ढेकणांचा अड्डा
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण
भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून
पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा
फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा
झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या
अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा
आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती
त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती
तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी
दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी
भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे
नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे
पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे
गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस
मिसळपाव
एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ...
सामग्री:
२ अंडी
१ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा)
१०० ग्राम बटर
१ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता)
१/४ कप चॉकलेट चिप
१/४ कप कोको
१/४ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा सोडा
१ चमचा व्हेनीला इसेन्स
मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात.