सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २
हि १९९१-९२ ची गोष्ट आहे. मी पुण्यात एम डी करीत होतो. माझे लग्न झालेले नव्हते. सरकारी नोकरी होती. खिशात पैसे होते आणि घरची जबाबदारी हि नव्हती आई वडील आणि थोरला भाऊ नोकरी करीत होते. पुण्यात सायंकाळी वैशाली किंवा रुपाली मध्ये पुणेकर भाषेत पडीक असायचो.बरोबर अभियांत्रिकीतील मित्र जे असेच नोकरी संपल्यावर हिरवळ पाहण्यासाठी हजर असत.
एकदा एक मित्र म्हणाला कि अरे मी ज्या पंपावर पेट्रोल भरतो तिथे काम करणारा एक मुलगा जर बरा नाहीये बघतोस काय?
मग तो आणि मी कर्वे रोड वर माडीवाले कॉलनीच्या जवळपास कोणतातरी पेट्रोल पंप होता तेथे गेलो. तिथे एक राजू नावाचा किडकिडीत मुलगा (२५-२६ वयाचा) त्याने दाखवला.
मिसळपाव