Skip to main content

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी ! असे काहीसे मजकूर ऐकायला आणि वाचायला मिळतात टी.व्ही वर, वृत्तमानपत्रात. अरेरे, पण या लोकांच्या भावना गेल्या कुठे ? त्यात भरीस पाडतात ते आपले जनसेवक, मिडियावाले ! आता काय दाखवायचं, कसं दाखवावं आणि काय झाकायच, हे त्यांनी बहुधा शिकला नसावं का ? पण इथे यांच्या खुणाच उलटया. आपल्या वाहिनीला कशी प्रसिद्धी मिळेल, सर्वोत्तम टी.आर.पी (प्रेक्षक-संख्या) मिळेल ? यातच चढाओढ. एखादा प्रसंग कसं 'एनकॅश' करायचा हेच आजकालच्या जर्नलिझम मध्ये शिकवतात, असा वाटतं. हा शब्द 'एनकॅश' मुळात घातकच आहे. बरं, ही माणसे प्रश्न तरी कसे विचारणार, तर झाल्या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? आता जिथे त्यांचे परिजन या हल्ल्यात म्हणा की अन्य कुठल्याही दुर्दैवी प्रसंगात, मेले आहेत. अरे, लेकांनो ती माणसे आहेत , भावना शून्य रोबोट नव्हेत, हे त्यांना कोणीतरी समजावा रे, जरी तुम्ही झाला असलात तरी. साधा कुत्र्या, मांजराला लागलं, मारलं तर आपण लगेच प्राणीवादी बनायला तयार..मग ताबडतोब मोर्चे, निदर्शने, आजकालच्या भाषेत फेसबुक वर कार्यक्रम ठरवून कोण कोण हजार राहणार याची हजेरी घेणे इत्यादी. आता यात यांचा काय जातंय म्हणा, सोशल कॉज म्हणे. जो तो उपटcसुम्भासारखा येतो आणि प्रसिद्धीच्या मागे धावतो. अरे, यक्ष्न कोणी सांगा रे, की देवाने जो दोन पायांचा जीव निर्माण केला आहे, त्याला 'माणूस' म्हणतात, त्याच्याकडे बघा, त्याला सावर. चार पायांचे प्राणी आपोआप निसर्गाकडून सांभाळले जातात; त्यांना तसा उपजतच स्वतःच रक्षण करण्याचा दान दिल आहे. पुढे सांगायचा झाला तर काय आजकालच्या लोकांचा फॅड आहे नवीन, जरा कुठे काही अघटीत घडला की निघाले मेणबत्त्या घेऊन. किंवा दोन मिनिट मौन वगैरे पाळून. आता मी या भावनेच्या विरुद्ध नाही, पण त्या जर तारतम्याने वापरल्या तर, अन्यथा मस्तक खवळल्याशिवाय राहत नाही. वरून, हें प्रताप यांचे एक-दोन दिवस झिंग आल्यासारखे असतात आणि काही होतंय असं वाटायच्या आत मावळतात. पण गरजूंना साधी कोणी मदत केली आहे का ? विचारपूस तरी केली आहे का ? मग आमच्या पुढे पुढील प्रश्न दत्त म्हणून उभे राहतात, की बाबा ! कोण लागतात हें आमचे एवढे, की आम्ही त्यांच्या बद्दल एवढा विचार करू? (आता अशा वेळी दत्त म्हणून पुढे उभे राहणे का म्हणतात ते माहीत नाही.) कोण लागतात हें आमचे? आम्ही का म्हणून मदत करू? आम्हाला याच्या मोबदल्यात काय मिळेल ? अशी ही मोठी प्रश्नावली मनात तयार. मात्र बोलून दाखवायची हिंमत कोणात नाही. कारण त्यालाही निर्भीडपणा लागतो, जो आज काहीसा मावळत चाललाय. (काही निर्लज्ज मात्र हें बोलूनही दाखवतात बर, मग अशांच्या माणुसकी विषयीचा वेगळाच प्रश्न उभा राहतो). काहींची म्हणे पत कमी होईल अशाने समाजात. अरे ! पण ह्या सोम्यांना कोण समजावणार, की ज्या लोकांचा, समाजाचा कारण पुढे करून हें अवडंबर माजवत आहेत, तो समाज त्यांना पोसायला येणार नाहीये. या समाजाला एकाचा धंदा, जुन्या-पुराण्या कुठल्यातरी परंपरा जपायच्या, ज्या काळानुरूप ओसरायला पाहिजेत. त्यांना वाटता की त्या जपल्या म्हणजे आपला "कल्याण". पण त्यांना हें माहीत नाही, हेच ते "कल्याण", त्यांना माणुसकीच्या विरुद्ध दिशेने अधोगतीकडे घेऊन चालले आहे. हें आता समाजाला उर फुटेस्तोवर सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आता या बॉम्बस्फोटाच्या घटनेवर किती पत्र, संदेश पाठवण्यात आले, इमेल-मोबाईल वरून. वृत्तवाहिन्यांवरून चिथावणीदायक दृश्य, चित्रे सतत दाखवण्यात होती. पण हेच संदेश कितीसे असे पाठवले गेले, की त्या हल्ल्यात सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात हवा आहे ?. आपणही असा विचार केला होता का, की मी माझ्यापरीने कसा हातभार लावू, मग तो खारीचाही का होईना ?. मोबाईल वरील संदेशही कसे होते, तर म्हणे "त्या दिवशी कसाबचा वाढदिवस होता, म्हणून आतंकवाद्यांनी हें स्फोट घडवून आणले, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी", आता काय म्हणावं, अशा मंद बुद्धींना, ज्यांनी हें संदेश प्रसारित आणि पुढे त्याचे वाटप केले ! बर्थडे ब्लास्ट म्हणे ! मूर्ख लेकाचे. आपण आपल्या वाढदिवस साजरा करण्याला बर्थडे ब्लास्ट म्हणतो, अहो पण त्या लेकाच्यांनी त्याचा शब्दशः अर्थ काढला ना हो. प्रत्येक गोष्टीचा आजकाल विडंबन करण्याची सवय लागलीय लोकांना. पण म्हणून काय जनतेच्या भावनांशी हा खेळ ? आता या भावना कुठे उरत चालल्या आहेत म्हणा. अहो पण ज्यांच्यात ज्या काही भावना उरल्यात त्यांच्याबद्दल मग सहानुभूती वाटून राहते. काय तर म्हणे, स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी, अहो मग पण भावना कशाशी खातात हेही कळण्याची बुद्धी उरू नये ? बर ते सरकारच, Anti Terrorist Squad काय करताय तर, काही नाही. प्रत्येक गोष्टीचा जाब, हिशेब द्यावा लागतो म्हणे त्यांना, साध्या गोळ्या किती झाडल्या याचाही.. कीव येते त्यांची. कारण इच्छा असूनही त्यांना त्यांची कामगिरी बजावता येत नाही. मग त्या साल्या अतिरेक्यांना कितीही गोळ्या झाडू देत, पण जर ते तुमच्या तावडीत सापडले तर त्यांना ठार नाही करायचा, तर नुसत्या पायावर गोळ्या झाडायच्या म्हणे. का तर म्हणे त्यांच्या साथीदारांची नाव आपल्याला कदाचित कळू शकतील म्हणे. जिवंत हवा आहे आहे तो आम्हाला, आणि आपला कोर्टाचा कामकाज तर सर्वश्रुत आहेच, यात काही वादच नाही. देओलांचा सनी उगाच नाही भडकत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणत. बर या उपर, काहींनी मदतीचा आवाहन केला तरी हा समाज आहेच वर बोलायला, की आम्ही का म्हणून, शासनाचा काम आहे ते. अहो पण शासनाच्या कामाचा वेग सर्वांस श्रुत आहे, आधी चौकशी समिती नेमली जाणार (तीही उच्चस्तरीय बर का ?) मग अहवाल मांडला जाणार, आणि मग काय...... तो अहवाल बासनात, नाही का ... गोर गरिबांना, गरजू पीडितांना मदत करा, असं उपदेश मी नाही करणार इथे, हें ज्याचा त्याने समजायला हव. आणि हो, जर का केलात, तर अशा गोष्टींचा उहापोह करून त्या केलेल्या दानाच अवडंबर तरी माजवू नका म्हणजे मिळवलं. कारण केलेलं दान हें अशा रीतीने वाया जात त्या दात्याच्या दरबारात. त्याचा रंगच उडून जातो. एक आत्मिक समाधान जी मिळते ते मग नाही मिळत. बघा बार प्रयत्न करून तुम्ही आजपासून.. छान वाटत. एका जाहिरातीत ऐकला आहे, "करके देखो, अच्छा लगता हें" उद्रेक भीषण स्फोटांचा झाला खरा, पण आता आपल्या भावनांचा कधी कोणार ?? इति...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6102
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

>>बर ते सरकारच, Anti Terrorist Squad काय करताय तर, काही नाही. -- बेजबाबदार विधानं किती करावी याला काहि सीमा?? हद्द झाली बिण्डोकपणाची. A.T.S. वाले तुमच्या घरी येऊन रोजचं रिपोर्ट कार्ड देतात काय? >>प्रत्येक गोष्टीचा जाब, हिशेब द्यावा लागतो म्हणे त्यांना, साध्या गोळ्या किती झाडल्या याचाही.. -- अर्थात द्यावा लागतो. फक्त भारतात नाहि तर सिस्टीम म्हणुन काहि राबवत असलेल्या जगातल्या कुठल्याही देशात हेच घडतं. >>कीव येते त्यांची. -- मला तुमची कीव आलि हे सगळं वाचुन >>कारण इच्छा असूनही त्यांना त्यांची कामगिरी बजावता येत नाही. -- फुकटच काहि बाही बोलायचं/टंकायच?? A.T.S. सिस्टीम किती क्लिष्ट आहे आणि ति कशी ऑपरेट होते याचं किती ज्ञान आहे तुम्हाला? >>मग त्या साल्या अतिरेक्यांना कितीही गोळ्या झाडू देत, पण जर ते तुमच्या तावडीत सापडले तर त्यांना ठार नाही करायचा, तर नुसत्या पायावर गोळ्या झाडायच्या म्हणे. का तर म्हणे त्यांच्या साथीदारांची नाव आपल्याला कदाचित कळू शकतील म्हणे. जिवंत हवा आहे आहे तो आम्हाला, -- परकीय शक्तींच्या कारवायांचा पुरावा, इतर कारस्थानांची माहिती आकाशातुन पडाणाअर काय मग? >>आणि आपला कोर्टाचा कामकाज तर सर्वश्रुत आहेच, यात काही वादच नाही. देओलांचा सनी उगाच नाही भडकत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणत. -- अस्सं. म्हणजे सनी देओल अंगात घुसला वाटतं. अरे त्याला ओरडण्याचे पैसे मिळतात. एव्हढाच आदर्श घ्यायचा तर मार ना ५०० जोर-बैठका. हे असले प्रश्न पडणार नाहित, आणि पडलेच तर उत्तर देखील मिळेल. अर्धवटराव

लोकल पारायण १२-१५ बाप्पा मोरया १२-१७ आणि हा स्फोट १२-१९ अवघ्या चार मिनीटात तीन लांबलचक लेख कसे काय पाडलेत बुवा ? कौतुक करावं तितकं कमीच !! (सूडीके बोस)

In reply to by सूड

सूडकुमारा, हा प्रतिसाद वाचून आमच्या जुन्या मित्रवर्यांची आठवण झाली. ते दिसत नाहीत हल्ली. तुला ब्याटन देऊन गेले वाटते ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

छे हो, मी आपलं निरीक्षण नोंदवलं विमेकाका !! बाकी पीठ त्यांचं, तेल/तूप त्यांचं, साखर त्यांची, पाक त्यांचा; खुश्शाल जिलब्या पाडू देत. ;).

मोदीनीं नाही का इशरत ला पकडुन अहमदाबादेच्या जेल मध्ये ठेवलय बिर्याणी खायला. त्यान्नी पण इशरत व साथीदारांच्या पायावर गोळ्या झाडुन त्यान्ना पकडुन त्यांच्या साथीदारांची नाव जाणुन घेतलीय. आणी केदारांच्या अंगात सनी नाही मोदी घुसलेय्,व मोदीनां दंड बैठकांची गरज नाहीये,ते डोक वापरतात. (राहीली A.T.S. सिस्टीम, ती नाही उगाच फक्त साध्वी आनी कर्नल च्या मागे लागली होती त्यामुळे ती कशी चालते हे लोकांना माहीतेय)

तो आदर्श घ्यायला देखील हरकत नाहि. बाकी A.T.S. चं मुखपत्र गावच्या चावडीवरुन पब्लीश होतं हे नव्यानं कळलं... तेव्हढच आपलं जळणाला सर्पण, गुरांना चारा. अर्धवटराव

बाकी A.T.S. चं मुखपत्र गावच्या चावडीवरुन पब्लीश होतं हे नव्यानं कळलं... तेव्हढच आपलं जळणाला सर्पण, गुरांना चारा. अर्धवटराव/????????????? तुम्ही कसाबच्या हल्ल्याअगोदरचे पेपर वाचले नव्हते काय

In reply to by अर्धवटराव

काय कामाची ती कार्य शैली तिच्याप्रमाणे चालले असते तर हे एव्हढे सगळे हल्ले काही प्रमाणात का होइना थोपवीले गेले असते. हल्ल्या नतंर मोठ्या गर्जना करुन येव करु त्येव करुच्या बाता करणारे कुठे गेले,लाईफ जॅकेट्,अत्याधुनीक पाणबुडी वैगरे घेणारे झोपले काय, A.T.S.ची कार्यशैली तुम्ही ठरवीतात का?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हे असले टुकार लेख आणि प्रतिक्रीया द्यायला पब्लीकला भरपूर सवड मिळतेय कारण बॅकग्राऊण्डला A.T.S व इतर अनेक संस्था आपापल्या पद्धतीने गपगुमान आपलं काम करत असतात. अर्थात, लोकांच्या बुडावर आणखी जोरदार लाथा पडाव्यात अशी फार इच्छा आहे आमची. A.T.S. ची शैली आम्हि ठरवत नाहि म्हणुनच असले टुकार प्रश्न पडत नाहित. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

हे असले टुकार लेख आणि प्रतिक्रीया द्यायला पब्लीकला भरपूर सवड मिळतेय हो का,

अर्थात, लोकांच्या बुडावर आणखी जोरदार लाथा पडाव्यात अशी फार इच्छा आहे आमची.

का? लोकांनी काय केलय तुमच? आणी नाही आवडत तर सोडुन द्याना,कशाला उगीच टाईमपास करताय......

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ए.टी.एस. सारख्या संस्थांचे जे मुल्यमापन मुळ लेखात आहे त्यामागे खरच अभ्यास किती आणि निव्वळ बोलबचन किती हे जाणण्याचा प्रयत्न केला आम्हि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

फुकटच काहि बाही बोलायचं/टंकायच?? A.T.S. सिस्टीम किती क्लिष्ट आहे आणि ति कशी ऑपरेट होते याचं किती ज्ञान आहे तुम्हाला? हे तुमचेच म्हणने आहे ना. तुम्हाला जितक माहीत आहे तितके तुम्ही आम्हाला सांगाव हीच आमुची ईच्छा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ते आमचच म्हणणं आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्या, सनी देओलचे चित्रपट वगैरे संदर्भातुन ए.टी.एस. केलेले आरोप आम्हाला "काहि बाही", "फुकटेचे टंकणे" या कॅटॅगिरीचे वाटतात. कसाबवर केलेला खर्च हा एटीएस च्या हिशोबी पडत नाहि हे आम्हाला निश्चित ठाऊक आहे. दंगली, हिंसक आंदोलने वगैरे घटना हाताळताना पोलिसांचे जमावाच्या कमरेखाली गोळ्या झाडण्याचे नियम एटीएस ला कसे आणि कुठल्या संदर्भात लागु होतात हा हि प्रश्न आहेच (हे नियम फार पुर्वीपासुन आहेत व एटीएस बरीच अलिकडची) तेंव्हा लेखकाने व त्यांच्या दाव्यांना समर्थन देणार्‍यांनी अस्सल संदर्भ देऊन आरोप मांडावे अशी अपेक्षा आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

ए.टी.एस. लेखकांच असो की त्याचं समर्थन करणारे त्याचं म्हणन अस की ए.टी.एस.वाल्यानां त्यांचे बॉस म्हणा कींवा सत्ताधारी,कींवा मुळातच अल्पसंख्याक धार्जीने काही अधिकारी ह्यांच्या मुळेच पोलीस खात बदनाम होतय. राष्ट्रीय तपास संस्था,सी बी आय गेला बाजार सी आय डी ह्यान्ना पाहीजे तेव्हां पाहीजे तस वाकवुन वाटल्यास मोडुन तपास लीहीला जातो..किंवा करु दिला जात नाही आता इथे तर तिघही संस्था सरकारीच आहेत ना.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हि फार जनरल स्टेटमेण्ट्स झाली. शिवाय या स्टेट्मेण्ट्सचा लेखनातल्या मुळ दाव्यांशी काहिही संबंध नाहि. इतर गोष्टी असु द्या, केवळ दोन दावे साधार स्पष्ट करावे: १) ए.टी.एस.चं बजेटींग, ते कसं-किती खर्च करावा याचं फॉर्मल नियोजन, व कसाबला पोसण्यात त्या बजेट मधुन अनावश्यक रित्या खर्च केलेले पैसे २) कुठल्या केस मध्ये ए.टी.एस ने अपराध्याला गोळ्या घालुन ठार मारण्याऐवजी जीवंत पकडले व तसे करणे देशाला महागात पडले. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

२)कसाब ला पकडल्याने त्याला पोसण्याचा खर्च्, महागात तर नाही,पण महाग तर आहे,त्याच्यावर केलेला खर्च हा कोणी करावा ह्यात त्यांच्यातच तंटे आहेत,कसाबचा खर्चबघा बर ठीक आहे,मला हे सांगा. कसाबला पकडुन देशाचा कोणता मोठा फायदा झाला? त्याच्यावर खर्च झालेल्या पैशांच काय? आता तो फाशीच्या स्टेप पर्यंत आला,मग कोर्टात त्याच्यावर केस चालली त्यापासुन भारताला काय फायदा झाला. पाकीस्तानने भारताने दिलेल्या माहीतीवर काय कार्यवाही केली. सरकार पेक्षा रतन टाटाबरे सरकारचे असे धनादेश सुद्धा वटत नाही.सरकार फक्त राजकारण करनार अफजल गुरु सारखे ह्यालाही पोसणार

In reply to by श्री गावसेना प्रमुख

एखाद्या विशिष्ट केसमध्ये कुठल्या सरकारी बॉडीने किती ख्रच करावा याबाबत तंटे होणे, कन्फ्युजन होणे अस्वाभावीक नाहि. , सामान्य बाब आहे ति. कसाबला जिवंत पकडण्यात देशाचा फायदा म्हणाल, तर एका पोलीसाने आपला जीव देऊन कसाबला जीवंत पकडले यातच सर्व आले. त्याने काहि मानवतावादी वगैरे दृष्टीकोनातुन कसाबला जीवंत पकडले नाहि... तर इतक्या मोठ्या कारस्थानातला सहभागी जीवंत हाती लागणे हे इन्व्हेस्टीगेशन एजन्सीज, कायदा-न्याय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय मंच ए. ठेकाणी आवश्यक असते हे त्या पोलीसाला ठाऊक होते. इतक्या सर्व संस्थांना जर जीवंत कसाबचा फायदा झाला तर तो देशाचा फायदा नाहि काय? >>त्याच्यावर खर्च झालेल्या पैशांच काय? -- खर्चाचं काय म्हणजे? हा सर्व खर्च कसाबला केवळ जेवण वगैरे सुवीधा पुरविण्यात झालेला नाहि हे निश्चित. त्यातला मेजर खर्च कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेवर झाला आहे. ति गरज आहे. >>आता तो फाशीच्या स्टेप पर्यंत आला,मग कोर्टात त्याच्यावर केस चालली त्यापासुन भारताला काय फायदा झाला -- पुणे शहाराचे वाहतुक नियमन, मुंबईची स्वच्छता, मिपा वर हुच्च लेखांचा राबता... यासारखे फायदे अपेक्षीत आहे काय ? लोकांना एका संविधाना अंतर्गत आणणे, सैन्य दल-संसद-न्याय व्यवस्था-व्यापार उद्योग.. अशा अगणीत संस्था सिन्क्रोनसली राबवणे, रक्तपाताशिवाय सत्तांतर होणे... १२० करोड लोकांकरता हे सगळं एस्टॅब्लीश आणि फंक्शनल होणे हा किती मोठा फायदा आहे याचा विचार करा. हा फायदा उचलण्याची किंमत म्हणजे कसाबच्या केसवर होणारा खर्च धरा. >>सरकार पेक्षा रतन टाटाबरे सरकारचे असे धनादेश सुद्धा वटत नाही.सरकार फक्त राजकारण करनार अफजल गुरु सारखे ह्यालाही पोसणार -- म्हणजे उद्योअगपतींचे सर्व आर्थीक व्यवहार चोख, न्यायी असतात असं म्हणायचं आहे का? रतन टाटा धंदेवाईक माणुस आहे, सरकार नाहि. आणि सरकारने राजकारण नाहि करायचं तर कोणि करायचं? राहिला अफजल गुरु सारखे कसाबला पोसणे... तर कसाबची केस अफजल गुरुपेक्षा अगदी भिन्न आहे. त्यांची अशी तुलना करणेच चुकीचे आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तर कसाबची केस अफजल गुरुपेक्षा अगदी भिन्न आहे. त्यांची अशी तुलना करणेच चुकीचे आहे.

दोघांनी देशावरच हल्ला केला होताना. हल्ल्यातही राजकारण करण्याला तुमच समर्थन आहे काय? इतक्या सर्व संस्थांना जर जीवंत कसाबचा फायदा झाला तर तो देशाचा फायदा नाहि काय? होय मान्य ,पण तरीही अफजल गुरु आनी अजमल कसाब ह्यान्ना सरकार पोसतच आहे ना,ह्यात राजकारण करायला नको.ह्यांना जिवंत ठेवण्यात काय हाशील. सगळ्या जगाला माहीत आहे की हे सर्व पाकीस्तान्च करतोय हे सर्व्,अगदी परवा अमेरीकेवाले बोलले की आम्ही लादेन हल्ल्याची माहीती पाकीस्तानला दिली असती तर लादेन पळुन गेला असता. सोडाहो हे पुरावे ह्यांच्यानी काही होत नाही.शिंदे सुद्धा बोलले की हे सर्व पाकीस्तान करतोय. राहीले टाटा मग हे कॉग्रेस चे जिंदाल का करीत नाही?का त्यांचा हीशेब चोख आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

>>हल्ल्यातही राजकारण करण्याला तुमच समर्थन आहे काय? -- हल्ल्यातही राजकारण करण्याला समर्थन नाहि, पण राजकारण फार स्वच्छ असावं अशी अपेक्षा देखील नाहि. मुळ मुद्दा "ए.टी.एस." सारख्या संस्था काय कामाच्या हा आहे, व या संस्था कार्यरत आहेत म्हणुन आपण जीवंत आहोत अशी माझी ठाम धारणा आहे. या सगळ्यांवर राजकारण प्रभाव करतं, पण म्हणुन त्या संस्था निकामी ठरवणं हा आत्मघात आहे. शिवाय कसाबच्या केस मध्ये मला तरी राजकारण दिसत नाहि. अफजलगुरुच्या केसमध्ये काश्मिरचं राजकारण आहे, मुस्लीम राजकारण नाहि (किंवा गौण आहे). अफजलला फाशी दिल्यास प्रतिक्रिया काश्मिरमध्ये उमटेल, इतर मुस्लीम समुदाय काहि रिअ‍ॅक्ट करणार नाहि. >>सोडाहो हे पुरावे ह्यांच्यानी काही होत नाही. -- यातनं बरच काहि होतं. पण जनतेला दृष्टीगोचर होण्यालायक फार काहि होत नाहि... आणि असं दृष्टीगोचर होणं अजीबात महत्वाचं नाहि. >>शिंदे सुद्धा बोलले की हे सर्व पाकीस्तान करतोय. -- चालयचच. नवीन खुर्चीचा फीलगुड इफेक्ट म्हणाहवं तर. >>राहीले टाटा मग हे कॉग्रेस चे जिंदाल का करीत नाही?का त्यांचा हीशेब चोख आहे. -- टाटा, जींदाल, वा इतर बिझनेस फॅमीलीज आणि त्यांचे आर्थीक व्यवहार, राजकारण्यांशी संबंध... यातनं काळं गोरं निवडणं खरच शक्य आहे का? आय डोण्ट थींक सो. अर्धवटराव

सरकार काय करतंय हे सर्व सुज्ञ, सुजाण बघतायत, पेपरात वाचतायत. 'जेनु काम तेनु थाय' म्हणतात ते खरंच आहे, त्यामुळे सरकारची जबाबदारी बनते कि असे पोशिंदे किती दिवस बाळगायचे "त्या तुमच्या आकाशातून माहिती मिळवण्यासाठी", कुठे आहेत त्यांचे साथीदार वगैरे ? अहो माहिती मिळवण्यासाठी कुणा एका व्यक्तीवर किती अवलंबू राहायचं हो ? आणि किती कोट्यावधी खर्च करायचे याचा हिशेब तुम्ही ठेवणार आहात का अर्धवटराव ? पैसा आपलाच जातोय, आणि जीवही ? का नाहि दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश देत हे ? अहो आपलं पोलीस खात, जगात एकेकाळी दुस-या क्रमांकाचे गणले जायचे ? तेव्हा ते काही अशा कसाब सारख्यांवर अवलंबून नाही राहायचे माहीतीसाठी ? कीव येते त्यामुळे सरकारची ? त्यामुळे दुस-यांची कीव करणं सोडून द्या राव आणि खिलाडू वृत्तीने सत्य स्वीकारा.

In reply to by केदारविदिवेकर

कुणाला किती दिवस पाळलं आणि त्यातुन किती माहिती मिळाली याचं यथासांग वर्णन वर्तमानपत्रातुन वाचायला मिळतात अशी बाळबोध अपेक्षा आहे कि काय तुमची? कुणावर किती दिवस अवलंबुन राहायचं हे त्या यंत्रणेला ठरवु देत ना. आणि त्यावर किती खर्च करायचा याचा ताळेबंद बांधुन तुम्ही त्या सिस्टीमला इनेफीशियण्ट ठरवताय असा दावा करताय कि काय? कसबसारख्यांवर किती अवलंबुन राहायचं हे ठरवायला त्या त्या संस्था आहेत. पब्लीकने करण्यालायक अनेक कामं आहेत. ते केले तरी पुरे. अर्धवटराव

माझा ब्लॉग आहे स्वतःचा "http://janpravas.blogspot.in" तिथनं मिपा साठी खास उचललं -- के डी

In reply to by केदारविदिवेकर

नका कष्ट घेऊ मिपासाठी, आम्ही येऊ हं तुमच्या ब्लॉगवर!

In reply to by तिमा

?


In reply to by केदारविदिवेकर

तिथनं मिपा साठी खास उचललं
अहो तुमचाच ब्लॉग आहे ना मग ही उचलेगीरी कशासाठी? - (उचलेगिरी न करणारा) सोकाजी

In reply to by मृत्युन्जय

@ते स्माइलीवाले पराग दिवेकर तुमचे कोण?>>> उद्या तुमचंही कोणी अडनाव बंधू आलं कि मलाही हाच प्रश्न
ते सांस्कृतिक ***** तुमचे कोण ?
असा विचारवा लागेल...! ;-) :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्मायलीवाले पराग दिवेकर आहेत का? वा वा. ते सोलापूरातले प्रसिध्द बेकरीवाले दिवेकर आहेत ते तुमचे कोण हो? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते काये. ते तुमचे कोणी असतील तर त्यांना आपले म्हणावे लागेल म्हणुन आधीच विचारुन घेतो आहे. ;) बाकी ते मृत्यूंजय कर्ण आमचे कोणी नाहित बर का? ;)

खरे आहे. पैसा आहे, २ वेळा पोटाला मिळते आहे तर कशाला असले फालतू प्रश्न? जाऊदे १०० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात याहून काही चांगले व्हावे अशी मुळात अपेक्षाच नाही. :) काहीतरी होऊन एकदम १०० ची ५० कोटी लोकसंख्या व्हावी मग काहीतरी सुधारणा होईल. :)

मुंबई पुण्यात फटाके फुटावेत तसे बॉम्बस्फोट होत असतात .त्यात जे होरपळले आहेत त्यांचे दुखः केवळ त्यांनाच ठाऊक. मुळात १०० चे ५० करण्यापेक्षा ५० असतानाच विचाराने वागले असते सगळे, तर आज ही वेळच आली नसती....... गायब होणाऱ्या ५० मध्ये आपण नसलो म्हणजे मिळवले......

In reply to by माम्लेदारचा पन्खा

गायब होणाऱ्या ५० मध्ये आपण नसलो म्हणजे मिळवले...... हरकत नाही. आम्ही गेलो तरी बाकीचे सुखाने जगतील.