Skip to main content

वैसी

लेखक रेशा
Published on शनीवार, 15/09/2012
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just cut U r self off from the matter and person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life" तो म्हणत होता ते सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं. Prostitution , immoral trafficking in woman हा प्रश्न हल्ली जास्तीच sensitive होत चाललाय. तो दलाल १०००% गुन्हेगार असतोच पण ती मुलगी? तिचं काय? तिला कायदा victim म्हणतो ... हो ती victimच परिस्थितीची... दुसर्याच्या हव्यासाची? पैशाच्या गरजेची? की तिच्या स्वत:च्या मोहाची? की एका पुरुषाच्या क्षणिक मस्तीची? हा प्रश्नच आहे... पण काही असलं तरी ती खरच victim असते!!! आज तिची २१ वर्षांची बहीण मला रडून रडून सांगत होती, माझी बहिण फक्त १६ वर्षांची आहे, ती आताच मुंबईत आलीये, madam तिला बाहेर काढा .. judges म्हणे या केसेस मध्ये खूप sensitive असतात आणि म्हणून फक्त २१ वर्षांच्या मुलीच्या हातात victim ची custody देण शक्यच नाही . ती मुलगी वाचली कारण पोलिसांनी धाड टाकली, जर नसती टाकली धाड आरोपीचा हेतू साध्य झाला असता ( विचार करून सुद्धा काटा आला अंगावर). तिच्या बहिणीपेक्षा म्हणे CWC वाले तिला सुधारू शकतील, तिची काळजी घेऊ शकतील. तिला reformation ची आणि care ची गरज आहे आणि म्हणून तिचा ताबा CWC ला देण्यात यावा ( ???). पुढे काय? कोणत्याही सुधार गृहात अश्या मुलींना ठेवण किती धोक्याच असतं? खरच सुधारेल ती? की "संगती संग दोषेण" म्हणून एक चांगला आंबा बाकीच्यांबरोबर राहून नासेल? पोलिसांना टीप मिळाली म्हणून तिचं आयुष्य वाचल नाहीतर? काही दमड्यानसाठी एक मुलगी चक्क बाजारात विकायला काढली होती. नराधमांच्या हपापलेल्या नजरा आणि दलालांचा पैश्याचा हव्यास यात तिचं तारुण्य, तिचं मनं , भावना त्यांनी ओरबाडल्या असत्या. पुरशांच्या राज्यात त्या शेळीच्या पिल्लाचा नाहक बळी गेला असता. मजबुरी च्या नावाखाली स्वतःचा सौदा होताना बघतात मुली. एकच सत्य म्हणजे शरीर!! तेच विक्रीला काढतात, पण असा भर बाजारात, लिलाव मांडतात त्यांचा.. तेव्हा .. तेव्हा खरच त्यांच्याकडे परीयायच नसतो; मुळात सगळे रस्ते बंद आहेत म्हटल्यावरच अश्या नराधमांच फावत आणि ते चक्क जिती जागती मुलगी विकण्याचा डाव खेळतात. हा, आता असतील काही मुली ह्या सगळ्याकडे easy money म्हणून बघत, काही तर फक्त स्वत:च्या आवाजवी इच्छा आणि so called गरजा भागवायला पण ह्यात पडत असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्या फक्त काही % च उरलेल्यांच काय? १५ मिनिटे, फक्त १५ मिनिटे मला त्या मुलींशी बोलायला मिळाले. सगळे प्रयत्न करुन आम्ही बाहेर आलो, आई-वडीलांना घेऊन ये असे तिला संगून निघणार तोच तिच्या सोबतची मुलगी स्वतःहुन बोलली, मेरा तो ठिक है, पर इसका कुछ हो पाता तो अछा था| नसीब अपना. पता है madamji अभी आते आते वो औरत बोली ये लडकीया "वैसी " हैं. सच हैं, मै.. मै तो हुं ऐसी पर " वैसी" बनना किसीकी ख़ुशी नै होती | जब साला बेवडा बाप किसीको बाजार मै बिठाता हैं ना १४ बरस की उम्र मै, तब किसीको नाही पता होता की वो "वैसी" बनने जा राही हैं। समझता है सिर्फ और सिर्फ डर! अरे इतनातक नही समझता क्या है मेरे पास, कुछ घंटोमें क्या खो दिया है? समझता है तो वो दर्द| सिर्फ और सिर्फ दर्द और बहोत जादा डर|" मी गप्प झाले. खरच तिचं दु:ख सारे बंध तोडून वाहत होतं, पण डोळे मत्र कोरडे ठक्क होते! एक उपभोगाची वस्तू म्हणून सतत बघितलं गेल्याची सल आणि समाजाकडून हिणवल, नाकारलं गेल्याची जखम खपली फाडून बाहेर वाहत होती मनाला पीळ पडेल असे जळजळीत सत्य पण ती मात्र कोरडी उभी होती. तिच्याकडे बघून वाटल खरच कशी निबर, कोरडी बनलिये ही? ती, मी, ती समोरची जज्ज, आम्ही सगळ्याच स्त्रिया, मग आम्ही भावनाप्रधान असण सहाजिकच! मग ही इतकी कोरडी कशी? की जोवर बाई " वैसी" होत नाही तोवरच भाव-भावनांचं आवडंबर माजवते ? का "वैसी" झाल्यावर गमवायला काहीच उरत नाही म्हणून भावनाच मरतात??? आयुश्यात नकोश्या वाट्णार्या सगळ्याच गोष्टी टाकून देता येतात. झटकता नाही येत ते "वैसी" असण. एकदा शरीराला हे हे वैसी पन चिकट्ल ना की मग ते म्रुत्युपर्यन्त साथ देतं. समाजात हिणवल जात. सतत वाईट नजरेने बघितल जात अश्या स्त्रि कडे, तिच शरीर आणि पेहेराव पहीला जातो पण तिच मन? ते कोणी कधी पहातच नाही. की परीस्थितीला शरण जायला भाग पडलेल्या ह्या बयकांना मन नसतच अस वाटत आपल्याला? शेवटी ती ही जिवंत माणूस आहे, स्त्री आहे तिलाही तिचं भाव-विश्व आहेच की!! हे मला कधीच का नाही उमगल? ती "वैसी" म्हणून हिणवायचे तरी, नाहीतर सहानुभूती (तीही किलो किलोने ) दाखवत फिरायचे (तेही समाजसेवेचा फार्स म्हणून) अशी भुमीका समाज स्विकारतो. का नाही त्यांना माणूस म्हणून कोणी समाजून घेत ??? लहानपणापासून मनावर कोरलेल गेलेले सगेलेले, परिस्थितीला शरण नाही जायचं. चारित्र्य जपायचे, वैगरे जे पांढरपेशी तत्वज्ञान असते, ते भरल्या पोटी ऐकायला ठीक असते. पण खरंच जेव्हा जन्मदाताचं एखादीला (तिच्यच त्याच भाषेत सांगायचे तर) धंद्याला बसवतो तेव्हा? जेव्हा त्या अर्धपड्या वयात पोटातली भूक बोलू लागते तेव्हा? स्वतःबरोबर नक्की काय घडतय हे समजायच्या आत जेव्हा तिचा सौदा होतो तेव्हा, कसं वाटत असेल त्या मुलीला? आपण कधीच हा विचार करत नाही. कधी खेळा-बागडण्याच्या वयात तर कधी सफेद घोड्यावरल्या राज्कुमरची स्वप्न बघण्यात गुंग असलेली पोर अचानक कोणाच्या हव्यासाला बळी पडते अणि भानावर येते तेव्हा ती "वैसी" बनलेली असते. अशी "वैसी" बनलेली स्त्री आणि तिचं अस्तित्व तिच्या समस्या कोण मनापासून समजून घेतं का? मी तरी कधीच नाही विचार केला आजवर. पण आज करावासा वाटतोय खरंच जे आहे ते हे असे, ती अशी आहे, मग? पुढे? तिला सहानुभूती द्यायची फक्त आणि credit घ्यायचं जसे बरेचदा घडते की तिला संधी द्यायची, समजून घ्यायचं नी सहानुभूती न देता तिला हिम्मत द्यायची?? पुनश्च सुरुवात करायला प्रवृत्त करायचं??? जिला हात हवा, तिला हात देऊन त्या दलदलीतून बाहेर काढून, मोकळा श्वास घ्यायला मदत करायची! असा निश्चय झाला. त्या कळीला उमलण्या आधीच, असे कोमेजून नाही द्यायचे. पण हे खरच जमेल मला? ठरलं.. बाकीच्यांचं माहीत नाही पण जी हातात आहे, तिच्यासाठी काहीतरी करायचेच, मनात गाठ मारली. हा विषय आणि समस्या खूप क्लिष्ट आहेत, नाजूक आहे हा विषय!! पण विचार करायलाच हवा निदान तिच्या साठीतरी!! प्रचंड राग आणि ता मुलीसाठी काहीही न करू शकल्यामुळे आलेली अस्वस्थता सावरून, आवरून घेऊन आणि विचार "नाही" करायचा अजून असे ठरवून मी ट्रेन मधून उतरले. घरी आले तो माझ्या बेडरूम मधलं चिऊच घरटं!! आज रिकाम वाटलं, म्हणून जरा डोकावून बघते तो काय?? पिल्लं उडून घरटा ओस पडलेला. माझ्यासाठी नेहमीच अप्रूप असलेलं आणि गवत, कापूस, चार काटक्यांनी सजवून सुध्धा सजीव भासणार ते घरटं भकास, उजाड दिसत होतं. ते घरटं पाहून आज खूपच अस्वस्थ वाटलं मला!!! सहज मनात आलं, त्या मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा??? तिच्या आईच ते निगुतीन मांडलेल चार भिंतीत वसलेलं 'घरटं' ते पण असच क्षणात भकास आणि उजाड होऊन जाईल न???? ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 1773
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

काय लिहू समजत नाहीये. अनुभव अंगावर येणारा आहे आणि लेख चांगला जमला आहे पण तरी काही दिवसांनी ती मुलगी परत तिथेच दिसली तर आश्चर्य वाटायला नको. जगातला सगळ्यात जुना व्यवसाय आहे ना तो? आणि तिच्या आईवडिलांनीच तिला विकली नसेल कशावरून? या जगात मूठभर पैशांसाठी काहीही करणारे लोक आहेत आणि कितीही वाईट वाटलं तरी असल्या प्रकारात मधे सापडायची इतर कोणाची तयारी नसते. कारण मग नको त्या भानगडी येऊन चिकटतात.