Skip to main content

मिसळपाव - नवी रचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 19/09/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत

श्री गणेश मूर्तीच्या मागची आरास:- चक्र

लेखक मीनल यांनी सोमवार, 17/09/2012 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र श्री गणेशाला लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत. झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले! बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत.

मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 17/09/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist) मायन्सच्या र्‍हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे 'तोल्तेक'. नौवात्ल भाषेतील "Tollan" या शब्दावरून "तोल्तेक" हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ Artist. हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी.

मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 17/09/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली...

पु.ल :महाराष्ट्राचे लंगडे व्यक्तिमत्व !

लेखक तर्री यांनी सोमवार, 17/09/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. ह्या ब्लॉग मध्ये अतिशय वैचारिक , पुरोगामी व बहुजनहिताय लेखन केलेले आहे. अनेक तथाकथित मान्यवरांची धोतरे , तुमानी टराटरा फाडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज - ज्यांना साहित्य चोरी करता ज्ञानपीठ देण्यात आले त्यांचा समावेश आहे. आता कुसुमाग्रजांवर / त्यांच्या नाटकावर शेक्पिअरचा प्रभाव होता हे स्वतः तात्यासाहेब म्हणायचे ! पण हया ब्लॉग च्या विदुषींनी वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या “नटसम्राट” हया नाटकात कशी शेक्पिअरची वाक्ये उचलली आहेत ? त्याचा अती सखोल अभ्यास केला आहे. सर्व सामान्य वाचकास हे संशोधन झेपणारे नाही.

बौद्धिक दिवाळखोरी

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 17/09/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी महाराष्ट्रातील ही घटना फारच वाईट आहे. त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे "डान्स बार बंद (?)करून तरूण पिढीली वाचवले" असा दावा करणा-या मा. आर. आर. पाटील यांचा प्रस्तावाला विरोध. जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांना शिक्षणाची अट लागू करण्याचा प्रस्ताव बारगळला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे . महिला व राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना ८वी पास , तर खुल्या प्रवर्गातील प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना १०वी उत्तीर्ण होणे बंधनकारक करणे असा ठराव राज्य मंत्रीमंडळाच्य बैठकीत आला होता. बंधनकारक करणे गैर नव्हते .

निहारी

लेखक गणपा यांनी रविवार, 16/09/2012 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
चुकला फकीर जसा मशिदीतच सापडायचा तसेच भरकटलेले अस्मदिक पुन्हा एकदा सामिष पाककृतीकडे वळतो. :) गेल्या आठवड्यात 'मी मराठी'वर न्यहारीच्या पदार्थांवर चर्चा चालली होती. त्यात प्रतिसाद देताना निहारीची आठवण निघाली. दोन्ही शब्दांतल सार्धम्य पण कुतुहलाचा विषय आहे. (थोडंस गुगलल्यावर कळलं की याच मुळ 'Nahar' نهار‎ (मराठी अर्थ दिवस) या एका अरबी शब्दात आहे. जाणकार मंडळी यावर प्रकाश टाकतीलच.) परत त्यात हा पदार्थ शक्यतो सकाळी न्यहारीच्या वेळीच खाल्ला जातो. अनेक उपहार गृहातही निहारी केवळ न्यहारीच्या वेळीच मिळते. अगदी ११ वाजता गेलात तर संपलेला असतो.