Skip to main content

घो टा ळा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 04/10/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकजण दुसऱ्याला सांगत होता कंटाळलो आता इतके घोटाळे करून दुसरा म्हणाला कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ? पहिला उत्तरला आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ? दुसरा म्हणाला एका घोटाळ्यातून दुसरा करायचा त्यात नको त्याला अडकवायचं परत त्याची सुटका करण्यासाठी, आपणच धडपड करायची स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ... हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ? पहिला म्हणाला खर आहे दोस्ता ... असे म्हणून- तो पहिला दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे ह्याचा मनातल्या मनात विचार करून आळस झटकू लागला !!! .

कारळ्याची चटणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 04/10/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी कारळे ३/४ वाटी कढीपत्ता ४-५ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणी कमी जास्त) १/४ वाटी तीळ १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी सुके खोबरे मीठ चवीनुसार १/२ टीस्पून हींग . पाकृ: एका पॅनमध्ये कारळे कोरडेच भाजून घ्यावे व एका ताटात काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये कोरडेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व ताटात काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून कढीपत्ता तळून घ्याव

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/10/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले आता?”, कोणीतरी. “अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा. “काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर. “बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका. “आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर. “मग काय!

उर्ध्वश्रेणीचे (आंबट) वरण

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 03/10/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचा पंचवर्षीय वाढदिवस नुकताच साजरा झाला..... त्यानिमित्ताने अलिकडे उंबराचे फूल झालेल्या बर्‍याच लेखकांनी लेखनाची हौस पुरवून घेतली!!

मुहाजिर् नामा

लेखक अश्फाक यांनी बुधवार, 03/10/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
युवराज पाटिलांचा संवेदना http://www.misalpav.com/node/22875 हा लेख वाचला . आणि फाळनिच्या दुखद आठवनीं वर आधारीत मुनव्वर राणा यांची मुहाजिर नामा ही गझल आठवली. मी मागे स्वतच्या धाग्यात टाकली होती http://www.misalpav.com/node/11661 . तेव्हा मला या गझल चे फारच थोडे शेर माहीत होते नंतर कळलं की ही दिर्घ गझल ८०० शेर मिळुन बनली आहे . तर यातीलच काही नविन शेर इथे शेअर करत आहे सोबतच नविन सभासदां साठी जुने शेर जोडुन देत आहे . मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !

नव्या जगाशी जडले नाते ....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 03/10/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
फुटला ट्याहो..तुटली नाळ. नव्या जगाशी जडले नाते ...... स्पर्श मायेचा..घोट दुधाचा नव्या जगाशी जडले नाते..... तुटले दुध..घास चिऊचा नव्या जगाशी जडले नाते ... डबा कडीचा ..लाडू पोळीचा नव्या जगाशी जडले नाते ... फुटली पाटी..सुटली शाळा .. नव्या जगाशी जडले नाते केस उगवले..दाढी केली नव्या जगाशी जडले नाते...... लागे नोकरी..खुळखुळे दमड्या नव्या जगाशी जडले नाते ..... एकच प्याला .पहिला घोट नव्या जगाशी जडले नाते......... घट्ट मिठी ..पहिले चुंबन नव्या जगाशी जडले नाते..... सुटे गाठ..मिटे लाज नव्या जगाशी जडले नाते ...... लहान घरटे..
काव्यरस

जुना पुराणा पिंपळ ...

लेखक मनीषा यांनी बुधवार, 03/10/2012 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
जुना पुराणा पिंपळ उभा नदीच्या तीरी । आल्या-गेल्या वाटसरूला देई मायेची सावली ॥ जुना पुराणा पिंपळ आटवांचा त्याला पार । पक्षांची मिरवी घरटी अन् किडामुंगीचा वावर ॥ जुना पुराणा पिंपळ त्याची हिरवी-पिवळी पाने । नव्या ऋतुंची पालवी अन् जुन्या ऋतुंचे जाणे ॥ जुना पुराणा पिंपळ त्याच्या किती कहाण्या । छायेत नाचती सजती आठवणींच्या भिंगोर्‍या ॥ जुना पुराणा पिंपळ विस्तारी चहू दिशांना । झेपावे उंच आभाळी रूजवी मातीत मुळांना ॥ जुना पुराणा पिंपळ सळसळतो पानोपानी सरत्या किती क्षणांचा तोच साक्षी मनोमनी ॥ जुना पुराणा पिंपळ शोधी आसमंती काही । ढळता हिरण्यगर्भ तेथे अन् शुष्क पर्णांच्या राशी॥ जुना पुराणा पिंपळ ख
Taxonomy upgrade extras

भारतात अगरवाल की --

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 03/10/2012 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला व त्याचे भारतातील प्रमु़ख श्री.राज जैन म्हणतात की त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होणार आहे,सर्व कंपन्या या फायद्यासाठी काढ्लेल्या असतात हे खरे,परंतु मला असे वाट्ते की त्यामुळे परदेशातील वालमार्ट भारतात आले की जैन यांच्या भारती टेलीकौम कंपनी सारखे अगरवाल मार्ट होणार व भारताचे चलन व फायदा परदेश वासियांना होणार आहे,तुमची प्रतिक्रिया यावर काय असेल--

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर