Skip to main content

तरंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 18/02/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी .............................अज्ञात
काव्यरस

एक कप चहा ...!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 18/02/2013 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
निखळ आनंद देणारं स्वच्छ पाणी , गालांवर हसू आणणारा साखरेचा गोडवा , आल्हाददायक रंगांची उधळण करणारी गंधित चहा पूड , आणि या सगळ्यांना सामावणारे पांढरेशुभ्र दूध ...... ..........असंच बनतं सगळं .... ......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक कप चहा !! पावसात भिजताना झालेली नजरानजर . उसाचा ट्रक मधे आल्यावर झालेली हुरहूर , इंद्रधनुष्य सामावलेले तुझे डोळे , आणि पांढऱ्याशुभ्र ढगात हरवलेले आकाश ..... अशी झाली ती पहिली भेट ..... ...भिजलेली टपरी आणि तिथे ....

राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण

लेखक खटासि खट यांनी रविवार, 17/02/2013 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपिता या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो. मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे पती असे भाषांतर कुणी केले असावे ?

स्वतंत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 17/02/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी सजवित जावे वृत्तांचा ना हव्यास मज वाटे कविता झाली असतो रचनेचा भास मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
काव्यरस

समुद्रावरील पहिला दिवस-पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/02/2013 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा करा- . आज मुलुंड येथील स्वर झंकार चा तिसरा दिवस होता त्यात श्री जय तीर्थ मावुंडी यांचे अप्रतिम गायन आणि पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन वीणा वादन होते म्हणून पहिला भाग घाईघाईत लिहून अर्धवट सोडल्याबद्दल. असो अवोमिनची गोळी तोंडात धरली होती थोडा वेळ आडवा पडून होतो. थोड्या वेळाने पोटात ढवळणे थांबले परंतु डोके गरगरतच होते. पण थोडेसे धैर्य दाखवून मी उठलो आणि परत जिना चढून ब्रिज वर गेलो. वरून दिसणारे दृश्य भयंकर होते. जहाज पूर्ण तिन्ही मितीत ४५ अंशात डोलत होते समुद्र खवळलेलाच होता. पाणी लाटा आणि फेसामुळे पांढरे दिसत होते. तेवढ्यात तेथील रडार वर काहीतरी दिसले असे त्याचा ऑपरेटर सांगत होता.

तंत्र विद्येची ओळख

लेखक रमेश भिडे यांनी रविवार, 17/02/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला .

श्री. ना. आणि व्ही. एस.

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 17/02/2013 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कोण" हा प्रश्न मानवाला अनादि कालापासून पडला आहे. प्रत्येक मानव जाणते-अजाणतेपणे या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे. कधी आपल्या कक्षेत राहून, तर कधी कक्षा भेदून. वैयक्तिक आवडी निवडी, निवडलेले पर्याय, घेतलेले निर्णय हे प्रत्येकाच्या "मी" च्या शोधाचं दृश्य रूप. मानवसमूहात रहायचं तर प्रवाहाबरोबर पोहोणं आलंच. सर्वदा आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. मानवसमूहाचा हा अदृश्य दबाव माणसाला वेगळं वागायला भाग पाडतो. कधीकधी काही पर्याय मनाविरुध्द निवडावे लागतात, काही निर्णय बळजबरीने घ्यावे लागतात. अशा वेळी तो "मी" चा शोध बंड करून उठतो.

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

लेखक विक्रांत यांनी रविवार, 17/02/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी.

माझी ऑफीसची डायरी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 17/02/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
५ जुन २०१० शनिवार १६:३० माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्‍यापैकी वर्दळ असणारार्‍या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे ) माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती . अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्यासारखे वाटले...