Skip to main content

दाल खिचडा / खिचडी.

लेखक गणपा यांनी रविवार, 23/09/2012 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
 मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची?

मायामृग यांच्या हिंदी कवितेचा अनुवाद

लेखक Kavita Mahajan यांनी रविवार, 23/09/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
आई...! तुला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या तुला खूप हसू आलं असतं ऐकून तुझ्याशिवाय दुसर्या कुणाला यात रस नाही आणि असला तरी कुणी तुझ्यासारखे समजून घेणार नाही आई समजून घेतले तरी त्यात काही मजा नाही वाटणार त्यांना... तुला सांगायचं होतं की आज सकाळी चहा करताना साखरेऐवजी मीठ घातलं मी पण कुणीच म्हटलं नाही, तू असा ढ च राहशील तुला नाही जमणार चहा, बाजूला हो, मी करते...! आई, तुला सांगायचं होतं की आज बाबांना मी पाणीपुरी खाऊ घातली, जे ती कधीच खात नाहीत आणि किती मजा... सगळे पाणी तर बशीतच सांडले...

मैत्री ...

लेखक विदेश यांनी रविवार, 23/09/2012 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री ... मैत्री म्हणजे घाई गडबड नाही मैत्री म्हणजे काही धडपड नाही मैत्री म्हणजे उदार उसनवारी नाही मैत्री म्हणजे दारोदारी नाही मैत्री म्हणजे दारात नाही मैत्री म्हणजे बाजारात नाही मैत्री म्हणजे देवघेव नाही मैत्री म्हणजे देवदेव नाही मैत्री म्हणजे आकाश नाही मैत्री म्हणजे पाताळ नाही मैत्री म्हणजे वरवर नाही मैत्री म्हणजे घरघर नाही मैत्री म्हणजे तिरकसपणा नाही मैत्री म्हणजे भंकसपणा नाही.... मैत्री म्हणजे आहे तरी काय ? मैत्री अनुभवायचीच चीज हाय ! .

ड्रायफ्रूट बर्फी

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 23/09/2012 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात घरी महालक्ष्मी पूजेनिमित्त गोडाधोडाच्या जेवणाचा घाट घातलेला असतांना सासूबाईंना इथे मी आणि नातू परदेशात एकटे आहोत याचं वाईट वाटत होतं. "उद्या शनिवार आहे, निदान काहीतरी गोड कर, साधा शिरा केलास तरी चालेल, पण पोराच्या आणि तुझ्या पोटात काहीतरी गोड जाऊ देत!" म्हणाल्या. 'बरं' म्हंटलं, आणि शिरा सोडून आपल्याला झेपेल असं गोड काय करता येईल यासाठी घरात काय आहे ते शोधायला लागलो. खारीक, बदाम आणि कंडेन्स्ड मिल्कचा डबा सापडला.

नवी वेताळ पंचविशी

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 22/09/2012 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमादित्य राजा अन वेताळाची कथा पूर्वी चांदोबा या मासिकात क्रमश: येत असे. या कथेमध्ये पुन्हा आणि डोक्याला खाद्य अशा अनेक कथा गोवलेल्या असत. मूळ कथेत एक राजा (विक्रमादित्य) अन एक वेताळ असे. (या वेताळाबद्दल आम्हाला भीतीयुक्त, भयानक आदर वाटत असे. पुढे ‘सज्जन’ नामक अभिनेत्या(?)ने ‘विक्रम और वेताळ’ नावाच्या मालिकेत वेताळाची केलेली भूमिका पाहून, या भीतीयुक्त आदराचे हास्ययुक्त इनोदात परिवर्तन झाले.). हे दोघे नित्य नेमाने एकच उद्योग करीत असत.

चक्काजाम

लेखक रमेश आठवले यांनी शनिवार, 22/09/2012 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका दूर चित्र वाहीनीवर एक गृहिणी कालाजाम नावाचा एक पदार्थ करून दाखवीत होत्या. त्यासाठी त्यांनी समप्रमाणात पनीर व खवा घेऊन त्यात पुरेसे कॉर्नचे पीठ मिसळून गोळे करून ते तुपात तळून घेतले होते व त्यानंतर त्यांना पाकात सोडले होते. गोळ्यांचा आकार गुलाबजाम पेक्षा मोठा व रंग अधिक तांबूस होता. आदले दिवशी म्हणजे तारीख २० रोजी बंध, हरताळ व चक्काजाम ची मोहीम सरकारविरोधी पक्षांनी राबविली होती. म्हणून एक विचार मनात आला की वर दिलेल्या पाक क्रियेत पनीरच्या जागी चक्का वापरला तर चक्काजाम नावाचा एक नवीन पदार्थ करता येईल. मी नेहमीच असे पदार्थ करावयास सांगतो (करतो असे नाही).