कंदमूळ-उन्हा़ळ्याचं फळ
आपल्याला कंदमुळ या नावावरुन सामान्यतः सुरण/रताळी इ.इ. कंद जमातीची अठवण होते...पण आज मी एक वेगळाच कंद प्रथम पाहिला... म्हणजे खाऊनही पाहिला.आणी तोही मिळावा कुठे..? तर आमच्या त्या अजब दुनियेत...मार्केटयार्ड मधे...! उद्या पाडवा असल्यानी फुलं आणायला मुद्दामच यार्डात ११:३० ला गेलो होतो,कारण सगळीकडचा मालही आलेला असतो,आणी बाजारही जरा बरा मिळतो,म्हणुन. आधी उन्हानी फुल्लं तापलेलो होतो.तेंव्हा आधी जरा एक शहाळं मारावं,आणी मग आत गाळ्यात उकडुन निघायला घुसावं अश्या विचारात होतो... तर कडेनीच जाणार्या एका हार वाल्यानी... ''काका लवकर जा १२ नंतर मोगरा,पाला आणी छडी उडणार्हे'' अशी खबर दिली.मग शहाळं वगैरे सोडुन आधी आत घुसलो..आणी १/२ तास ''तापुन'' बाहेर आल्यानंतर शहाळं असं मनात येइपर्यंत समोर एका सायकलच्या कॅरियरला एक चांगल दांडग फ्रेश केशरी रंगाचं खोडासमं असं काहितरी दिसलं.
मनात विचार आला...हे मृदुंग किंवा ढोलकी साठीचं खोड तर नसावं,एखाद्या शेतकर्यानी इकायला आणलेलं.म्हणुन जवळ गेलो आणी विचारलं, ''केवढ्याचं हो हे..?'' त्या विक्रेत्यानी,''आयचं गाढावंच दिसतय बेनं'' असा भाव डोळ्यात आणत मला,''तुमी आख्खं ग्येनार काय..?'' असा सवाल टाकला..मी,हो...! असं म्हटल्यावर मला,''१५०० रुपयाला बसेल...'' असा जबाब दिल्यावर मी-बसलोच..! पण पुन्हा विचारलं,''एवढं महाग का हो..?'' त्यावर त्यानी मला,'' येका खापंला धा रुपे पडत्यात,आदी तेवडी खाऊन बगा'' असं मला ऐकवल्यावर मी चक्रावलोच...ढोलिकिचं खोड खातात का..? हे मला काही केल्या कळेना...! पण मग माझा सगळा गाढवपणा त्याच्या एका मारलेल्या हाळी'नी उतरवला...'' कंदमुळ...ए कंदमुळ... उनाचं खा कंदमुळ,प्वाटाला ग्गार कंदमुळ,रामानी खाल्यालं कंदमुळ'' मग मला जरा अंदाज आल्यावर त्याला विचारलं,,,हे खातात होय..?'' माझ्या अज्ञानीपणाला आधीपासुन वैतागलेल्या त्यानी मला,,''न्हाएतं काय डोक्यात घालतात व्हय..?'' असा शॉट मारुन खलास केलं.. मग मी आणखिन फार न बोलता,,''द्या दहा रुपायचं..'' अशी ट्रायल बेसिस वर आर्डर दिली... तरिदेखिल त्यानी माझ्याकडे,, ही कुठची ''केस'' हितं आलिये'' असा चेहेरा करत(आधी पैसे घेऊन..!) ...त्या कंदाची वरची गोल खाप सुरिनी काढुन एका पेपराच्या तुकड्यावर माझ्या हातात दिली... आणी पुन्हा हाळ्या मारण्यात दंग जाहला..
मी ही खायला लागलो...साधारण मोठ्ठी बोरं ज्या चविची लागतात,तशी फिक्की गोड चव होती... अर्धी खाप उडवुन झाल्यावर मी ती त्याच पेपरात गुंडाळुन पिशवित टाकली...आणी पुढे जाऊन त्याचा थोडासा इंटर-व्ह्यू घेतला...(मनात म्हटलं अता आपण याला मोबॉइलवर शुट करावा ;-) ) त्यातुन मिळालेली माहिती येणे प्रमाणे...
हे फळ खाल्लेल्या-रामरायाच्या नाशिकमधे मिळतं,कर्नाटक,आंध्र आणी (आमच्या) रायगडमधेही (?) मिळतं, अत्ता जे खाताय ते रायगडमधनच आलेल आहे...(रंग बघा ना त्याचा...!-इति तो विक्रेता..) मी त्याला म्हटलं की मी हे फळ पुण्यात पहिल्यांदाच बघतोय... ''हा वो...हे आमी बि इशेष कदी आनीत न्हाय पुन्यात इकायला... हित खपतच नाय ज्यादा... ह्ये हुंबैला लै चालतं...!'' अता हे खरं होतं का मला त्याच घुश्यात ''दगड'' मारलावता...याची फार तेहेकिकात न करता मी अजुन १प्रश्न विचारला,,, हे किती दिवस टिकतं हो...? '' त्यानी लगेच ''पंधरा दिवस र्हातं..आनी तुमच्या पुन्यात इकायला ५ दिस जात्यात,हुंबैला २ दिवसात खपत...!'' असा अजुन एक दगड (कदाचित) मला मारला..पण मीही सरावलेल्या पत्रकारा सारखा त्याला,,, ''पण ह्याचं खर नाव क्काय..?'' असा पाठीपडल्यावर त्यानी मला माझ्या या आणी पुढे येऊ शकणार्या अश्या इतर प्रश्नांचीही उत्तरं एकत्र मला दिली... ''ह्याला नाव असं काय नाय बगा,कंद-मुळच म्हनत्यात...ह्ये रामानी वनवासात खाल्लवतं,-लक्ष्मणानी आनी शीतेनी पन ह्येच खाल्लवतं.. :-D (इथे आम्चा दोघांचाही हशा...आणी त्यामुळे त्याला,,मी ही एक खोलात मुळ असलेला कंद(च) आहे ही झालेली जाणिव ;-) ) ह्ये फक्त उन्हाळ्याला येतं आनी प्वाटाला लै ग्गार बी असतं... चाला जाऊ का'' असं म्हणुन तो फुड ग्येला आणी मीही पार्किंगच्या दिशेनी वळलो... :-)
हे त्या फळाचे (इक्रेत्यासह) फोटो...
आणी हे त्या खापेचे (फोटोंसाठी ;-) ) घरी आणल्यावर काढलेले फोटो...
दिसतात कापलेल्या बटाट्यासारखेच..पण चव मात्र ऑफ बिट ..गोड... :-)
हाय का नाय मजेशीर...
मंग आता खावा आनी सांगा बरं,कसं लागलं त्ये... ह्या लेखामंदे...
आणी हे त्या खापेचे (फोटोंसाठी ;-) ) घरी आणल्यावर काढलेले फोटो...
दिसतात कापलेल्या बटाट्यासारखेच..पण चव मात्र ऑफ बिट ..गोड... :-)
हाय का नाय मजेशीर...
मंग आता खावा आनी सांगा बरं,कसं लागलं त्ये... ह्या लेखामंदे...
वाचने
19924
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
मूळ हेच 'फळ' ??
In reply to मूळ हेच 'फळ' ?? by सूड
@मूळ हेच 'फळ' आहे ?? >>> मग
In reply to @मूळ हेच 'फळ' आहे ?? >>> मग by अत्रुप्त आत्मा
+1
In reply to +1 by यकु
नाही गराडूचा कंद वेगळा असतो.
In reply to नाही गराडूचा कंद वेगळा असतो. by रामदास
थँक्स रामदास काका.
In reply to @मूळ हेच 'फळ' आहे ?? >>> मग by अत्रुप्त आत्मा
आम्ही रताळ्याला रताळं
In reply to आम्ही रताळ्याला रताळं by सूड
@रताळ्याचं 'फळ' म्हणत नाही.
In reply to @रताळ्याचं 'फळ' म्हणत नाही. by अत्रुप्त आत्मा
हे राम...
In reply to हे राम... by सोत्रि
सोकाजीराव _/\_ भटजी, आवरा.
ऐला, भलतंच मोठं दिसतंय हे
भटजी, तुमचा खुप खुप राग आला
लहान असताना खाल्लयं आणि हे
हे साबुदाण्याचं मूळ
In reply to हे साबुदाण्याचं मूळ by चौकटराजा
चौकटराजा हे टॉपिओका नाहि.
कोल्हापुरला एकदा खाल्लं
In reply to कोल्हापुरला एकदा खाल्लं by मोहनराव
हो ! मी पण जोतिबा वरच पाहिल
In reply to हो ! मी पण जोतिबा वरच पाहिल by स्पंदना
जोतिबा वाट बघतायेत, कधी
पाहिलंय
In reply to पाहिलंय by पैसा
पैसातै, याला म्हणतात कंदमुळ
In reply to पैसातै, याला म्हणतात कंदमुळ by ५० फक्त
लै झ्याक रं आत्म्या !!!
In reply to पैसातै, याला म्हणतात कंदमुळ by ५० फक्त
खोड नसावे बहुदा...
गणपती बसतात त्या काळात हे फळ
In reply to गणपती बसतात त्या काळात हे फळ by पांथस्थ
एक झॅक्टली रे पांथस्था,
पुण्यात बघितलेलं आहे, मुंबईत
In reply to पुण्यात बघितलेलं आहे, मुंबईत by प्रचेतस
एक शंका
In reply to एक शंका by मी-सौरभ
पुण्यातील लोक मुंबईत जात
In reply to पुण्यातील लोक मुंबईत जात by प्रचेतस
हम्म
In reply to पुण्यात बघितलेलं आहे, मुंबईत by प्रचेतस
लहानपणी खाल्ले आहे.. पण...
कोल्हापूर....
In reply to कोल्हापूर.... by मन१
>>>>>कोल्हापूर व एकूणच
In reply to >>>>>कोल्हापूर व एकूणच by प्राजु
मी हे फळ चांदोलीत खाल्ले आहे..
मुंबईत मिळते... पण ती माणसं
छानच.
पाहिले आहें.
पाहिलेय, खाल्लेय आणि
वेगळेच..
लहाणपणी पुण्यात खाल्लं होतं
गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर
ओह
http://www.misalpav.com/node/
हे कंदमूळ जास्त खाऊ नये.
In reply to हे कंदमूळ जास्त खाऊ नये. by जयंत कुलकर्णी
नाही तर किलोच्या भावाने नसता का विकला?
माहिती द्या राव जरा.
नॉस्टेल्जिक.
https://sahasa.in/2022/03/21
In reply to https://sahasa.in/2022/03/21 by अत्रुप्त आत्मा
https://www.facebook.com/reel
ह्याला रामकंद म्हणतात. हे