Skip to main content

'गोड' बर्फी

लेखक आनन्दा
शुक्रवार, 14/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जाणकार परीक्षण टाकतीलच, पण.. योगायोगाने आज अचानक मनात विचार आला की बरेच दिवसात चित्रपट पाहिला नाही, तर आज एखादा टाकावा. रोज दूरचित्रवाणीवर पाहिल्या जाणार्‍या प्रोमो'झ मुळे बर्फीबद्दल मनात उत्सुकता होतीच, म्हणून गेलो. पिक्चर छान जमला आहे.. अंजाना अंजानी च्या अनुभवामुळे मनात थोडी धाकधूक होती, आणि ते आला बर्फी गाणे पाहताना अस वाटायलाही लागले होते.. पण नन्तर हलकेफुलके विनोद, मध्येच काही बोलके प्रसंग यातून मध्यंतर कधी झाले ते कळलेच नाही. पिक्चर ला कथा अशी काही नाहीच, आणि त्यात हीरो मूकबधीर म्हणजे डायलॉग्स पण नाहीत, मग २ १/२ तास दाखवणार काय असा प्रश्न मनात होता, पण पिक्चर ने नंतर अशी पकड घेतली की हे प्रश्न आलेच नाहीत. काही प्रसंग खरेच न बोलता खूप काही संगून जातात.. विशेषतः इलियाना गाव सोडून जात असताना तो रेल्वेच्या खांबावर आपटण्याचा प्रसंग, किंवा शेवटी बर्फी प्रियांकाला शोधत मुस्कान मध्ये जातो तो प्रसंग. बर्फीचे वडील आजारी पडतात तो तर अप्रतीम! यातले कोणतेच प्रसंग 'अंगावर' येत नाहेत, पण अपेक्षीत परिणाम साधून मात्र जातात. बराच पिक्चर समजला नाही अस वाटतय, पुन्हा एकदा पहावा लागेल. रणवीर कपूर अपेक्षेप्रमाणे निरागस वाटला, पण प्रियांकाची अ‍ॅक्टिंग तेव्हढी पटली नाही. कदाचीत राणी मुखर्जीने या रोलचं सोनं केलं असतं..पण सांगणे कठीण. जिंदगी ना मिलेगी दोबारा आवडला असेल, तर हा पण नक्कीच आवडेल.. आणि तुम्ही दबंग च्या कॅटेगरीतले असेल तर मात्र जाताना विचार करून जा! अगदीच 'गोड' आहे. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5317
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मलाही बघायचं...एकंदर परीक्षणावरून तर खरच खूपच वाटतोय...नक्की बघते ...प्रोमोस पहिले होते तेव्हापासूनच ठरवलंय कि जायचाच म्हणून ...या रविवारीच बघते...बाकी सिन्स बद्दल सांगितलं म्हणून उत्कंठा अजूनच वाढलीये ..

बर्फी खरच गोड आहे. कालच फस्ट डे फस्ट शो पाहिला. बर्फी सुन्दर आहे. अभिनय सर्वानि अत्यन्त सुन्दर केला आहे. गानि कर्न्मधुर आहेत. कथा नितन्त्सुन्दर पधतिने हातलालि आहे. इत्का भावनिक असुनहि विनोदि पधतिने सादर केला आहे त्यामुले जड वाटत नाहि

In reply to by सुजित पवार

एक्झॅक्टली.. मला तो पु.लं.च्या लेखनासारखा वाटला.. हसता हसता अंतर्मुख करणारा.. फक्त तो इंटिमेट सीन तेव्हढा जमला नाही असे वाटले. खूप अनपेक्षित लिप-लॉक झाले आणि सुन्दर बर्फीत अचानक खडा लागल्यासारखे वाटले..

छोटेखानी आढावा आवडला. तुमच्या मताचा आदर राखून असे म्हणावेसे वाटते की तुमचे एक मत मात्र खटकले.
रणवीर कपूर अपेक्षेप्रमाणे निरागस वाटला,
निरागस ? अहो, त्याला आणि त्या जादूला शेजारी शेजारी उभे केले, तर पटकन जादू कोणता आणि रणवीर कुठला तेच समजायचे नाही. कणेकरांच्या स्टाईलने सांगायचे तर, 'ज्याच्या चेहर्‍यावर थोडीफार हालचाल होते तो जादू आणि जो प्रत्येक प्रसंगात तसाच मख्ख राहतो तो रणवीर' असे ओळखावे लागेल.

In reply to by जाई.

अंमळ गल्लत होते आहे का ? मी कोल्हा नाही आणि तो द्राक्षे नाही. का, मी शाहरुख नाही आणि तो करण जोहर नाही असे म्हणावे ? असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

कपूर खानदानात अभिनय कोणाला जमला आहे आजपर्यंत ? सगळेच ओव्हरअ‍ॅक्टिंगचे बादशहा!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो नक्की रणबीर कपूर बद्दल बोल्ताय की बॅण्ड बाजा बारात च्या रणबीर सिंग बद्दल? कारण जेवढे चित्रपट मी रणबीर कपूरचे पाहिलेत तेवढ्यांत तोच मला खरा अ‍ॅक्टर वाटला. बर्फी अजून पाहिला नाही पण रॉकस्टार मध्ये तर त्याने पटकथेचे सोने केलेय. अर्थातच सावरीया आणि अंजाना अंजानी टुकार होते पण सध्या गडी अ‍ॅक्टींगच्या बाबतीत नक्कीच फॉर्मात आहे.

In reply to by विनीत संखे

अहो नक्की रणबीर कपूर बद्दल बोल्ताय की बॅण्ड बाजा बारात च्या रणबीर सिंग बद्दल?
रणबीर सिंग बद्दल बोलणे म्हणजे चिखलात दगड मारणे.

सगळंच फक्कड जमून आलं की साधी पाककृती देखील रुचकर होते. तसच काहीसं "बर्फी" बद्दल. उत्तम गाणी, भयंकर अंगविक्षेप/कवायती विरहित नृत्य, एकही आयटम गाणे नाही किंवा उत्तान दृष्ये नाहीत, वेगळीच कथा, flashback चा प्रभावी वापर या सगळ्या गोष्टींमुळे बर्फी गोड आणि सुसह्य झाला.

अत्यंत 'तरल' की काय म्हणतात तसा चित्रपट आहे. अतिशय आवडला. उथळ चित्रपटांची भाउगर्दी झालेली असताना वेगळा उठून दिसणारा चित्रपट आहे.

. Congress decided to ban BARFI They claim Anurag Basu has copied the story of Congress. A deaf and mute person whose life revolves around mentally challenged women who speaks with strange accent and Bengali women who always ends up getting him into trouble.