Skip to main content

[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा

लेखक पुष्कर जोशी यांनी शनिवार, 22/09/2012 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी BSNL Brodband ४-५ वर्षा पासून वापरीत आहे... माझ्याकडे Type 1 मोडेम आहे ... साधारण महिन्या पूर्वी मोडेम चे अडाप्टर जळले ... ठीक आहे ना इतके वर्ष चालले बरेच आहे .... मग मी BSNL च्या कार्यालयात गेलो म्हटले कि original घ्यावे त्रास नको .. तर तिथे कळले कि आता हे लोक मोडेम विकतच नाहीत ते सरळ म्हणाले कि बाजारातून घ्या ... बाजारात शोध घेतल्यावर कळले कि अडप्टर सामान्य नाही जरा वेगळे आहे 10 V 550 mA .. त्यामुळे मला चटकन मिळेना ... आणि ब्रांडेड तर नाहीच नाही .... मग आठवले कि आपल्या कडे जुनी सोल्ड्रिंग गन आहे आपण कोणे एके काळी electronics चे विद्यार्थी होतो ..

प्रयत्न

लेखक Kavita Mahajan यांनी शुक्रवार, 21/09/2012 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संगणकावर मध्यंतरी काही चित्रं करून पाहिली. त्यातील हे एक.

होय ( शर्मिला इरोमसाठी ) : सत्चिदानन्दन यांच्या मलयाळम कवितेचा अनुवाद

लेखक Kavita Mahajan यांनी शुक्रवार, 21/09/2012 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शरीर आहे माझा ध्वज अर्ध्यावरचा. मला पाणी मिळतं उद्याच्या नदीतून, भाकरी वार्‍याच्या स्वयंपाकघरातून. माझ्या मेंदूत आहे एक बंदुकीची गोळी हिरवीगार अंतर्ज्ञानी माणसाच्या पोपटासारखी. माझं नाव आहे शेवटचं अक्षर माझ्या पुरातन भाषेतलं शेवटचं उत्तर प्रत्येक कोड्याचं तात्पर्य प्रत्येक म्हणीचं ईश्वर प्रत्येक जादुई सुरावटीचा दुश्चिन्ह... ( सत्चिदानंदन यांनी जयपूर फेस्टिवलमध्ये वाचलेल्या कवितेचा मराठी अनुवाद )

फौजिया अबू खालिद यांच्या कवितांचा अनुवाद

लेखक Kavita Mahajan यांनी शुक्रवार, 21/09/2012 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
१.पाणी तिनं वाळवंटात आपली बोटं बुडवून एक कविता लिहिली मृगजळानं... जी टपकतेय टप टप टप एक लय. इंद्रियातीत... २.

दुरावलेलं..

लेखक गुड्डू यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परतीचा प्रवास, वाटेत फक्त अंधार.. क्षितिजाची फक्त चाहूल, बाकी सर्व काळोख.. रातकिड्यांची किर्र किर्र, हलकेच वाऱ्याची शिळ.. पत्थरांची रेलचेल पायी, ठेच - खाच खळगेची साथ.. असं कसं घडलं, नक्की कुठे पाल शिंकली.. सर्व काही नीट चालू असता, कशी सर्व घडी विस्कटली.. आपण सूर्याला गाठलेलं, त्याला हसून हस्तांदोलन केलेलं.. जे न पाहिलं त्या रवीने, ते आपण दोघांनी सहज अनुभवलेलं.. तसं आठवतं घडलेलं सर्व काही, पण मन काही मानत नाही.. आठवणी येत राहतात , मनातून काही जात नाही.. आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याल
काव्यरस

नवजन्म

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
घेता जन्म नाळ जुळली. आजन्म साथ मरणाची लाभली. आपुलेच प्रेत खांद्यावरी घेत. तुडवली जन्म मरणाशी येत. मुक्ती दिली आतुर जिवा. पांग फेडण्या नवजन्म हवा. रे मरणा नवजन्म हवा.