Skip to main content

परका काळा घोडा

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 20/02/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं. दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 20/02/2013 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

याला वेळ हवी हो रातीची ...

लेखक आर्णव यांनी बुधवार, 20/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेत खमंग राया आपुला देऊ फोडणी आमच्या प्रीतीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ह्यो नजरेचा मदन बान छेडी गुलाबी बेधुंद तान ही गोडी गुलाबी यो मस्का का न लागावा ओ यांचा चस्का कशी सांगू मी बाई कुणाला कथा तुमच्या या करामातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ऊब मिठीची उतरे मनात कशी रसरसली माझी काया त्या चंद्राला जाउन सांगा जरा दमान पुढ सारकाया चाहु दिशांनी गार हवेनी दिली सलामी तुमच्या ख्यातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I

वाचन कमी होत चालल आहे.

लेखक neeta यांनी बुधवार, 20/02/2013 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल सगळ्यांचेच लहान आणि मोठ्या माणसांचे वाचन कमी होत चालले आहे. मुले इंटरनेट मुळे आणि मोठी माणसे टी व्ही सिरयल मुळे वाचत नाहीत. याचा अनुभव मी सोसायटीत वाचनालय चालू केले तेव्हा मला आला. लोक सरळ सांगतात की आम्हाला वाचायला वेळ नाही म्हणून. आपल्याला काय वाटते. यासाठी काय करता येईल?

पनिर - पिस्ता हरयाली

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 20/02/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
Pista 1 साहित्यः १. तेल - २ पळ्या २. आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा ३. पनिर क्युब्स / ताज पनिर ४. फ्रेश किम / मलई - २ चमचे ५. कसुरी मेथी - १ चमचा (हातानी पुड्/क्रश करुन गाळुन घेणे म्हणजे खाताना कचकच लागणार नाहि) ६. व्हईट पेस्ट - १/२ वाटि - १ मध्यम कांदा, ५ काजु, २ चमचे मगज बी कुकर मधे एक शीटि देउन उकडणे. गार झाल्यावर मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे ७. पिस्ता पेस्ट - १/२ वाटि - २०-२५ सोललेले पिस्ते पाण्यात टाकुन एक १० मि. उकळणे व लगेच गार पाण्यात टाकणे.

कालचा दिवस....

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 20/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही. बर्‍याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अ‍ॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल.

समवेदना

लेखक अनघा आपटे यांनी बुधवार, 20/02/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
"समवेदना" ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी. त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते.

...........!!!!!!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 20/02/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे होते डोळे , त्यात सामावणारं विश्वही तसंच , छोट्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता मोठ्यांच्या समजू लागल्या , पण .....मोठं होण्याच्या हट्टात 'बालपण ' जगायचं राहून गेलं ....!!! पुस्तकं वाचत राहिले वह्या भरत राहिले , परीक्षेच्या दिवसात देवाला स्मरत राहिले , पण ….शाळेला जायच्या नादात ... 'सहलीला ' जायचंच राहून गेलं .....!! लाथ मारील तिथं पाणी काढील अशी जिद्द तेव्हा होती , कॉलेजचा कट्टा ,हिरोइनच्या गप्पा , आमची ख्याती कमी नव्हती , पण ...अबोली माळून मोगर्यांच्या गर्दीत ... 'गुलाबाशी ' बोलायचंच राहून गेलं ...!!! बायको साजेशी ,सूनही आदर्श , हुशार आई लेकरांची होती , मोजून मापून आखलेल्या चौ

धूळ - एक आठवण !!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 20/02/2013 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
धूळ - एक आठवण !!! खोली नवी करण्याचा अट्टाहास धरलाय , किती दिवस झाले खटाटोप चाललाय , जुन्या गोष्टींची जागा नव्यांनी घ्यायला हवी .... सगळ्या कोपऱ्यातली धूळ आता झटकायला हवी ...!!! वेगळे रंग घेऊन नवे पडदे सजले , नवा उजळपणा घेऊन कार्पेटहि आले , स्टाईल पण बदलली आहे खोलीची साजेशी .... तरी....

गुजराथी डाळ

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 20/02/2013 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवून ठेवणे १ टोमॅटो बारीक चिरलेला २ टेस्पून अख्खे शेंगदाणे २ टेस्पून गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त) ५-६ कोकम पाकळ्या १ टीस्पून बारीक चिरलेले आले १/२ टीस्पून हळद १-१/२ लाल तिखट १-१/२ टीस्पून धणे-जीरेपूड १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून मेथीदाणे १/२ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हींग १ दालचिनीची काडी तुकडे करुन ३-४ लवंगा कढीपत्ता १ लाल सुकी मिरची मीठ चवीप्रमाणे चिरलेली कोथींबीर