Skip to main content

मी हुच्चभ्रू

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 22/01/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
विकी वरची माहिती भाषांतरित करून मेगाबायटी प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार ||१|| धागे हायजॅक करून गोंधळ मी घालणार मीही हुच्चभ्रू होणार ||२|| राजकीय-धार्मिक मुद्यांनाच हात मी लावणार मीही हुच्चभ्रू होणार ||३|| ललित लेखनाला फाट्यावर मारणार मीही हुच्चभ्रू होणार ||४|| इतर धाग्यांना तुच्छ मी मानणार मीही हुच्चभ्रू होणार ||५|| मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिसाद मी देणार मीही हुच्चभ्रू होणार ||६|| संस्थळांवर लॉगिन न करता वाचनमात्र मी राहणार मीही हुच्चभ्रू होणार ||७||
काव्यरस

काळोखातली कासवे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/01/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखातली कासवे काळोखात का(?)सवे आली... सहज बादलीभर अंडी घातली... कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...) बाजी...मारलीस का..? तू ही... ;-) (विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)
काव्यरस

गुरफटलेली आसवे

लेखक धनंजय यांनी रविवार, 22/01/2012 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली दिली-घेतली, गुरफटलेली. कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)
काव्यरस

" यक्ष प्रश्न "

लेखक रघु सावंत यांनी शनिवार, 21/01/2012 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
" यक्ष प्रश्न " अश्याच एका सुंदर संध्याकाळी एकटाच होतो पण तू नव्हतीस तुझ्या आठवणींची एक एक गाठ उसवत चाललो होतो एकटाच पाखरं आपल्या घराकडे येत होती वाराही गारवा देत जात होता पुर्वीसारखाच मनात तुझ्या आठवनींच काहुर पण दैव या आठवनींना एकटेपणाची झालर रोजच्या वळणावरच होतो मी उभ
काव्यरस

पाहुणे येती मुंबईला

लेखक सुधांशुनूलकर यांनी शनिवार, 21/01/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीची धामधूम संपली, डिसेंबर महिना सुरु होऊन मुंबईत हळूहळू थंडी जाणवायला लागली, की मुंबईतल्या पक्षीप्रेमींची एकमेकांकडे चौकशी सुरु होते : आले का रे ? अजून का नाही आले ? केव्हा येणार ? आले, की मला नक्की सांग... BNHSमधे फोन करून बघूया... शेवटी ते येतात. हजारोंच्या संख्येने. एखाद्या दैनिकात बातमीसह त्यांचं छायाचित्र (लोकासत्ता, बुधवार, दि.

राजकीय रणधुमाळी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 21/01/2012 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. १. कलमाडी चुपचाप आणि बिनबोभाट सुटले. थोरल्या राणीसाहेबांच्या कृपेने अगदी मोक्याच्या वेळेस सुटका झाली म्हणायची! आता ते पुण्यात आपले पुण्य दाखवणार का अज्ञातवासात जाणार की पुन्हा ऑलिम्पिक भारतात आणण्याच्या हर्क्युलियन साहसात सहभागी होणार? २. मुंढे काका, पुतणे, भाऊ यांची भाऊबंदकी. त्यावर थोरले पवार आणि पुतणे पवार ह्यांची सूचक शेरेबाजी. ३. अजित पवार, निवडणूक आयोग, राज ठाकरे, आयुक्त, क्लीन चिट वगैरे चविष्ट तोंडीलावणे आहेच. पवारांच्या आचारसंहिताभंगावर जालीम उपाय म्हणजे आय आम सारी असे म्हणणे असे दिसते आहे. ४.

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

लेखक बन्याबापू यांनी शुक्रवार, 20/01/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ?

शाळा .. .... बरा जमलाय

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 20/01/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकील यांचं 'शाळा' आधी कैक वेळा वाचलं होतं . ज्याम आवडलं होतं... ह्या कादंबरीवर चित्रपट येणार ... येणार असे ऐकत होतो... आज तो आला... फस्ट डे फस्ट शो बघीतला ....... (टीप : या समिक्षेत चित्रपटाचा शेवट समजणार आहे... पण येथे शेवट महत्वाचा नाही, नववीत्ल्या मुलाच्या अनुभव विश्वाचे हे चित्रण आहे. आणी चित्रपटाने मूळ कादंबरी एवढी नसली तरी बर्यापैकी मजल मारली आहे) ही गोष्ट आहे १९७५ ( आणीबाणी फेम ) सालच्या आसपास ९ वीत शिकणार्या मुलाची. त्याचं नाव जोश्या. चौकोनी कुटंब .