फक्त मिसळपावमुळे
फक्त मिसळपावमुळे
आम्हाला लिहायला उत्साह येतो
आम्हाला नवीन माहिती मिळते
आम्ही निसर्गाची विविध रूपे पाहतो
एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो
फक्त मिसळपावमुळेच
अनिल आपटे
भाजणीच्या थालिपीठाचे पीठ
कसे करायचे? इथे तयार पीठे मिळतात त्यातुन भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे बनवायचे?
आत्मविश्वास
प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!
त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं.
स्वप्न बघायला हरकत काय ..!!
प्रेम ..!!.
प्रेम अगदी मस्त असते
प्रेमाचे एक गाणे असते
बाईकवर बसले
की ते छान फुलून येते
कळीचे फुल होते
सुरवटाचे फुलपाखरू होते
प्रेम अगदी मस्त असते
कसे होते ..?
कधी होते ...?
ते कळते कोठे ..?
हे सगळे नकळत होते
म्हणून ते प्रेम असते
शांत रस्ता
छान ढग
आता प्रवास छान होईल
छान हवा गाणे गाईल
गळ्यात असतात
लडिवाळ हात
गालावर रेंगाळतात
अलगद श्वास ....!!
हे खूप छान असते
हे खूप छान वाटते
मस्त मस्त हवा
नि हवे तेवढे सुख
मन तृप्त....
काव्यरस
गंध मायेचे..
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी
मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी!
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे
गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता
वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला
परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने
काव्यरस
वर्हाडी खिचडी
मला आठवते, मी लहान असताना, मामाच्या गावाला गेले होते. माझे आजोळ म्हणजे, जळगाव मधील चाळीसगाव. तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते. ते सगळेजण मला जेवायला घेउन गेले. तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा ही खिचडी खाल्ली.
तेव्हा त्या सगळ्यांनी मला मसाले भात आहे असे सांगितले. मला आठवते, आम्ही सगळे अक्षरशः पराती मधे ही खिचडी घेउन मस्त ओरपली होती.
तेव्हा पासुन ही वर्हाडी खिचडी माझा अगदी weak ponit आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या मामीनी मला केळवण म्हणुन ही खिचडीच केली होती.
मिसळपाव