Skip to main content

एक कप चहा ...!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 18/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
निखळ आनंद देणारं स्वच्छ पाणी , गालांवर हसू आणणारा साखरेचा गोडवा , आल्हाददायक रंगांची उधळण करणारी गंधित चहा पूड , आणि या सगळ्यांना सामावणारे पांढरेशुभ्र दूध ...... ..........असंच बनतं सगळं .... ......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक कप चहा !! पावसात भिजताना झालेली नजरानजर . उसाचा ट्रक मधे आल्यावर झालेली हुरहूर , इंद्रधनुष्य सामावलेले तुझे डोळे , आणि पांढऱ्याशुभ्र ढगात हरवलेले आकाश ..... अशी झाली ती पहिली भेट ..... ...भिजलेली टपरी आणि तिथे .... एक कप चहा ...!! सागर किनाऱ्यावर वाट पाहतानाचा तू , हसून हसून दमल्यावर पिलेले गोड शहाळे , गुलाबाच्या फुलाने वाढलेली रंगत , आणि तुझ्या अंगणातला पारिजातकाचा सडा .... असंच घडलं सगळं ...... थरथरणारी बशी आणि तरीही .....एक कप चहा ...!! मनाचा वेध घेणारे तुझे पाणीदार डोळे , जीवनातला गोडवा वाढवणारं तुझं प्रेम , लाखों रंगांची उधळण करणारं तुझं एक हास्य , तुला लपवता न आलेला मोगऱ्याचा गजरा .... असंच जमलं आपलं ..... नि:शब्द झालेलो आपण आणि घरच्यांनी प्यायलेला ....... एक कप चहा ...!!!!
लेखनविषय:

वाचने 2514
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हम्म, छानच झालीये.