Skip to main content

ऊन-सावली नाते अपुले

लेखक जयवी यांनी गुरुवार, 08/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
. पानावरच्या दवबिंदूपरी सजते, निसटुनिया विरते ऊन - सावली नाते अपुले कधी हसते अन्‌ कधी रुसते कधी हिरवाईच्या मखमाली भिरभिरते अन्‌ बागडते कधी काहिली, कधी होरपळ कधी पेटुनी धगधगते कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी चमचमते अन्‌ लखलखते कधी गर्द अवसेच्या राती काळोखातुन पाझरते लडीवाळ कधी मोरपिसापरी हळुच कानी कुजबुजते कधी अनावर प्रपातापरी दुमदुमते अन्‌ कोसळते कधी मौनाच्या बंद क्षणांनी हिरमुसते अन्‌ मुसमुसते कधी शब्दांच्या पागोळ्यातुन गहिवरते अन्‌ रिमझिमते विरहाच्या एकांती नाते उष्ण आसवांनी भिजते गंध मोगर्‍या मीलन राती फुलून गात्री दरवळते नात्याची ही वेल आपुली बावरते, कधी सावरते स्पर्शलाजर्‍या हिंदोळ्यावर झुलते आणिक सुखावते. जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3077
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हाय जयश्रि कविता छानच आहे. मीपा वरचा पहिला वहिला प्रतिसाद...छान वाटतय आपल्या भाषेत लिहायला.

मस्त. :-)

निकनेम माहिती नसल्यानं पोस्ट उघडणार नव्हतो पण इतके लगोलग प्रतिसाद म्हटल्यावर काय आहे ते बघू, तर.. वॉट अ लव्हली सप्राइज! धन्यवाद

खूप खूप छान

खूप आवडली. खूप छान फ्लो आहे.

कविता वाचताना "मायेच्या हळव्या" हे गाणं आठवलं.