मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधिया हलवा ---

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य -- एक छोटा कोवळा दुधी भोपळा, एक लिटर दुध, दोन चमचे साजूक तूप, पाच टे.स्पून साखर किंवा आवडीप्रमाणे, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड. कॄती -- प्रथम भोपळ्याच्या साली काढून घ्या. खिसून घ्या. आता कढईमध्ये तूप घाला व त्यावर भोपळा खिस घालून चांगला परतून घ्या व आता त्यामध्ये दूध घाला, गॅस बारीक करा, आता तुमचे काम फक्त येताजाता ते ढवळत रहाणे. तुमचे काम तुम्ही करु शकता, मिपावर येउन गप्पा मारु शकता.कारण हे तयार व्हावयास जवळ जवळ एक तास तरी जातो. आता हे दुध आटत जाउन त्याचा छान खवा बनू लागतो. वेगळा खवा घालायची जरुरीच नाही. दुध पुर्ण आटले की त्यात साखर, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड घालून पुन्हा थोडावेळ परतुन घ्या. hlawa1 हा झाला आपला दुधी हलवा तय्यार. halawa2

वाचने 5164 वाचनखूण प्रतिक्रिया 11

तर्री 11/03/2012 - 21:57
चंद्रोदय नुकताच झाला आहे. पोटात कावळे ओरडत आहेत. म्हटले दुधी हलवा पहावा. तर फोटो दिसत नाहीत. पाकृ तर आवडतीच.

In reply to by पक पक पक

अरे दूध उतू जाऊ नये म्हणूनच गॅस बारीक करायचा....आंणी त्यात उलथने घालूनच ठेवायचे. पण गप्पा हाणताना मधूनच तिकडेही लक्ष द्या नाहीतर आपला हलवा जळगावला जायचा...:)

अमृत 12/03/2012 - 09:17
पण नैवद्याइतका का बनवलात तै? इसमे मेरा क्या होगा? :p :-p :tongue: पुढील विकांताला नक्कीच बनवला जाईल. अमृत

Pearl 12/03/2012 - 23:45
मस्त पा.कृ. :-) माझी आवडती स्वीट डिश. मी सुद्धा असाच बनवते दुधी हलवा. फक्त तूपावर पहिल्यांदा थोडा काजू परतते आणि मग त्यात खिसलेला दूधी टाकते. त्यामुळे तळलेला काजू नंतर छान शिजतो आणि टेस्टी लागतो.