जागेपणी मिटून जायचे ..!!
शब्दांच्या बाजारात
मी काही शोधीत बसायचो
तिच्यावर प्रेम करण्यासाठी
काही शब्द शोधीत असायचो
मला हवे ते शब्द मिळत नव्हते
काय करावे कळत नव्हते..?
कधीतरी ती भेटली होती
फुलासारखी फुलली होती
काहीतरी बोलायचे होते
छान शब्द मनात होते
पण शब्द फुललेच नाही
आतल्या आत विझून गेले
हे कसे झाले ,,?
हे कधी झाले ..??
तिच्या डोळ्यात ढग ओले ,!!
कसे स्वप्न बघत होतो
स्वप्नात कसा झुलत होतो
मग जागा झालो
नि हे काय झाले ,?
शब्द कसे हरवून गेले
आभाळ कसे भरून आले ..?
चिंब पाउस ...
नि माझे शब्द वाहून गेले
तिच्यावर प्रेम करायचे राहूनच गेले
हे शप्पत खरे आहे
पूर्वी सगळे असेच असायचे
फक्त मनातल्या मनात
प्रेम करायचे
जागेपणी मिटून जायचे ..!!
मस्त
छान
कविता आवडली
मस्त
मस्त कविता.
आत्ताच ह्या कवितेचे विडंबन
छान कविता!