पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली
पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली
रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी
दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली
शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी
लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी
योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी
आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी
.............................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1242
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख लय आणि सुंदर शब्द.
सुरेख लय आणि सुंदर शब्द.
छान आहे कविता !
नकळत नकळत मन लय पकडत या
नकळत नकळत मन लय पकडत या शब्दांची.
मस्त!!
छान आहे कविता !
(No subject)
:-)
भन्नाट
__/\__