Skip to main content

व्हेज फ्राईड राईस आणी पनीर चिली

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 01/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य व्हेज फ्राईड राईस: २ कप बासमती तांदूळ स्वछ धुवून गरम पाण्यात भिजवणे १ कप पातळ उभा चिरलेला कोबी १ कप पातळ उभा चिरलेला गाजर १ कप पातळ उभी चिरलेली भोपळी /ढोबळी / ढब्बू / शिमला मिर्ची :) १ कप बारीक चिरलेली फरसबी १/२ कप कांद्याची पात चिरुन १ छोटा कांदा व पातीचा कांदा चिरुन १ १/२ टेबल्स्पून आलं-लसूण पेस्ट किंवा भरड वाटलेले १ हिरवी मिर्ची उभी चिरलेली २ टेबल्स्पून सोया सॉस २ टेबल्स्पून टोमॅटो सॉस १ टेबल्स्पून चिली सॉस मीठ चवीप्रमाणे १/४ वाटी तेल पाकृ: भिजवलेला तांदळाचा बोटचेपा भात शिजवून घेणे.भात शिजवताना १ छोटा चमचा तेल घालणे. शिजवलेला भात हलक्या हाताने मोकळा करुन गार करायला ठेवावा म्हण्जे भाताची शितं मोडणार नाहीत. तेल तापवून त्यात प्रथम आलं-लसूण पेस्ट , हिरवी मिर्ची घालावी व परतावी. त्यावर कांदा घालुन परतावा. एक एक करून सगळ्या भाज्या घालाव्यात व पटपट परतत रहा. वरील सर्व सॉस घाला व परता. आता त्यात शिजवलेला भात घाला आणी हलक्या हाताने एकत्र करा. मीठ चवीप्रमाणे घाला. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे घाला) सर्व सॉस भाताला सारखे लागले की भात उतरवावा. . साहित्य पनीर चिली: २ कप पनीरचे तुकडे १ कांदा उभा चिरलेला १-२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या १ १/२ टेबल्स्पून आलं-लसूण पेस्ट किंवा भरड वाटलेले १/२ कप कांद्याची पात चिरलेली ३ टेबल्स्पून सोया सॉस १ टेबल्स्पून कोर्नस्टार्च थोड्या पाण्यात मिसळ्लेले मीठ चवीप्रमाणे १ टीस्पून काळीमिरीपूड तेल पा़कृ: थोड्या तेलात पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेणे आणी हे तळ्लेले तुकडे पाण्यात भिजवणे म्हण्जे ते मग वातड होणार नाहीत, मऊच राहतील. दुसर्या भांड्यात तेल तापवून त्यात हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट घालून परतणे. आता चिरलेला कांदा, मीठ घालणे, सोया सॉस घालणे. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे घाला) त्यात तळ्लेले पनीरचे तुकडे , काळीमिरीपूड घाला व नीट एकत्र करा. १ कप पाणी घालून थोडे शिजवून घ्या. कोर्नस्टार्च चे मिश्रण घालून, किती घट्ट हवे तितके शिजवून घ्या. वरून कांद्याची पात घालून गरमा-गरम व्हेज फ्राईड राईस बरोबर वाढा :) .

वाचने 15978
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

व्हेज फ्राईड राईस आणि मदणबाणजीव चिल्ली आवडली ... वॅक्युम क्लिनर ने लाळीचा महापुर कंट्रोल मध्ये आणाव्या लागला. जियो , अजुन मदणबाणजीव भुर्जी , मदणबाणजीव बटर मसाला , मदणबाणजीव कोफ्ता देखील येऊ द्या :) मदणु , ह घे. -(मदनबानजीवप्रेमी ) टारझन

`माझं असंही भातावर प्रेम आहेच, आणि असा भात तर लई भारी लागतोच. आता लेक पण या परंपरांचा पाईक होतो आहे, त्यामुळे बायकोची चिडचिड होते पण आम्ही जुमानत नाहीच. असो, लई सोपी पद्धत आता करुन पाहेन व लगेच सांगेन.

वाह वाह! पनीर चिली म्हणजे आमचा जीव की प्राण. धन्यवाद पाकृ इथे दिल्याबद्दल आता लगेच करून पाहणे आले. :)

मी कधिच पनीर तळत नाही. फ्रोझन पनीर गरम पाण्यात घालुन ठेवते. मग भाजित सोडते. मस्त लुसलुशित रहाते. ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

मी आधी कुकर मधे सुमारे ३४ मिनीट शिजु देतो पणीर , मग ओव्हन मधे १३० डिग्री वर २३ मिनीटे ठेवतो . त्यानंतर त्याला कोळश्यावर ग्रिल करतो, मग तंदुर करुन त्याचं क्रिस्पी बनवतो. करुन बघा , छाण लागते ;) - (आयोडाइज्ड) कैप्टण कुक

In reply to by टारझन

इथे एवढ्या गहन विशयावर चर्चा सुरु आहे तरी ह्या टार्याला विनोद सुचतोस कसा मी म्हणतेय ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

मी एवढा अभ्यासपुर्ण प्रतिसाद दिला आणि त्यात तुला विनोद कांबळी दिसला ? निषेध करु का ?

In reply to by टारझन

असं पणीर तुच खाउ शकशील... अर्रे हो पनीर आणि चिकण चं काही बनवता की नाही तुम्ही? चिकण तुझं लाडकं ना, म्हणून विचारलं... ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

अग पण मी म्हणतेय तळायचे तरी का x(
अग चवीत फरक पडतो करुन बघ आनि तळले ना कि जास्ती स्पॉन्जी होते. तळायचे थोडेसेच जास्त नाही

In reply to by मुलूखावेगळी

तळुन पाहिलेय मी.... मला न तळताच आवडते. तळले कि रंग पण बदलतो. न तळता कसे मस्त शुभ्र पांढरे व लुसलुशीत राहते. खबरदार परत तळलेस तर .. मी बोलणार नाही जा तुझ्याशी.

In reply to by पर्नल नेने मराठे

तळुन पाहिलेय मी.... मला न तळताच आवडते. तळले कि रंग पण बदलतो. न तळता कसे मस्त शुभ्र पांढरे व लुसलुशीत राहते.
रंगाबद्दल सहमत ग
खबरदार परत तळलेस तर .. मी बोलणार नाही जा तुझ्याशी.
ओके नाय तळत पनीर १ पनीर ( बिन तळेवाले) चुचु के नाम

In reply to by पर्नल नेने मराठे

अरे वा....मी पनिर सोनेरी रंगावर तळून पाण्यात सोडते आणी नंतर वापरते.. आता तुझ्याप्रमाणे करुन पाहीन.. पनिर माझ्या लेकीला खुपच आवडते..त्यामुळे नेहमी करते...काही काही...

इकडे परिसंवादाचा बोर्ड लावतोय. विषयः पनीर कसे आणि कितपत तळावे मुख्य वक्त्या: १. चुचु मराठे २. मुलखावेगळ्या ताई ३. सानिकास्वप्निल अध्यक्षः श्रीयुत. गणपाशेठ शेट्टी.

In reply to by मुलूखावेगळी

अग... हो... पण इथे आपल्या सारखे whole milk नाही मिळत.. पाव किलो पनीर करायचे असेल, तर ३ लिटत दुध नासवायला लागते. त्यामुळे मी कंटाळा करते पनीर बनवायचा..

चुचु मराठे, मुलखावेगळ्या ताई मी पनीर थोड्या तेलात तळूनच वापरते, रंग बदलतो ह्याच्याशी मी ही सहमत आहे. तरीही न तळता करून पाहेन :) पुष्करिणी कोर्नस्टार्च म्हणजे कोर्नफ्लावरच :)

मालक, संपादक, (आणि अजून कुणी असतील तर) पदाधिकारी, पाककृती विभागात फटू टाकण्यास बंदी करणेबद्दल अर्ज द्यावयाचा असल्यास कुणास द्यावा हे कळवा प्लीज!!! हे बल्लव (आणि/अथवा) सुगरण लोक असल्या जब्बर पाकॄ + फटू टाकून जीव नकोसा करुन टाकतात!! सानिकातै, संपूर्ण पाककृती जबर्‍या! इतक्या जीवघेण्या फटूंबद्दल आपला तीव्र णीसेद!! गणपाषेटना थोड्याच काळात अनेक स्पर्धक निर्माण झाल्याने बाकी मिपाकरांना आपापले जीव सांभाळून या विभागात यावे लागते आहे. तरी मिपाकरांच्या जीवाला समग्र धोका असलेला पाकॄ विभागच ब्यान करता येईल काय असा एक असुरी विचार मनात डोकावून गेला!!! ;-) --असुर

असुर पाककृती विभागावर बॅनास्त्र सोडण्याचा विचार सोडून द्या.. त्यापेक्षा युद्ध करायची तयारी करा. अधिक माहितीसाठी खालील तुनळीचा दुवा बघा.. http://www.youtube.com/watch?v=OkEvwRgphEk - (कळीचा नारद) पिंगू

आजवर अनेक ठिकाणी पनीर चिली खाल्ली . थोड्याफार फर्काने! पनीरला काहीतरी कोट करतात तो प्रकार जास्त आवङतो . फोटो मध्ये दुसरा प्रकार आहे ( न कोट केलेला) तो प्रकार माहित असल्यास सांगावा

हो वरील पा़कृमध्ये पनीर (मैदा, कोर्नस्टार्च ने) कोट केलेले नाही आहे. थोड्या तेलात पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेतले आहे आणी हे तळ्लेले तुकडे पाण्यात भिजवून मग वापरले आहेत :)तसं मी पा़कृमध्ये सांगितले आहे :)