जागतीक मिसळ दिन- १३ ऑक्टोबर
मिसळ म्हणले की अनेकांचे कान टवकारले जातात. हे रसायन असेच आहे. वेड लावते.
काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.