच कारणामुळे. एवढी काळजी तिने घेतली म्हणजे झाले!
प्रतिक्रिया
भारतीय असल्याची लाज वाटते
मला वाटते....
In reply to भारतीय असल्याची लाज वाटते by आनन्दा
++१००
In reply to मला वाटते.... by वेताळ
हाहाहा
In reply to ++१०० by पैसा
सहमत
In reply to भारतीय असल्याची लाज वाटते by आनन्दा
इतर ला मत दिले आहे. तिने
In reply to भारतीय असल्याची लाज वाटते by आनन्दा
भारताच्या खात्यात एक रौप्य
हम्म
In reply to भारताच्या खात्यात एक रौप्य by अप्पा जोगळेकर
इतर
पूर्वअट
In reply to इतर by विकास
अर्थातच
In reply to पूर्वअट by सुनील
मुळात सानियाने पाकिस्तानी
In reply to अर्थातच by विकास
विक्षिप्त बाईंशी १००% सहमत
In reply to मुळात सानियाने पाकिस्तानी by ३_१४ विक्षिप्त अदिती
वेडगळ शंका...
In reply to मुळात सानियाने पाकिस्तानी by ३_१४ विक्षिप्त अदिती
- आंतरराष्ट्रीय विवाह केल्यानंतर नागरिकत्व कोणतं मिळतं?
- की पती-पत्नी दोघांनाही आपापले मूळ नागरिकत्व अबाधित ठेवण्याचा हक्क असतो?
- अबाधित ठेवले असेल तर (इथे पत्नीचा विषय आहे म्हणुन हा प्रश्न) त्या स्त्रीला पतीच्या देशामध्ये किती काळ रहाण्याचा हक्क असतो?
- अशा व्यक्तीला तिच्या जोडीदाराचा देश इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपला व्हिसा देऊ शकतो का?
- उत्तर हो असल्यास, जर नागरिकत्व नाही, तर तो देश त्या व्यक्तीस व्हिसा कसा देऊ शकतो? काही विशेष तरतूद असते का?
पाकिस्तान टेनिस फेडरेशन किंवा आणखी कोणती अशी संघटना ह्यामध्ये 'महिला टेनिस'चा संघ आहे का? संघ नसल्यास, महिला टेनिसबद्दल पाकिस्तानी क्रिडाखात्यातर्फे एखाद्या खेळाडूस काही मदत असते का? ----- ह्यापैकी कोणत्याही प्रश्नाचं माझ्याकडं उत्तर नाही. त्यामुळं ह्या कौलावर मतप्रदर्शन करण्याची माझी पात्रता नाही असे मी समजतो. :)माझी ऐकीव माहिती + कॉमन सेन्स
In reply to वेडगळ शंका... by धमाल मुलगा
पुन्हा माझा वेडगळ्पणा
In reply to माझी ऐकीव माहिती + कॉमन सेन्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशा व्यक्तीला Alien म्हणून हवे तितके दिवस रहाता येते.
In reply to पुन्हा माझा वेडगळ्पणा by धमाल मुलगा
सानिया मिर्झा
In reply to अशा व्यक्तीला Alien म्हणून हवे तितके दिवस रहाता येते. by सुधीर काळे
>>३. सुरक्षिततेच्या कारणासाठी
In reply to सानिया मिर्झा by पैसा
टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा
In reply to पुन्हा माझा वेडगळ्पणा by धमाल मुलगा
नाही, मूळ भारतीय वंशाच्या पण
In reply to टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी त्या पीडीएफ फाईलमधे
In reply to नाही, मूळ भारतीय वंशाच्या पण by पुष्करिणी
हॅ हॅ हॅ
सहमत आहे.
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
+२. सहमत आहे. आमचे मत
In reply to सहमत आहे. by अवलिया
सानिया म्हणते, एकेरीचा सामना
In reply to +२. सहमत आहे. आमचे मत by llपुण्याचे पेशवेll
पहिल्या उत्तराला मत दिले आहे.
बाकिच्यांनी काय घोडं मारलय?
चष्मे
In reply to बाकिच्यांनी काय घोडं मारलय? by गणपा
विकासराव आमच्या चष्म्याला
In reply to चष्मे by विकास
नंबर
In reply to विकासराव आमच्या चष्म्याला by गणपा
हेतू
In reply to विकासराव आमच्या चष्म्याला by गणपा
नवर्याच्या सांगण्यावरून तिच्या हातून देशद्रोह होऊ नये एवढेच!
In reply to बाकिच्यांनी काय घोडं मारलय? by गणपा
सानियाचा फोटो..