मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स

खादाड अमिता · · पाककृती
एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ... सामग्री: २ अंडी १ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा) १०० ग्राम बटर १ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता) १/४ कप चॉकलेट चिप १/४ कप कोको १/४ कप दूध १ चमचा बेकिंग पावडर १ चमचा सोडा १ चमचा व्हेनीला इसेन्स मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात. म्हणजे सर्व ओली सामग्री एका बाउल मध्ये मिक्स करायची आणि सर्व कोरडी सामग्री वेगळ्या बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि मग ओल्या सामग्री च्या भांड्यात, मैद्याचे मिक्स घालून, नित फेटून त्याला बेक करायचे. ह्या मफिन्स मध्ये कोको आणि चोकलेट चिप्स दोन्हीचा वापर केल्या मूळे ह्याचे नाव - डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स असे आहे. मफिन्स चे साचे नसतील तर ह्याला केक च्या भांड्यात पण बेक करता येते. तर सोप्प आहे. अंडी, बटर, दूध आणि व्हेनीला इसेन्स एका भांड्यात चांगल मिसळून घ्या. मग दुसर्या भांड्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, कोको, बेकिंग पावडर, सोडा, चॉकलेट चिप, साखर असे नीट कालवून घ्या. आता ओल्या मिश्रणात कोरडे जिन्नस थोडं थोडं घालून नीट एकजीव होईपर्यंत कालवा. मफिन्स किंवा कप केक च्या साच्यात ह्याला बेक करा. १८० डिग्री ओव्हन टेम्प्रेचर वर २०-२५ मि लागतील.

वाचन 6433 प्रतिक्रिया 0