Skip to main content

भीती

लेखक धोणी यांनी सोमवार, 13/06/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, आपण आयुष्यात कधी न कधी भितो, आपल्याला कोनची न कोनची भीती वाटते , इथे कसे काही नवीन आयडी जुन्या तगड्या, आयडींना घाबरतात असो तर.. तुम्हाला कोणाची भीती वाटते , मांडा इथे.. आपण जरा चर्चा करून यावर .. आणि हा धागा एकोळी नाही.. याची कृपया नोंद घ्यावी

शाळाचे शुल्क ..

लेखक शाहिर यांनी सोमवार, 13/06/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या काळात (१२-१५) वर्षापूर्वी बालवाडी- प्राथमिक शाळाचे शुल्क २००-३०० रुपये प्रती वर्ष असायचे ...आता पुन्या मधे ते ३००००-६०००० आहे ..(बाणेर परिसरा मधे व सिन्हगड रस्ता ).. एवढे शुल्क पाहता काहि प्रश्न पडतात.. १. या शाळा मधे असे काय शिकवतात? २. महागडे म्हाणजे चान्गले का?? ३.बालवाडी पुर्व गटा चे शुल्क देखील २०,००० आहे.. एवढे देण्यचा पाल्यास काहि फाय्दा होतो का? ४. हे शुल्क वाजवी आहे कि लूट ??

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला. स.न.वि.वि दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे. डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.

पर्सनल अकाऊंट

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 13/06/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...
काव्यरस

जय जय लंबोदरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/06/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय लंबोदरा
जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| विनंती आमची तुझीया ठायी करीतो आर्जव नमीतो पायी सकल कार्य नेई सिद्धीस आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१|| रूप अन गुण तुझे कितीक वर्णू मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू फळ द्यावया कष्टास आमच्या करीतो आम्ही तुझा पुकारा ||२|| जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०६/२०११
काव्यरस

चबुतरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्यागर्द झाडीत, जुन्या चबुतऱ्यावर उन्ह पाऊस झेलीत, उभी आहे दगडी छत्री पायथ्यात विसावलेल्या कोण जाणे कुणाची महानिद्रा सांभाळीत, वखवटातात जीवनाच्या तिच्या आजुबाजुला, निर्मितीचा नंगा नाच चालू आहे अव्याहत, मरणाच्या एकटेपणावर हिरवे काळे बुळबुळीत लिंपण लावीत जीवनाने पाय रोवले आहेत छत्रीच्या माथ्यावर उडणारे पक्षी मधूनच कधी टेकतात अस्वस्थ माना वळवून शोधतात शोधतात मागे राहिलेल्या कुणाला तळात छत्रीचा कुणीतरी, नेहमीसाठी जवळ. हंबरत येवून एखादी गाय पळभर विसावते छत्रीच्या दगडी चबुतऱ्याशी घासून मान थोडी शमवते रुखरुख तो शांत आतमधे, नाही कसलीच बोच कॅमेरा रोखून कोणी प्रवासी घेतो फ़ोटो खांबाशी रेलत्या हस
काव्यरस

एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" ला

लेखक धन्या यांनी रविवार, 12/06/2011 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख श्री. ईश आपटे यांच्या "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" या लेखाचा प्रतिसाद आहे. माझा प्रतिसाद लिहिता लिहिता मूळ लेखापेक्षा मोठा झाल्यामुळे स्वतंत्र लेख म्हणून देत आहे. १. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. अगदी खरंय. नव्हे, तुमचा "लाट आली" हा शब्दप्रयोग खुप काही सांगून जातो. ईंग्रजीमधील "फॅड आलंय" हा शब्दप्रयोग सुद्धा चालला असता. पण... लाट किंवा फॅड हे हे खुप अल्पजीवी असतं. ते येतं, थोडा वेळ राहतं आणि निघून जातं. अध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही.