Skip to main content

उकडगरे

लेखक पैसा यांनी बुधवार, 17/04/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझी आई माझ्याकडे आली आहे. ती आली की मी नेहमी पारंपरिक पाककृत्या तिला विचारून करत असते. त्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींना बघाव्या लागतात आणि इच्छा असो नसो, चान चान म्हणावे लागते. एका कन्नड लोकांच्या ग्रुपमधे मराठी पाकृ अजिबात माहित नसल्याने त्या खूपच आवडतात असे तिथले लोक म्हणतात. ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे. मा. स्पाजींबरोबर "कलेसाठी कला की जीवनासाठी कला" या विषयावर आमचा नेहमी फेसबुकीय वाद सुरू असतो. त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे. या वादाचा निकाल आजपर्यंत लागला नाही.

बैंगन टप्पा विथ पिक्स.

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी सोमवार, 15/04/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस: १) कोव़ळी गावठी काटेरी वांगी, २) तीन गाजरे ४) अर्धी वाटी हिरव्या मटाराचे दाणे. ५) पाऊण वाटी किसलेले किंवा डेसीकेटेड सुके खोबरे ६)पाउण वाटी शेंगदाणा कुट ७) १ लिंबाचा रस. ८) मिसळ मसाला २ चमचे ९) गरम मसाला १ चमचा.

हुंकार

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 15/04/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द शब्द, हुंकार मनाचे ओले किनारे, खार्‍या पाण्याचे काळजाचा साचा, उघडून वाचा श्वास बाळाचे, ध्यास मायेचे वळणांचा घाट, वारा मोकाट सारे सारे कांही, होते आट पाट आलेली पहाट, पावलांची वाट आईची सय करते, साय घनदाट ...........................अज्ञात
काव्यरस

इवलेसे बीज

लेखक शुचि यांनी सोमवार, 15/04/2013 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा "ईंटरॅक्टीव्ह" रुपाचा असून, अतिखाजगी गोष्टींत संदिग्धता राखून प्रतिक्रिया देता आल्यास उत्तमच. आपल्यापैकी प्रत्येकाने आवडो न आवडो, आयुष्यात चढ-उतार अनुभवले आहेत. पैकी "लाईफ डिफायनिंग" असे कोणते क्षण आपल्याला सांगता येतील? म्हणजे काही निर्णय आपण घेतो ज्यांचा परीणाम तेव्हा जाणवत नाही पण कालांतराने खूप प्रभाव जाणवतो.

पुरुष विभाग : सल्ला कम माहिती हवी आहे

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 15/04/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी एक थोडी माहिती हवी होती. महाराष्ट्रातील अप्रसिद्ध पण पहाण्यालायक ठिकाणे जिथे पुण्याहून निघून आठ दिवसांच्या प्रवासात पाहून होतील अशी यादी हवी होती. आमचे काही मित्र (संख्या ६-७ सर्व पुरुष) गाडी करुन पुण्याहून निघून रमत गमत पहात मजा करत परत पुण्याला यायचे असा विचार करत आहेत. बरीचशी ठिकाणी तीर्थस्थाने, मंदीरे, वगैरे पाहून झाली आहेत. एखादे गाव आगळे वेगळे असेल तरी चालेल. पुण्याहून कसे जायचे, कोणत्या मार्गाने जायचे, निवार्‍याची ठिकाणे इत्यादी सांगितल तर बरे होईल. आपला मित्र नाना

We are not here to make friends ... खरंच ?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 15/04/2013 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही.... तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही.... पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत. सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो.

निरामय शांतता

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 15/04/2013 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोळा उघडला तेंव्हा त्या दगडी भिंतींच्या खोलीत मिट्ट काळोख होता. बरोबरचे तीन मित्र, आणि ट्रेकिंगला आलेले इतर ग्रूप्स ढाराढूर होते. उंच बॅगवर डोकं ठेवून माझी मान आखडलेली वाटत होती. मोबाईलमधे वेळ बघितली; पहाटेचे ४ वाजले होते. जास्त आवाज न करता मी उठलो, आणि बॅटरीचा सावध प्रकाश टाकत व्हरांड्यात आलो. व्हरांड्याच्या एका टोकाला गडावर स्थायिक असलेला कुत्रा दोन भिंतींच्या कोनाचा आडोसा करून झोपलेला. दुस-या टोकाला काही दगड, काही भांडी, काही लाकडं होती. समोरच आदल्या रात्रीच्या शेकोट्यांची राख धग धरून होती. इतक्यात वर लक्ष गेलं. काळं कुट्ट आकाश, आणि त्यात अब्जावधी ता-यांचं मंडळ.

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 15/04/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शिष्य़ः प्रणाम गुरुजी गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत. गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात. शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात? गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू ..... शिष्य़ः गुरूजी. गुरूः आठवलं, ऐक.

नाते देवाशी...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 15/04/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न परमेश्वर / देव ह्याच्याशी द्वैत भावात मानवी नाते संबंधातील अनेक (किंवा बहुतेक सर्व) नाती जोडली आहेत. पिता / माता / बंधू / सखा / पुत्र / कन्या /मालक / नोकर / राजा इत्यादी इत्यादी.. एवढेच काय पण पती सुद्धा परंतु कुणीही परमेश्वराला 'पत्नी' नात्यात मानलेले/उल्लेखिलेले नाही... काय कारण असू शकेल???

डा़ळ वडे

लेखक जागु यांनी सोमवार, 15/04/2013 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. :हाहा: माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे.