Skip to main content

मासे २८) करंदी

लेखक जागु यांनी सोमवार, 13/06/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात. आळुवडीतही करंदी घालतात. करंदी पुलावही चांगला होतो. ही आहे करंदी.

Android फोन वर मराठी वेबसाईट्स कशा पहाव्या?

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 13/06/2011 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या माझ्या फोन मधे देवनागरी फाँट दिसत नाही. सद्ध्याचा फोन कुठला ह्याला महत्व नाही. लवकरच Android फोन घेणार आहे. त्यावर मराठी साईट्स, ब्लॉग्स वाचता यावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कुणाला अनुभव आहे का? कुणी ह्या बाबतीत मदत करू शकेल का?

घरगुती साजूक आणि रवाळ तूप

लेखक स्वरालि यांनी सोमवार, 13/06/2011 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी) १. LURPAK नावाचे (unsalted) बटर मिळते. (कोणत्याही SUPERMARKET मध्ये FROZEN सेक्शन मध्ये दिसेल. 250G चा एक CUBE मिळतो). २. त्याला जाड बुडाच्या भांड्यात घेवून, GAS वर कढत ठेवा. (साधारण १५-२० मिनिटे, मध्यम आचेवर). ३. मधून मधून ढवळावे (खाली लागू नये म्हणून, पण तुम्हाला हि खाली लागलेली खरड नुसती खायला आवडत असेल तर जरूर खाली लागून द्यावे...). त्यानांवर GAS बंद करा. आणि तूप तसेच ठेवून द्या.

मोल्टन लावा केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 13/06/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस बेकिंग चॉकलेट १/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस अनसॉलटेड बटर १/३ कप साखर २ अंडी १/४ कप मैदा . पाकृ: बेकिंग चॉकलेटचे बारीक तुकडे करून डबल बॉयलर वापरून वितळवून घेणे .( डबल बॉयलर म्हण्जे एका मोठया भांड्यात पाणी घेऊन उकळ्णे व त्यावर दुसरे भांडे ठेवून त्यात चॉकलेट घालणे म्हण्जे गरम पाण्याच्या उष्णतेने ते वितळेल .)

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................
काव्यरस

विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 13/06/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 13/06/2011 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषोत्त्म लक्ष्मण देशपांडे नावचा पुरुषोत्तम लेखक १२ जुन २००० रोजी वरती स्वर्गात देवाला हसवण्यासाठी आपल्यातुन कायमचा निघुन गेला. जातीयवाद, ध्रर्म यांच्या चर्चांमध्ये या महान लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, गायकाला मानवंदना द्यायचे राहुन जाउ नये यासाठी हा वेगळा धागा. २० हून आधिक पुस्तके, १५ पेक्षा अधिक नाटके, काही अविस्वरणीय व्यक्तिरेखा आणि २५ एक चित्रपटांना अजरामर बनविणार्‍या या महान व्यक्तिमत्वाला माझा सलाम.

एक शोकांतिका

लेखक शरद यांनी सोमवार, 13/06/2011 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षांपूर्वी दिवे आगरला गेलो होतो. सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडून त्याचे देऊळही बांधून झाले होते.ही काही पूजेतील मूर्ती नक्कीच नव्हती; पण धंदा जोरात चालला होता. दुर्वा, फुले, नारळ यांना चढ्या भावातही चांगले गिर्‍हाईक मिळत होते. पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र नव्हे, म्हणून दिवे आगरचे भविष्य सगळ्यांना, विशेषत: स्थानीकांना लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातले चढे भाव लोकांना खुणावत होते. पुण्यात ६ रुपयांना मिळणारा मोदक तेथे आठ रुपयांना मिळत होता. समुद्र किनारा, वाड्या इतरत्र कोकणांत असतात तश्याच होत्या पण त्यांचे गुणवर्णन केले जात होते.