Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप

लेखक कोमल यांनी शुक्रवार, 26/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत.

गुंजे बनकर देश राग...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 26/04/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन अनेक गुणी माणसं... वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....आणि असे कितीतरी अनेक उत्तम कार्यक्रम....!

मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 26/04/2013 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत. याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात. त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो. मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो. इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे. आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात.

राशी चक्रम

लेखक राजा सोव्नी यांनी शुक्रवार, 26/04/2013 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला , वृश्चिक पाहुनी कन्या पळती , कर्क,मीन,कुंभात दडती , धनु पाहुनी मकर विचलित होतो, मिथुन जना आनंद
काव्यरस

2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 25/04/2013 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.

प्रवास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 25/04/2013 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास चालू आहे माझा शून्याकडून क्षितिजाकडे . . अथक, अविरत . . थांबता नाही येणार मला खूप थकलोय, पण थांबलो तर मन रागावेल आणि पाय तर चालायला नकार देतायत जाऊन जाऊन कुठे पोहोचणार? क्षितीज तर एक रेघ.. आणि शून्य? ते काय? सुरवात केलेल्या बिंदुला गोल फिरून पोहचणारी एक वळसे घेणारी रेघच ना? . . मग का चालावे? पण मन, ते का ऐकत नाही? मनालाच ठाऊक विचारले जरी सांगता थोडीच येणार आहे त्याला? आणि सांगितलेच तरी कळणार कोणाला इथे? जाऊ दे त्यापेक्षा हा प्रवास काय वाईट आहे? चालू ठेऊया शून्याकडून क्षितिजाकडे . अथक, अविरत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०५/२०११) (हो, साधारण दोन वर्षांपूर्वी लिहीलेली हि कविता आहे.)
काव्यरस

स॑ण आणि संस्कृती.

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 25/04/2013 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री ठिक बारा वाजता जेव्हा घड्याळाचे दोन काटे एकमेकाना भिडले अन तिसर्‍याने त्यांच्यापासून दूर पळायला सुरुवात केली तेव्हा अचानक मे भयानक कानठळ्या बसवणारे आवाज अंगाखांद्यावर कोसळू लागले अन मी पुरता बावचळून गेली की काय हे, मुंबई आयपीएल मध्ये एक मॅच काय जिंकली तर फटाक्यांच्या लडीच्या जागी कानफाडी करणारा कसला हा गोंधळ... आवाजाचा धमाका इतका जोरदार होता की तब्बल सत्तावीस सेकंद उलटून गेल्यावर मी भानावर आलो आणि आणखी सतरा सेकंदांनी म्हणजे एकूण चव्वेचाळीसाव्या सेकंदाला मी ओळखले की हा आवाज एका भल्यामोठ्या स्पीकरमधून येत होता ज्याचा "बास" इतका जबरदस्त होता की "आता बास" म्हणावेसे वाटत होते अन

नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट बाबत

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 25/04/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्‍याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे. आपण आपल्यासाठी / आपल्या नात्यातल्या कुणासाठी तरी कधीना कधी ह्या साईटवर गेला असाल.

सरकारी नोकरी २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० साली मी विक्रांत मध्ये प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.(मी एकटाच होतो) जहाजात साधारण पणे डॉक्टर हा कल्याण कारी(WELFARE) अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो कारण त्याची बढती हि वार्षिक अहवाला वर नसते. जहाजाचे स्वास्थ्य विषयक काम हे त्याच्या अखत्यारीत येते यात सर्व स्वयंपाकी वाढपी (COOKS AND STEWARDS) यांची दर महिन्याला तपासणी करणे, स्वयमपाकघर, जेवणघर इ गोष्टीची तपासणी करणे. कीटक, उंदीर इत्यादीपासून प्रतिबंध ठेवणे हे सर्व येते तसेच सर्व सैनिक आणी अधिकारी यांची वार्षिक स्वास्थ्य/वैद्यकीय तपासणी बढतीपूर्व वैद्यकीय तपासणी हे सुद्धा येते त्यामुळे डॉक्टरला बरेच अधिकार आणी शक्ती असते.

निवृत्त नाथांच्या कथा

लेखक रामदास यांनी गुरुवार, 25/04/2013 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे मी दचकून जागी झाले. तशी माझी झोप सावधच असते पण आज काहीतरी विचीत्रच झालं. माझ्या गालावर कुणीतरी हलकेच हात फिरवतंय असं आधी वाटलं. मग झोपेतच ओळखीचा सुगंध आल्यासारखं वाटलं. बर्‍याच वर्षांनी असं काहीतरी झालं पण गालावर पिस फिरवणारा स्पर्श हळूहळू सगळ्या चेहेर्‍यावरच फिरायला लागला आणि मी दचकून ..दचकून कसली जवळजवळ किंचाळतच उठले. डोळे उघडले तर काय ह्यांचाच चेहेरा समोर . मी म्हटलं "काय हो हे !!!