Skip to main content

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 19/02/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 19/02/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले र

एक कप चहा - भाग २ !!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 19/02/2013 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहा - भाग २ !! धरेला मोहरून टाकणारं पावसाचं पाणी , चिंब भिजलेल्या मातीचा तो गोड सुगंध , आकाशाला इंद्रधनूची माळ घालून डोकावणारा भास्कर , मग कापूस पिंजून ठेवल्यासारखे शुभ्र ढग ... असंच बनतं विश्व ..... बहरलेला ऋतू आणि आलं घातलेला ....एक कप चहा !! अनमोल रत्नांना सामावलेला अथांग समुद्र , फक्त मनात साठवता येतील अशी पक्षांची गोड गाणी , कृत्रिम जगालाही मागे टाकणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य , दिव्यांचा झगमगाट असून सुद्धा भुरळ घालणारा मंद चंद्र प्रकाश ..... असंच असतं सुख .... क्षण क्षण निसटलेला आणि तृप्त करणारा ...एक कप चहा !! सुख आणि दु:ख डोळ्यात पाणी आणतात खरे , राव असो

आठवणीतले ग्रीस - भाग ४

लेखक nishant यांनी मंगळवार, 19/02/2013 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ दिवस तिसरा: kldf * एथेन्स ते पिराउस सकाळी लवकरच जाग आली. रोजच्या प्रमाणे हॉस्टेल मध्येच नाश्ता करुन बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या मेट्रो स्थानकावर पिराउस कडे जाणारी मेट्रो पकडली.

बाजरीचे ढेबरे

लेखक neeta यांनी सोमवार, 18/02/2013 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक गुजराथी रेसीपी आहे. मी माझ्या बहीणीकडे खाल्ली आणि आवड्ली म्हणून करुन बघितली. सर्वाना आवड्ली म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्ही पण जरूर करुन पहा. साहित्य : बाजरीचे पीठ (ताजे दळून आणावे), दोन चमचे दही, आल लसूण मिरची पेस्ट, थोडी साखर, मीठ, ओवा चिमूट्भर, तीळ, कसुरी मेथी किंवा ताजी चिरलेली मेथी थोडीशी अथवा किसलेला दुधी, थोडे गव्हाचे पीठ, हळद, मिरची पावडर, दोन चमचे तेल. सर्व साहित्य एकत्र करुन कणके प्रमाणे भिजवावे. प्लास्टिकच्या पिशवीवर गोळा ठेवून लाटावे. तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे. गरम खायला द्यावेत दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर छान लागतात.

१० वी 'क' - भाग ५

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 18/02/2013 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
१० वी 'क' - भाग १ १० वी 'क' - भाग २ १० वी 'क' - भाग ३ १० वी 'क' - भाग ४ "साल्या भिकारचोटा, कुठे उलथला होतास रे इतके दिवस?" बापलेकरला बघताक्षणीच शिव्या घालत त्याच्या पोटात मी दोन तीन गुद्दे ठेवून दिले. गुद्द्यांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही उलटं दात काढून हसायला लागला. त्याला पाहताच आम्हा दोघानांही खुप आनंद झाला होता.

मिसळ आणि पाव

लेखक बज्जु यांनी सोमवार, 18/02/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे. ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)

राष्ट्रकाकु

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी सोमवार, 18/02/2013 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नावाच नगर होत्,तिथे पामि नावाच एक मोठ्ठ घरकुल होत्, वयाने मोठी असलेली मंडळी सगळ्यांना कस जिवापाड जपायची,त्यांनी त्यांच काम हलक करण्यासाठी,कामाच आउटसोर्सिंग केल होत ते पण घरातलेच होते आता घर म्हटल्यावर भिन्न स्वभावाचीही माणस होती त्यात्,काही उग्र स्वभावाची,काही लंपट्,काही विनोदी,काही स्थिर गंभीर्,काही हातावर हात धरुन बसायची काहीनी पदर बघीतला की मागे मागे करायची काहीतरी खायला मिळेल म्हणुन्,काही तरुण होती जे की कायम गुलाबी स्वप्न बघायची,माझ्याशी मैत्री करणार का म्हणुन काटेरी गुलाब घेउन मागे हिंडायची,समोरची गुलाबी पार्टी काटे टोचतील म्हणुन दुर

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके १३० वी पुण्यतिथी

लेखक II श्रीमंत पेशवे II यांनी सोमवार, 18/02/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीविरांचा मुकुटमणी असे आद्य क्रांतिकारक फडके कुलोत्पन्न वासुदेव बळवंत फडके यांची १३० वी पुण्यतिथी १७ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचे हृद्य स्मरण. १८५७ सालच्या अयशस्वी क्रांतीपर्वानंतर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वप्राणांच्या आहुत्या दिल्या, त्या थोर वीरांमध्ये वासुदेव बळ्वंत फडके यांचे नाव अग्रेसर आहे. या साठीच त्यांना “ आद्य क्रांतिवीर” असे संबोधले जाते. पनवेल जवळील “अभयारण्य “ म्हणून प्रसिध्द असलेले “कर्नाळा” या ऐतिहासिक किल्याच्या पायथ्याशी आहे. वासुदेव बळ्वंत फडके यांचे आजोबा श्री अनंतराव फडके हे या किल्याचे किल्लेदार होते.