Skip to main content

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 11/06/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे. त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे.

'गोल्डमॅन' आ. रमेश वांजळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

लेखक यकु यांनी शनिवार, 11/06/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासल्याचे आमदार आणि 'गोल्डमॅन' म्हणून राज्यभरात सुपरिचित असलेले रमेश वांजळे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी हर्षदा, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. गेल्या तीन दिवसांपासून वांजळे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कमला नेहरू उद्यान परिसरातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांची 'एमआरआय' चाचणी करण्यात आली. ही चाचणी करण्यापूर्वी वांजळे यांना अस्वस्थ वाटत होते.

(येस , वी आर...)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 10/06/2011 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल अगदी असंच मला तो नेसकॅफेवर कॉफी पिताना भेटला मी "मी पाटील" म्हणताच, "मी नातलग" काहीसं तो म्हटला माझं सारं बोलणं तसं अगदी पुर्णपणे ईंग्रजीतून चालू होतं तो मात्र मराठी आणि ईंग्रजी दोन्हींची काशी घालताना दिसला माझ्याच वयाचा, पण "सार्‍या जगाचं ओझं माझ्या खांदयावर" असं शब्दाशब्दाला भासवणारा, मला जरा तो आगाऊच वाटला पोरगा नक्कीच सुखवस्तू अन खात्यापित्या घरातला असावा "मोबाईल, गाडीचा" अभिमान त्याच्या चेहर्‍यावर होता साचला म्हटलं माझ्या मित्रा, तू तेविसाव्या वर्षी आयायटीचा प्रोफेसर हो अगदी त्या सिकंदरासारखं जिंकण्याची उर्मीही तुझ्यात असू दे "Confidence.

चिव चिव चिमणी छतांत ...

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 10/06/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला. मी विचारलं " काय झालं ?". "आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही." "त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत". बुर्‍हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते.

येस ,वी आर ...

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्‍या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ...

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 10/06/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार वि वि, आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :) या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते.