ऒंजळीत हिरव्या काचा
ऒंजळीत हिरव्या काचा
माझ्या रिकाम्या हाती
प्राणसखी ती माझी
मज सोडून झाली पुढती
हा काळ एकटा झाला
की नशीब माझे रूसले
गालावरले झरले थेंब
मी स्वहस्ताने पुसले
या वेळी संसाराच्या
का तुजविन जगणे आले
आठवणीच सार्या तुझया
अन् कल्लोळ मागे थांबले
कोण जाणील सांग
गूढ गुपीते अपुली
अंधारातही धरली होती
माझ्यावर तु सावली
व्यसन झाल्या सवयीचे
हे खुंटत कुढणे काय?
माणसांचा भवती पसारा
मला ओळखील काय?
आता धरतो उराशी
सगळे कढ तुझे नी माझे
शांत एकटाच आता
म्हणतील मला हे मागे.
वर्गीकरण
--^--^--^--
व्वाह!!
भारी समर्थ साहेब, अप्रतिम एक हळवी कविता
भारी बुवा