केमिकल कॅस्ट्रेशन..
लेखनप्रकार
दिल्लीमधे झालेला धावत्या बसमधला बलात्कार आणि त्यामधे त्या निरपराध मुलीच्या शरीराशी केल्या गेलेल्या विकृत मारहाणीने घेतलेला तिचा बळी हे सर्व अगदी ताजं आहे आणि त्याविषयी आधीच खूप चर्चा आणि आंदोलनं झाली आहेत, चालूही आहेत.
या प्रसंगाची धग, बोच , अपराधीपणा कुठेतरी सर्वांनाच जाणवतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, जास्त करुन पुरुषाने स्वतःलाच यासाठी अंशतः जबाबदार धरावं की नाही हा मुद्दा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. सध्या कोणीही त्या दिशेने विचार करण्याच्या मनःस्थितीत नाही. आय अॅम सॉरी टू बी अ मॅन अशा आशयाची भावनापूर्ण निवेदनं दिली जात आहेत.
सध्या बलात्कारविरोधी शिक्षा (न्याय) आणखी आणखी तीव्र करावी अशा विचारातून जो मसुदा बनवला जातोय त्यामधे तीस वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच केमिकल कॅस्ट्रेशन हा एक पर्याय विचारासाठी घेतला गेलेला आहे. पोलंड, अमेरिकेत काही राज्यं आणि इतर काही देशांमधे शिक्षेचा हा प्रकार आधीच वापरला जातो आहे.
खच्चीकरण असा एक प्रतिशब्द यासाठी आजच्या लोकसत्तेत वापरला गेला आहे. हा शब्द कितपत चपखल आहे ते मला माहीत नाही. त्यामधे "रसायने टोचून खच्चीकरण हा प्रकार नसबंदीसारखा (पर्मनंट) नसतो, औषधे म्हणजे रसायने बंद केल्यानंतर त्या व्यक्तीची लैंगिक क्षमता पूर्ववत होते", अशा आशयाचा मजकूर आहे.
नसबंदी या प्रकाराशी केलेली अशी तुलना चुकीची वाटते आहे. केमिकल खच्चीकरण म्हणजे नसबंदीपेक्षा बरे असा काहीतरी रोख त्यात उगीच दिसतो. नसबंदीने पुरुषाची लैंगिक भावना, क्षमता वगैरेवर काही परिणाम होत नाही अशी माझीतरी समजूत आहे. हीच समजूत कुटुंबनियोजनाच्या अनेक जाहिरातींमधेही अधोरेखित होते.
बातम्या ऐकता-वाचताना आलेले असे विचार थोडे बाजूला सोडतो आणि केमिकल कॅस्ट्रेशनविषयी आलेला विचार पुढे मांडतो.
मिळालेल्या माहितीवरुन असं दिसतंय की हा पर्याय "रेअरेस्ट ऑफ रेअर" केसेसमधे वापरला जावा अशी शिफारस आहे. ("दुर्मिळ घटनांत":लोकसत्ता)
सर्जिकल कॅस्ट्रेशन अर्थात शल्यक्रियेद्वारे नपुंसकत्व / वंध्यत्व आणण्याच्या शस्त्रक्रियेपेक्षा हा प्रकार वेगळा आहे. यात शस्त्रक्रियेने लैंगिक अवयव कायमचे काढून टाकण्याऐवजी केवळ इंजेक्शनद्वारे डेपो प्रोवेरा किंवा सायप्रोटेरॉन अॅसिटेट किंवा तत्सम औषधं दर तीन महिन्यांनी (किंवा ठराविक काळाने) टोचत राहून त्याचं शरीरातलं प्रमाण मेंटेन केलं जातं. या द्रव्यांमुळे लैंगिक इच्छा आणि शरीरसंबंध करण्याची क्षमता दोन्ही कमी होतात.
आता प्रश्न असा आहे की यामधे गुन्हेगाराला दर ठराविक दिवसांनी ते द्रव्य टोचण्याचा उपद्व्याप कोण करणार? त्याची अंमलबजावणी दर अमुक महिन्यांनी होतेय का ते कोण पाहणार? जर तुरुंगवास अधिक वरुन हा उपाय करायचा असेल तर त्याचा उपयोग काय? तुरुंगवासाऐवजी पर्याय म्हणून हा उपाय इतर देशांत केला जातो. या उपायाने दीर्घ काळानंतर स्त्रीप्रधान हार्मोन्सची पुरुष शरीरात वाढ होऊन पुरुषात काही स्त्रैण लक्षणे येतात. या प्रक्रियेत वापरलेल्या द्रव्यांमुळे हृदयविकार आणि इतर काही आजारात वाढ होऊ शकते. अर्थातच मूळ गुन्ह्याला शिक्षा देताना इतर डॅमेजेसही होतात, याचा विचार एका गुन्हेगाराच्या बाबतीत करायचा किंवा नाही याविषयी देशाची काय विचारसरणी आहे त्यावर देशाविषयी एक जागतिक प्रतिमाही तयार होत असते.
यामधे कशाला विरोध किंवा पाठिंबा देण्याचा उद्देश नाही, पण असे ठराविक काळाने औषध देऊन "खच्चीकरण" मेंटेन करणं हे कोणत्याही दृष्टीने योग्य किंवा किमान प्रत्यक्षात शक्य कोटीतलं वाटतं का?
कायद्याच्या मूलभूत विचारांमधे एक विचार आहे. समाजातला एक घटक (व्यक्ती) हा सार्वजनिक हिताचे नियम (कायदे) पाळत नाहीये, अर्थात ती व्यक्ती हा या सिस्टीम मधला उत्पन्न झालेला एक "दोष" आहे. अशा वेळी या "दोषा"ला समाजाच्या रचनेतून दूर करणं हे कायद्याचं काम आहे. या "दूर" करण्याने बाकीचा समाज पुन्हा एकसंधपणे कायद्याने राहील.
या "दूर" करण्याचे मार्ग गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार "नोकरीतून सस्पेंड" ते "तडीपारी" ते "तुरुंगात टाकणे" ते "फाशी (जगातून टर्मिनेट)" असे असतात.
खच्चीकरणामागे हे सूत्र लावलं तर लैंगिक व्यवहाराच्या सिस्टीममधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा (दूर करण्याचा) हा प्रकार आहे.
आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत हा विचार उपयोगी आहे का? मर्दानगी ही अस्तित्वापेक्षाही महत्वाची मानणार्या सर्वसाधारण मानसिकतेत हजेरी लावून कोणी खच्चीकरणाला सहकार्य करेल का? अशी व्यक्ती लैंगिकदृष्ट्या खच्ची झाली तरी हिंसात्मकदृष्ट्या खच्ची होईल का? आपली तथाकथित मर्दानगी जाहीर शिक्षेने "खच्ची" केली गेली हा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या(अर्थातच तथाकथित) मानसिक प्रतिमेला इतका काळिमा असेल की त्या अर्थाने शिक्षेचा उद्देश पूर्ण झाला तरी त्यानंतर ती व्यक्ती फक्त आणि फक्त सूड हे एकच ध्येय समोर ठेवून जगेल असं वाटत नाही का? अशी व्यक्ती तुरुंगात ठेवून समाजापासून दूर राहणं आणि खच्ची होऊन समाजातच राहणं यापैकी दुसर्या पर्यायात त्या बलात्कारित स्त्रीचं जिणं ती व्यक्ती नकोसं करणार नाही का? किती पीडित महिलांना नंतर आयुष्यभर पोलीस प्रोटेक्शन देणार?
अगदी "ह्युमॅनिटी गेली तेल लावत" असं म्हटलं तरी असं म्हणता येईल की हे गुन्हेगार म्हणजे जणू उंदीर, डास असे निर्मूलनाचे विषय आहेत. अशा दृष्टीने सुद्धा.. उंदीर किंवा डास निर्मूलनासाठी त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून "चावण्याची इच्छा कमी करणार्या" द्रव्याचा ठराविक डोस त्यांच्या तोंडी घालत राहणं हे किती फिजीबल आहे याविषयी शंकाच आहे.
केमिकल कॅस्ट्रेशनविषयी सध्यापर्यंत तरी हे प्रश्न मनात आले आहेत. प्रत्यक्ष कायदा काय आणि कसा होतो त्यावर कल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात..
वाचने
10447
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
फीजिबिलिटी या एकमेव
In reply to फीजिबिलिटी या एकमेव by मृत्युन्जय
सर्जिकल केले तरी त्याला बाहेर
In reply to सर्जिकल केले तरी त्याला बाहेर by गवि
@तो पीडीत स्त्रीच्या जिवाला
In reply to @तो पीडीत स्त्रीच्या जिवाला by अत्रुप्त आत्मा
"असली शिक्षा होते,ही गोष्ट
In reply to सर्जिकल केले तरी त्याला बाहेर by गवि
आणी नंतर तो निर्दोष सिध्द झाला तर ..
In reply to आणी नंतर तो निर्दोष सिध्द झाला तर .. by नेत्रेश
दोषी सिद्ध झाल्यावरच सर्जिकल
In reply to सर्जिकल केले तरी त्याला बाहेर by गवि
बाहेर मोकळा सोडायला हरकत
@उंदीर किंवा डास
In reply to @उंदीर किंवा डास by अत्रुप्त आत्मा
सहमत ....
"रेअरेस्ट ऑफ रेअर" गुन्ह्याला
अगदी "ह्युमॅनिटी गेली तेल
अगदी "ह्युमॅनिटी गेली तेल लावत" असं म्हटलं तरी असं म्हणता येईल की हे गुन्हेगार म्हणजे जणू उंदीर, डास असे निर्मूलनाचे विषय आहेत. अशा दृष्टीने सुद्धा.. उंदीर किंवा डास निर्मूलनासाठी त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून "चावण्याची इच्छा कमी करणार्या" द्रव्याचा ठराविक डोस त्यांच्या तोंडी घालत राहणं हे किती फिजीबल आहे याविषयी शंकाच आहे..्ए तर फक्त बलात्कारलाच नाही, सर्वच गुन्हे अन गुन्हेगारांना लागू होते. मग इतर गुन्ह्यांमधे जर गुन्हेगार पीडिताचा सूड घेण्याची शक्यता असेल तर यातही आहे.अव्यवहार्य आणि अप्रस्तूत
In reply to अव्यवहार्य आणि अप्रस्तूत by ऋषिकेश
पूर्णपणे अनुमोदन.
In reply to पूर्णपणे अनुमोदन. by प्रचेतस
माझेही अनुमोदन.
In reply to माझेही अनुमोदन. by बॅटमॅन
खरे आहे.
पुन्हा एकदा तेच हिंसक विचार
एकुण चर्चे वरुन नाना पाटेकर आणि
आरोप सिद्ध झाल्यास ७ वर्ष
अशा १० / १५ केस मधील सगळ्या
हम्म
जाहिल उपाय !
त्याच काय आहे गवी, अगदी
In reply to त्याच काय आहे गवी, अगदी by स्पंदना
भावनेच्या भरात काय म्हटलंय
In reply to भावनेच्या भरात काय म्हटलंय by गवि
नाही भावनेच्या भरातला नाही
In reply to नाही भावनेच्या भरातला नाही by स्पंदना
आत्तापर्यंत तरी कोणत्याही
In reply to आत्तापर्यंत तरी कोणत्याही by गवि
शिक्षेच्या भितीने बलात्काराच
In reply to शिक्षेच्या भितीने बलात्काराच by स्पंदना
तुम्ही दिलेले आकडे विचार
चौरंग करा !!!
या शिक्षेत काही अर्थ नाही
In reply to या शिक्षेत काही अर्थ नाही by पैसा
+१
खर तर बलात्कार करणार्याचे लिंग कापणे हिच शिक्षा योग्य आहे.
कायमचा शिक्का
शिक्षा
कायदा करताना सांगोपंग विचार व्हावा.
सध्या होणारी शिक्षा ही कमी
थोडासा वेगळा विचार...
खरं तर बलात्काराच्या केसेस
जलद न्याय मिळावा .
खच्चीकरण शब्द वाचल्यावर
अपराधींच्या घरच्यांना
लिंग कापा xxxx चे
कायद्याने काय करावे