Skip to main content

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

(७२ मिनिटांचा हिशोब - पुरूषही काही कमी नाहित)

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार. तर ऐका, आपले वाचा, " भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात.

सरकारी नोकरी

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या पहिल्या अर्थमंत्र्यांनी आय ए एस अकॅडमी मध्ये केलेल्या भाषणात तिथल्या होऊ घातलेल्या सचिव अधिकार्यांना असे म्हटले होते कि आता तुम्ही जगातल्या सर्वात सुरक्षित अशा नोकरीत शिरत आहात जेथे तुम्ही जरी खून केलात तरी शिक्षा म्हणून फक्त बदली होते. आणी बर्याच वेळा तीसुद्धा बढती च्या पदावर. इतकी सुरक्षित नोकरी असल्यावर आपण त्याचा वापर जनहितासाठी केला पाहिजे. परंतु तीरुनेल्लाई नारायणन शेषन या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लेखनातील एक वाक्य आठवत आहे.

अक्षदा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/04/2013 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड तांदळाचे दाणे घे‌ऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो. हिदू विवाहपद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागताना वधूवरांवर अक्षदा टाकतात... मात्र पंजाब कश्मिर मधे मात्र फुलांच्या पाकळ्याचा अक्षदा म्हणुन उपयोग केला जातो.. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोंधळे (ज्वारी) वापरतात तांदळाच्या ऐवजी. असे पण वाचनात आले. अक्षदा ह्या आशीर्वाद / शुभेच्छा पर असतात. फलो फुलो .. भरभराट होवो या अर्थाने .. धान्यरुपी अक्षदा टाकण्यामागील गर्भित उद्देश्य हाच असतो की तुम्ही बहरा ..

कैरीचे पन्हे

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 25/04/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याची सुट्टी लागली की माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा एक अत्यंत आवडता कार्यक्रम असायचा तो म्हणजे I Love you Rasna म्हणत रसना चे सरबत बनवणे :) आम्ही दोघेजण यासाठी प्रचंड उत्सुक असायचो. सरबत पिण्यापेक्षा ते बनवण्याचा उद्योग जास्त enjoyable असायचा. आई रसना चा pack घेऊन यायची. Orange हा all time favorite. कधीतरी कालाखट्टा हि करायचो. सक्काळी सक्काळी आंघोळ करून तयारीला लागायचो. मोठ्ठ पातेलं, त्यात मापून पाणी, मोजून साखर घालायची आणि ढवळत बसायचं. पाण्यातून साखर अदृश्य कधी होते याकडे आम्ही डोळे लावून असायचो.

महाराज

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 25/04/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख. एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'.

नट्यांचे रहस्य

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 24/04/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या , मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या, एकमेका करती सेलफोन, आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण? देवांना घातली त्यांनी आण , स्वर्गात नाही अप्सरांचे वाण , नका आणू स्वर्गात एकाही नटीला, पोचल्या असल्या जरी साठीला ,
काव्यरस

चंद्रकांता - १.३ - बगिचातला दगाफटका

लेखक आदूबाळ यांनी बुधवार, 24/04/2013 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
Chandrakanta (चित्रपट्टीसाठी अभ्याचे आभार!) यापूर्वी: चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या चंद्रकांता - १.२ - मदांध आणि सत्तांध ~~~~~ त्याच संध्याकाळची गोष्ट. चंद्रकांता, चपला आणि चंपा उद्यानात विहार करत होत्या. मावळतीच्या बाजूच्या घनदाट अरण्यात सूर्य बुडत चालला होता.

प्रेम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे केले तु damage बदलुन टाकली तु माझि वेडी वाकडी image कधीच नव्हती कुणासाठी आता आहे तुझ्यासाठी craze आयुष्याच्या माझा चालु आहे हा sensitive phase कुठे हि पाहता मला दिसते फ्क्त तुझि image बोलायला तुझ्याशी आणतो उसनं courage तुझ प्रेम म्हण्जे एक alcholic be average सुंदर रंगित पक्श्याचे मखमली plumage valentineday ला देशील म्ह्टल सुंदरसं package नाहि मिळले कहि तेव्हा ह्रुदयास लावले bandage तुझ्याशीवाय होणार नाहि प्रिये कुणाशीहि engage माझ्यासाठी ठेवशील ना तु तुझ्या ह्रुदयाचे passage नाहि माझा मोठा बंगला आहे छोटा cottage प्रेमासाठी करशील का तु त्याच्याम्धे manage चटकन होकार दे आणि भरुन टाकु आ

अलबम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या अलबम मध्ये आठणीचे फोटो असतात आणखि एक कॉपि काढायला नेगेटिव मात्र शिलक नसतात