Skip to main content

क्रिस गेलाख्यान.

लेखक बॅटमॅन यांनी मंगळवार, 23/04/2013 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कळायचे बंदचि होत पूर्ण क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण केले तयें बॉलर हो विवर्ण ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण आहेत साचे जरि लोक फार आय्पीलची कीर्त पहा अपार त्यातेहि हातोडिमाणूस येक क्रिस गेल आख्यान सांगेन येक पुण्यासवे खेळले बंगळूर ब्याटिंग घेई, रन काढि फार मिसाइले वर्षती जैं अपार छक्के तसे मारितो फारफार मारोनिया सिक्सर सर्व ग्रौंडी केली तये फिल्डरें कानकोंडी मागेपुढे ऑफ व ऑन बौंड्री लोकांचिया गेलचि नाम तोंडी ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा पळे कधी जास्त न तो फुकाचा त्यासाठी हा सिक्सरू खेळ साचा जो ऐंशि वा शंभर मीटरांचा आरंभि इब्राहिमखान जैसा जो गारद्यां मारि पहा अपैसा तैं गेलने तीस चेंडूंत फक्त ह

We are here only to make friends..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 23/04/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ‘We are not here to make friends ..’ या नावाचा श्री छोटा डॉन यांचा धागा वाचनात आला. ऑफिसच्या ठिकाणी जमलेल्या गाढ मैत्रीचा, मित्र दुरावल्याचा सल सांगणारा. ऑफिसात मित्र असू नयेत या निष्कर्षावर उतरलेला.... ...खरं सांगायचं तर पटलं नाही ! मुळात माणूस (त्यातून मराठी माणूस) हा ‘माणूसवेडा’ माणूस . जिथं जाईल तिथं स्वाभाविकपणाने आपुलकीचे बंध निर्माण करणारा. काही वेळा बोलण्याबोलण्यातून दुरावाही निर्माण करणारा. सुमारे दहा तास जेव्हा आपण जेव्हा घराबाहेर राहतो, तेव्हा साहजिकच एक ‘घराबाहेरचं घर’ नकळत तयार करतो.

कॅमेरा /जुगार्/जुगाड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 23/04/2013 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले.. तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे.. पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे.. त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा.. नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा.

अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका

लेखक मोदक यांनी मंगळवार, 23/04/2013 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
. गुरूवारच्या टाईम्स मध्ये पानभर जाहीरात बघून उत्सुकता चाळवली गेली असताना ऑफीसमधल्या मित्रांनी रविवारी जाण्याचे नक्की केले. दहा / साडेदहा वाजता पोहोचण्याचे ठरले असल्याने फारशी गडबड न होता एक्स्प्रेस वे ने सर्वजण मार्गस्थ झालो. एक्स्प्रेस वे . खालापूर टोल नाक्यानंतर पालीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर हे पार्क वसलेले आहे. अचानक चि

मँगो वुईथ फ्रेश क्रिम अँड सॅफ्रन (मलई आणि केशरयुक्त आंबा)

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 23/04/2013 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
Mango-with-fresh-cream साहित्यः हापुस आंबे - ४ व्हिपिंग क्रिम - १ कप साखर - चवीपुरती केशर - चिमुटभर. वेलची पुड - चिमुटभर कृती : केशर दुधात किंवा पाण्यात मिसळून ठेवा. आंब्याचा रस काढा. आवडीनुसार साखर मिसळून, मिक्सरवर फिरवून मुलायम करून घ्या. व्हिपिंग क्रिम फेटून घ्या.

Train To DAHANU

लेखक नावात्_काय्_आहे यांनी सोमवार, 22/04/2013 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
चायना मध्ये १ म्हण आहे , तशी ती चायनीज मध्ये आहे पण मराठीतच सांगतो . १० किलोमीटर फिरा किंवा १००० पुस्तक वाचा . तसं हे जर खरं मानलं तर आम्हाला इंजिनिरिंगमध्ये केटी नसती लागली .कारण भटकण्यात आमची ४ वर्ष गेली . हे कॉलेज मध्ये फिरणं किंवा फिरवण ,यामुळे भले हि ५% १०% कमी का पडले असेना .. :-) अक्कल मात्र आली नि पाझाळली पण . असो, १२ फेब्रूवारी , मोठ्या भावाच्या सासुरवाडीहून फोन आला , भावाच्या साल्याचा ( शिवी नाही आहे ;-) साला म्हणजे बायकोचा भाऊ ) साखरपुडा होता . तसं आधुनिक युगातले कुटुंब त्याला engagement म्हणतात .पण मी त्याला entertainment म्हणूनच पाहतो .( no offense please ) .

शिलाहारांचा कोप्पेश्वर-भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 22/04/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले.

भारत म्हणजे काय?

लेखक दासबोध.कॊम यांनी सोमवार, 22/04/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
-पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला " ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत" आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे.

बरसाली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 22/04/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरसाली.. इटारसी नागपूर मार्गावरील एक लहानसं स्थानक. या स्थानकाला मुंबै-दिल्लीची ऐट नाही की तसा बडेजाव नाही. परंतु येथील विलक्षण निवांतपणा आणि अगदी नीरव शांतता मन मोहून टाकते.. सभोवताली अगदी भरपूर, नजर जाईस्तोवर हिरवागार झाडझरोरा.. झाडं अगदी फलाटावर आलेली. किंबहुना, झाडीतूनच थोडी साफसफाई करून स्थानक उभारलं आहे असं म्हणूया.. दिवसाकाठी एखाद-दुसरी पाशिंजर थांबेल तेवढीच काय ती जाग.. एरवी अगदी निसर्गरम्य नीरव शांतता.. barasaalii एफ वाय-एस वाय, किंवा फार तर टी वाय चं वय असावं..

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस