विदेश .....!! [थोडा टाईम पास ]

प्रकाश१११ जे न देखे रवी...
मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो कैफात असा होतो हे जग विसरुनी मी गेलो मज आठवण येता तिथली जीव कासावीस होतो माझा आठवूनी गुलाबी थंडी हुडहुडी भरे अंगाला त्या विदेशातील घरे कशी मस्त लाकडी होती काचेच्या खिडकी मधुनी आभाळ उतरुनिया येई ह्या देशामधली गर्दी नि गोंगाट कसा भरलेला..? ह्या गाड्या मधली गर्दी मी घामाने ओला ओला नव्हता देव्हारा तेथे मी उघडला छोटा बार संध्याकाळी बसता मी विसरुनी जातो पार मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो............!!
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

2 टिप्पण्या 1,336 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

पक पक पक नवीन

:crazy: मग ईकडे का आलात परत ..? तिकडेच 'बसुन' ;) लिहायचीत विंग्रजीत कविता .बाकी देशी काय पचली नाय भाउ.... ते 'घोड दौड संताजीची' या काव्यासारखे काहीतरी वाट्ते आहे.......