Skip to main content

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/12/2010 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ|| आम्ही चालवतो गाडी बैलांची तिला गरज नाही इंधनाची धान्याची पोती आणतो घरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१|| पोळा साजरा करतो दरवर्षी दुधासाठी पाळतो गाईम्हशी भुमातेची करतो चाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२|| रात संपून उजाडती पहाटं भल्या सकाळी कारभारीन उठं घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं न्याहारीसाठी करती झुनका भाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३|| उन्हातान्हात कामं सारी करतो रातंदिस राबराब राबतो कर्ज काढूनी खत पि
काव्यरस

भजाची आमटी---

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 30/12/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- एक वाटी बेसन पिठ, लसुण, मिरची, जिरे,ओले खोबरे पेस्ट, भजी तळण्यासाठी तेल, कोथिंबीर बारी़क चिरलेली, मिठ चवीनुसार्,दोन आमसुले, गुळ थोडासा.

खरे काय नी खोटे काय ?

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 30/12/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही बघतो, बातम्या वाचतो येताजाता चर्चाही ऐकतो कोण बरोबर, चूक कोण कधीच मला कळंत नाय खरे काय नी खोटे काय आदीवासींच्या जमिनी गेल्या .. सरकार म्हणते योजना दिल्या खाणी गेल्या, भाकरी गेली ..

उत्प्रेक्षा

लेखक शरद यांनी गुरुवार, 30/12/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
उत्प्रेक्षा उपमा आणि उत्प्रेक्षा यात फ़रक काय ?. प्रस्तुत आणि अप्रस्तुत यातील साम्य दाखविणे हा दोघांचाही उद्देश. उपमेमध्ये सादृश्यवाचक शब्द सम, परी, प्रमाणे , जैसे वगेरे असतात. उत्प्रेक्षेमध्ये हे जणुं काही, कीं , भासे असे असतात. वरवर पहाता हा फ़रक किरकोळ वाटेल. तर मग थोडॆ खोलात जाऊं. उपमेय हे जणु काय उपमानच आहे अशी जेव्हा संभावना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. संभावना म्हणजे उत्कट कोटीचा संदेह.असे बघा, कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकाराचे असू शकते. [१] निश्चित ज्ञान. खरे असेल वा खोटे, पण शंकेला वाव नाही. [२] संदिग्ध. दोनही बाजू ख़या असतील वा खोटया असतील असे वाटते.

एक suggestion : "मदत हवी आहे" नावाची लिन्क

लेखक Pearl यांनी गुरुवार, 30/12/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक मंडळाला एक suggestion द्यावेसे वाटत आहे. १ कल्पना सुचवावी असे वाटत आहे. पहा बर कशी वाटते कल्पना. स्वगृहावर खालील लिन्क्स आहेत. त्यामध्ये "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क add करावी असं मला वाटतं. स्वगृह चर्चा काव्य साहित्य छंदशास्त्र पाककृती कलादालन कौल संपादकीय नवे लेखन कारण बरेच जणांना मदत लागते किंवा माहितीची देवाण-घेवाण करायची असते, त्यावर काथ्याकूटच झाल्या पाहिजेत असे काही धागाकर्त्याचे प्रयोजन नसते. पण अशा वेळी तो विषय वरीलपैकी कोणत्या विभागामध्ये टाकावा असा प्रश्न पडतो. तेव्हा धागाकर्ता 'काथ्याकूट' किंवा 'खरडायचा फळा' विभागाची निवड करतो.

जोएल कटलर..

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/12/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
कुठूनतरी मरणाशी संबंध असलेली पोस्ट वाटली तरी त्यातली आशा सर्वांना दिसेल अशी आशा आहे. ............
त्याचं नाव जोएल कटलर.
तिचं नाव क्रिस्टीन कटलर. जोएलची बायको.
त्यांना चार मुलं आहेत. सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत. वेळ सेटल्ड.
जोएलनं आयुष्यभर कष्टाची कामं केली.

उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप

लेखक जागु यांनी गुरुवार, 30/12/2010 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: सुरण मिठ तुप चिंच कोळ पाककृती: सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते. सुरणाची पातळ चकती काढून घ्या. चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्‍या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे. ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या.

स्वागत २०११ !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 30/12/2010 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चे स्वागत करुयात !!! २०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे. हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही. आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!